Monday, December 27, 2021

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 66 ते 70 : ध्वनिफीत




सारांश श्लोक ६६ - ७०. 

सत आणि असत यातील सत घ्यावे असत टाकावे असे कितीही सांगितले तरी असत संसार हाच सत वाटल्यामुळे माणूस संसारात गुंतूंन राहातो. राघवाचे ध्यान करा असे सांगतांना तो राघव कसा आहे याचे वर्णन हे श्लोक करतात .

सावळ्या  वर्णाचा , अतिशय सुंदर, धैर्यवान आहे, शांत आहे, स्थितप्रज्ञ असा आहे. लहानपणी अनेक राक्षसांचा यज्ञ संरक्षणासाठी  सामना करावा लागला, राज्याभिषेक व्हायच्या क्षणी वनवासात निघावे लागले, वनवासात अतिशय खडतर जीवनक्रम कंठावा लागला, रावण वध झाला सीतेला अग्निदिव्य करावे लागले . कोठेही चलबिचल झाली नाही (महाधीर गंभीर).

भगवंताजवळ सुख आणि आनंद आहे आणि देण्याची इच्छा पण आहे. ते भयाचे निवारण करतात. पण भक्ती बरोबर जर चुकीचे वागणे आणि हेवा/मत्सर असेल तर भक्ती उपयोगी पडणार नाही. म्ह्णून भक्ताचे वागणे सावध हवे, काळजीपूर्वक चांगुलपणा जपायला, सांभाळायला हवा. 

सद्गुरू निष्ठा , ईश्वर निष्ठा याचे आध्यत्मिक जीवनात खूप महत्व आहे.  त्याने जीवनात वैचारिक अधिष्ठान , स्थिरता प्राप्त होते, साधनेच्या वर्तनाने ती वाढत जाते. म्हणून राम भक्ती जीवनास जोडा. 

प्रत्येक दिवस - प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥ आणि दिवसभर हे अनुसंधान राखून निजतांना सर्व दिवसकार्य रामास समर्पण करून शांत व्हावे आणि निद्रा स्थितीत विलीन व्हावे. 

घरातील ज्येष्ठ व्यक्ती आपुलिकने जसे आपल्याला भले  काय ते सांगतात तसा हा उपदेश आहे. 

काय होत आहे आणि आपण काय करायला पाहिजे , दोन्ही सांगितले आहे. हे सर्व समजून घेण्यासाठी ध्वनीफीत जरूर ऐका . आवडल्यास इतरांना ऐकण्याची शिफारस करा ही  विनंती. 



विजय रा. जोशी. 

 

 



Wednesday, December 15, 2021

मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 61 ते 65 : ध्वनिफीत




सारांश श्लोक 61 ते 65. 

संत सांगतात कि आंनदात रहा. आंनदात जीव आत्म्याजवळ रहातो, दुःख करायला लागला कि जीव देहबुद्धीवर

येतो. पण जेव्हा साधक देहबुध्दीत येतो, निजध्यास सुटून जातो,  तेव्हा मी आणि तू, मी आणि जग अशी

जाणीव सुरु होते,  सर्व दुःख सुरु होतं . 

साधकाला हा साधना-आनन्द प्रयत्नाने मिळवावा लागतो. 

सर्व कामना पूर्ण करते ती कामधेनू. ती कामना पूर्ण करते पण काय मागायचे  ते कळलं पाहिजे. 

आपण संसारातल्या गोष्टी , ज्या अशाश्वत आहेत त्या मागून फायदा नाही. 

शाश्वत गोष्टी मागण्यात खरा लाभ आहे. 

पूर्ण ज्ञानी, कामनारहित, निर्लोभ आणि निर्विषयी असा मनुष्य नसतो हे लक्षात घेऊनच  ‘अतीपणा’ नको 

हे समर्थ सांगतात. काय नसावं आणि काय करावं हे सांगितले आहे. 

भक्ति ऊणे जीवन हे  दैन्यवाणे आहे. 

बाकी सर्व लौकिक संसार अति उत्तम असेल तरीही.  संसाराला परमार्थाची जोड नसेल तर सर्व व्यर्थ आहे, कारण

संसारातील सर्व गोष्टी इथेच सोडून जावे लागणार आहे. येणार आहे ते फक्त भक्तीचे, सत्कार्याचे , सत्कृत्याचे फळ

आणि शुद्ध हेतूमुळे मनावर झालेले संस्कार.

हे सर्व सर्व काळी, सर्व ठिकाणी, सर्व मानव मात्रांस उपयुक्त ज्ञान आहे. 

म्ह्णून संतांच्या उपदेशास ‘अक्षय वांग्मय’ असे म्हणतात. 

कृपया पाठ ऐका आणि आवडल्यास इतरांना ऐकण्याची शिफारस करा. 


विजय रा. जोशी . 


Thursday, December 9, 2021

  मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 56 ते 60 : ध्वनिफीत



सारांश श्लोक ५६ ते ६०. 

साधकांनी काय करावे, निदान या क्षेत्रात प्रगती व्हावी अशी इच्छा असलेल्या लोकांनी , जिज्ञासूंनी काय करावे, कसे करावे हे सांगणारे हे मनाचे श्लोक आहेत. 

उपासना हवी, त्याप्रमाणे शुद्ध कर्म व्हावे , आणि अशी  भक्तियुक्त क्रिया  सातत्याने व्हायला हवी. 

संत स्वतःचे चरित्र लिहीत नाहीत पण अत्यंत प्रेमाने इतरांसाठी आपल्या जीवनात केलेल्या साधनेचे सार सांगतात. ते म्हणजे राम-नाम आणि नित्य नेमे उपासना हे आहे. स्वार्थापायी रामभक्ती केली तर त्याचा लाभ घडत नाही. फक्त राम-भेट , ईश्वरप्राप्ती , हेच ध्येय असले पाहिजे. 

कल्पना मनात येते आणि मग तिचा विस्तार होतो. मनात कल्पना येतात त्यातून वासना आणि मग पुढे कृती होते. पण अशा कोटी-कोटी कल्पना केल्या तरी त्यातून रामभेट होणार नाही. कल्पनेने सुरु होणारा  रस्ता रामाकडे जात नाही. कल्पनाच करायची तर ती निर्विकल्पाचीच करावी. म्हणजेच चिंतन परमेश्वराचेच होईल. 

वासनेची गोडी सहज आहे, राम नामाची, नामस्मरणाची गोडी जाणीवपूर्वक लावावी लागते, पण साधनेने, प्रयत्नाने, निश्चयाने  जर लागली तर मग ती आपले सर्व अवधान अंतर्बाहय भरून टाकते आणि मग जीवन धन्य होते असा संतांचा अभिप्राय आहे. 

आपली सर्व भौतिक, अध्यात्मिक मागणी निरपेक्ष आणि शुद्ध भक्तिभावाने पूर्ण होतात पण त्यासाठी मन, कल्पना आणि वृत्ती यात आमूलाग्र बदल करावा लागतो. तो का व कसा करायचा हेच श्रीसमर्थ आपल्याला आईच्या मायेने समजावून सांगत आहेत. 

ध्वनिफितीमध्ये हे सर्व सोपेपणाने समजावून सांगितले आहे. जरूर ऐका आणि आवडल्यास इतरांना ऐकायला सांगा, ही  विनंति. 


विजय रा. जोशी. 


Tuesday, November 30, 2021

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 51 ते 55 : ध्वनिफीत



सारांश : श्लोक ५१ ते ५५. 


साधकाने सुरवातीला आपले विकार सांडायचे असतात. साधना प्रगत झाली की मग विकारच त्याला सोडून जातात. 

तत्वांच चिंतन करण्यात मौनात राहून सर्वोत्तमाचा दास वेळ घालवत असतो. मग वाचेने ते ज्ञान लोकांना मनापासून, आपुलकीने कर्तव्यभावनेने देत असतो. 

संत सत्य शिकवतात पण ते विद्वत्तेने नसते, अत्यंत प्रेमाचे सांगणे असते.

देहाचे चोचले पुरवावे, मजा करावी, उपभोग घ्यावा, कला शिकाव्या , इंद्रिये/विषयांचा भोग घ्यावा, हे सर्व साधारणपणे असते. पण संत चरित्रात अनेकदा (पूर्वकर्मामुळे)  लहानपणीच वैराग्य लक्षणांचा उदय झालेला दिसतो

निश्चय नक्की असतो. प्राप्त कर्तव्ये करून सर्व वेळ त्या सत्य शोधनात खर्च केला जातो. 

आपलं प्रेम हे नेहमी व्यक्ती सापेक्ष असते. वस्तू सापेक्ष, गुण सापेक्ष असते. म्हणून त्यात आसक्ती असते. सतांचे प्रेम हे तसे नसते आणि ते आसक्तीमध्ये कधीही गुंतलेले नसतात. सर्वोत्तमाचा दास धन्य होय. 

प्रापंचिक श्रोत्यांच्या मार्गदर्शनासाठी  उत्कृष्ठतेचा निकष. भगवंताचे गुणविशेष यांचे वर्णन केलेआहे. 

या सर्वांचे  तपशीलवार विवरण या ध्वनिफितेत आले आहे. जरूर ऐका , आणि आवडल्यास इतरांना ऐकण्याची शिफारस करा. 

धन्यवाद. 


विजय रा. जोशी. 





Saturday, November 20, 2021

  मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 46 ते 50 : ध्वनिफीत




सारांश – श्लोक: 46 ते 50.

अध्यात्मात आपण किती माळा  जपल्या, देवासमोर किती वेळ बसलो , ते महत्वाचे नाही. 

तर भगवंताशी आपण किती काळ एकरूप झालो ते खूप महत्वाचे. एकचित्तता, स्वतःला विसरून मन

भगवंतांशी एकरूप होणे, महत्वाचे. सर्वोत्तमाची सेवा करणारा, दास्यत्व पत्करणारा कसा असतो याचे

वर्णन  (47-56)  या १० श्लोकात आहे. 

काही संत प्रपंच धारक होते, काही नव्हते पण सर्वांचे कार्य हे देवकार्य होते. स्वतःची प्रगती करून

सर्व-सामान्यांना सन्मार्गास लावण्यासाठी त्यांनी देह झिजविला. नुसते रामनाम घेऊन पुरत नाही,

ज्यांचे आपण नाम घेतो त्याचे गुण सुद्धा आपल्यात आणले पाहिजे, आपल्या जीवनाचा लाभ

जगाला झाला पाहिजे - असे समर्थांचे वर्तन होते, आणि इतरांना शिकवण होती. 

साधकाच्या जीवनातले अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या वागण्याचे प्रामाणिक परीक्षण झाले

पाहिजे, आपल्या उक्ती आणि कृतीतले अंतर जाणून घेऊन ते कमी करण्याचा सदैव प्रयत्न हे खूप

हत्वाचे आहे. आपली इंद्रिये, आपले षड्विकार आपल्याला विविध दिशेने खेचत असतो म्हणून आपण

अशांत असतो. संतांनी हे सर्व आपल्या ताब्यात ठेवलेले असते, म्हणून ते शात, निवालेले  असतात. 

या श्लोकांवरील विवेचन समर्थांचा संदेश सोप्या भाषेत उदाहरणे, दाखल्यासह या ध्वनिफितीमध्ये आहे. 


जरूर ऐका आणि आवडल्यास इतरांना  लिंक पाठवा अशी विनंती आहे. 


विजय रा. जोशी 








Tuesday, November 16, 2021

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 41 ते 45 : ध्वनिफीत





श्लोक ४१- ४५ सारांश . 


थोडा शोध , प्रयत्न आवश्यक आहे . पण अति चंचलता (बहू हिंडता) , धरसोड उपयुक्त नाही. गरजेपुरते प्रयत्न आवश्यकच आहे. ध्येय कोणते, तिथे पोहोचण्याचा आपला मार्ग कोणता हे समजले पाहिजे. स्वतःला काहीकाळ तरी विसरण्याचा  जेव्हा आपण  सराव करतो, (ध्यान) त्यावेळीआपण खूप शांती अनुभवतो. ती शांती, आनंद वर्णनातीत असते. स्वतःला विसरण्यातला,अहंकार सोडण्याचा तो आनंद असतो.अशा अखण्ड एकतेने “रघूनायका आपुलेसे करावे” हे साध्य होते. 

कर्मा चे फळ सर्वांनांच भोगावे लागतात, अगदी देवांची सुद्धा ह्यातून सुटका ज्ञालेली नाही. आपल्या कर्मावर सतत लक्ष ठेवा.

अनावश्यक बोलणे म्हणजे स्वतःची शक्ती वाया घालवणे आहे. म्हणून अनावश्यक बोलणे टाळणे  हे परमार्थिकाने नाही तर प्रापंचिकांसाठी देखील आवश्यक आहे. समाधान मिळणे मुळात अवघड आहे. पण जेव्हा कधी मिळाले तर ते सुद्धा कुसंगतीने भंग पावते, नाहीसे होते. सत्संगतीच्या योगाने अनेक माणसं उद्धरून गेली, म्ह्णून संत्संगतीत राहावे. 

हा सर्व बोध आपल्या बुद्धीला, विचारांना व्हावा असे समर्थ सांगत आहेत. 

आपल्या रोजच्या वर्तनात थोडा बदल करून आपला सर्वांगीण विकास कसा साधता येईल यावरील समर्थांच्या उपदेशावरील  हे विवरण जरूर ऐका . आणि आवडल्यास इतरांशी शेअर करा.  

धन्यवाद. 


विजय रा. जोशी. 






Thursday, November 4, 2021

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 36 ते 40 : ध्वनिफीत




श्लोक ३६ - ४०, सारांश. 

हे मना !

भगवंत हा नेहमी खऱ्या भक्ताजवळच असतो. तो भक्ताची परीक्षा पाहिल, पण त्याचाकडे कधीही

दुर्लक्ष करणार नाही. भक्त संकटात सापडल्यास त्यास नेहमी सहाय मिळते. भगवंतांचे खरे दर्शन

तुला आनंदाने आश्चर्यचकित करेल.  अत्यंत उत्कृष्ठ , समाधान देणाऱ्या भगवन्त  कृपेला प्राप्त

करण्यासाठी स्वतःचे सर्व चंचलत्व सोडून दे आणि त्याचे ठायी हे मना ! तू अखंड स्थिर रहा.

स्वतःतले सर्व दोष झटकून आपल्यामध्ये सुयोग्य बदल घडवून, भगवंता नजिकचे स्थान मिळवून 

तेथे तू कामची वस्ती ठेव. 

मनाला उपदेश करणारे हे मनाचे श्लोक जीवन सर्वार्थाने यशस्वी करण्यासाठी जे सांगत आहेत, 

त्याचे सविस्तर सोपे विवरण आपल्याला नक्की आवडेल. ऐका आणि आवडल्यास इतरांबरोबर शेअर करा. 


विजय रा. जोशी. 



Wednesday, October 27, 2021

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 31 ते 35: ध्वनिफीत



सारांश - श्लोक ३१ ते ३५.  


प्रभू रामचंद्र पराक्रम आणि बळ यात श्रेष्ठ आहे. सर्व सृष्टी हि त्या भगवन्ताची लीला आहे.

पश्चाताप दग्ध अहिल्येचा  श्रीरामाने उद्धार केला.  हनुमंत आणि बिभीषण हे राम-कृपा प्राप्त

झालेले थोर भक्त आहेत. 

जो खरा निष्ठावान, श्रद्धावान भक्त आहे त्यास भगवंत कधीही अंतर देत नाहीत , 

भगवंत कधीही भक्ताची उपेक्षा करीत नाहीत. याबद्दल ते भक्तास आश्वासन देतात,

त्यावर आपण आढळ विश्वास ठेवला पाहिजे आणि आपली भक्ती दृढ आणि अचल ठेवली

पाहिजे. 

दृढ भक्तीचे जीवनातील महत्व या ध्वनिफितीत वर्णन केलेले आहे. 

जरूर ऐका आणि आवडल्यास इतरांना शेअर करा . 


विजय रा. जोशी 



Monday, October 11, 2021


 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 26 ते 30: ध्वनिफीत 







श्लोक २६ ते ३० - सारांश. 


जीवन हे क्षणभन्गुर आहे.  

जर भव, म्हणजे आपले प्रापंचिक जीवन, एक दिवस संपणार आहे, हे सत्य समजले की  त्या शेवटाला

भिण्या ऐवजी तो शेवट  कसा गोड होईल यासाठी तयारी केली पाहिजे. आपली मानसिकता

बनविली पाहिजे. आणि ती मानसिकता कशी बनवता येईल याचे मार्गदर्शन समर्थ या श्लोकात

आपल्याला करीत आहेत. 

भगवंत आणि सद्गुरू त्यांच्या सच्चा, निष्ठावान भक्ताकडे दुर्लक्ष करीत नाहीत. अनेकदा भक्तांचे

जीवन जरी वरवर इतरांना दुःखमय वाटले तरी त्यांचे, त्यांच्या सत्कार्याचे भगवंत नेहमी संरक्षण

करतात.

अंतिमतः,  भगवंत आपल्या भक्ताचा आपले पणाने सांभाळ करतात . त्यांची उपेक्षा कधीही करत

नाहीत . 

आपल्या भक्ती साधनेने आपले जीवन कसे सार्थकी लागते त्याबद्दल केलेले 

या श्लोकांवरील विवेचन जरूर ऐकावे आणि आपल्याला आवडल्यास इतरांशी शेअर करावे. 


विजय रा. जोशी. 

Thursday, September 30, 2021

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 21 ते 25: ध्वनिफीत 




सारांश - श्लोक २१ ते २५. 

(जीवन कसे जगावे : शुद्ध भक्ति-युक्त कर्म करण्याचा प्रयास अखंड करावा) 

आपल्या स्वतःच्या वासना समजून घ्याव्या, त्या शुद्ध हेतूच्या कराव्या आणि मग वासना कमी

करण्याचा अभ्यास करावा. भगवंताची भक्ती पूर्ण श्रद्धेने करावी. भक्तीसाठी हनुमंतासारखा आदर्श

घ्यावा. 

वासना मुक्ती आणि दृढभक्ती या साधनेने अंतकाळ अनुकूल होईल. 

अहंकार आपल्याला बंधनात अडकवतो म्हणून नामस्मरण व शुद्धभक्ति-युक्त कर्म करण्याचा प्रयास

अखंड करावा. 

यावरील सविस्तर विवेचन अत्यंत सोप्या भाषेत आणि गोष्टी, उदाहरणांसह ध्वनिफितीत उपलब्ध आहे. 

जरूर ऐका आणि आवडल्यास इतरांशी शेअर करा. 


विजय जोशी. 




Thursday, September 23, 2021

  मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 16 ते 20: ध्वनिफीत 




सारांश श्लोक १६ ते २०. 

जीवनात येणारे विविध ताप कसे टाळता येतील.  


जीवनात आसक्ती असते ती शेवट पर्येंत जात नाही , 

म्हणून  माणूस जन्म -मरणाच्या चक्रात फिरत राहतो. 

जीवनात प्रारब्धानुसार मिलन, वियोग येत राहातात.त्याबद्दल फार खेद  करू नये.  

अंतिम सत्य-स्वरूप भगवंताची  भक्ती करण्या शिवाय जीवनात अन्य योग्य असा मार्ग नाही. 

या मार्गाने पुनर्जन्म आणि त्याबरोबर येणारे विविध ताप टाळता येतील. 

हे कसे साधायचे त्याचे दिशादर्शन हे पाच श्लोक करत आहेत. 

सविस्तर माहिती ध्वनिफितीत उपलब्ध आहे. कृपया ऐकावी. आवडल्यास शेअर करावी. 


विजय रा. जोशी. 









Wednesday, September 15, 2021

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 11 ते 15  : ध्वनिफीत 



श्लोक ११ – १५  : सारांश 

सर्वकाळ सुखी कोणी नाही. पूर्व संचिता प्रमाणे भोग येतात. 

देहबुद्धी कमी करत रहाणे हा मुक्तीचा मार्ग आहे. 

दुष्ट वासना असतील तर कितीही शूर, पराक्रमी व्यक्तींचाही नाश होतो. आणि 

त्यातून जीवन व्यर्थ जाते . 

जन्म होतो, जगात माणूस येतो. जीवनभर पूर्वकर्मानुसार सुख-दुःखे येतात, जातात. 

आणि केव्हातरी हे जग सोडावे लागते. 

हे जग मृत्युभूमी आहे. पण जगणारा माणूस “मृत्यू येणार” हे सत्य विसरतो. 

लक्षात घेत नाही. मग माणसात “मी”, “अहं” आणि “अहंकार” निर्माण होतो.

हे सर्व लक्षात घेऊन जीवन कसे जगावे याचे दिशा दर्शन श्री समर्थ आपल्याला करीत आहेत. 


श्लोकांचे अर्थ विवरण आणि संदेश आपण ध्वनिफितीमध्ये ऐकू शकाल. 



विजय रा. जोशी. 

Wednesday, September 1, 2021

 

मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 6 ते 10.  : ध्वनिफीत 





सारांश - श्लोक ६ ते १०. 

आपण विकार टाळू शकत नाही पण त्यावर लक्ष हवे, स्वतःचे निरीक्षण हवे. हेतुकडे लक्ष हवे. हेतू स्वार्थीनको. समतेचा हवा. स्वतः बरोबर तेवढाच इतरांचा विचार हवा. आणि  विकाराची तीव्रता हळू हळू संकल्पाने कमी करण्याचा प्रयत्न हवा. अहंकार रहित निर्भयता निर्माण करणारे शूरत्व जर आपण अंगी बाणू  शकलो  तर अशा वर्तनाने  इतर लोकांस देखील आपण संतुष्ट, तृप्त आनंदी, शांत करू शकू. तोडणाऱ्या कुर्हाडीला देखील चंदनाचे झाड सुगंधित करते. म्हणून येथे समर्थ म्हणतात तू आयुष्यात चंदन प्रमाणे झिजत कार्य कर.  

कर्मात अपेक्षा असेल तर त्यात शीतलता, पवित्रता  रहात नाही. वडिलार्जित संपत्ती, रेस , लॉटरी, यातून मिळालेली संपत्ती याचा लोभ नको. सुखा मागे दुःख आणि दुःखामागे सुख हे चिरंतन चक्र आहे. दुःखाचे दुःख कमी झाले की सुखाचा ताठा देखील रहात नाही.  आणि मग  यथाकाल अशा विवेकी  वर्तनाने आपण आपल्या स-स्वरुपाशी . आत्मरुपाशी एकरूप होऊ शकू. 


विजय रा. जोशी. 

Wednesday, August 25, 2021

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक १ ते ५.  : ध्वनिफीत 




श्लोक १ - ५. सारांश 

शक्तिरूप शारदा आणि बुद्धीरूप गणेश यांच्या भक्तीच्या सहायाने परमात्म्याचा शोध घ्यावा असा उपदेश समर्थ रामदास स्वामी आपल्याला करीत आहेत. 

मनाला हळू हळू वळवायचे आहे, त्यास जी गोडी लावू तशी लागते. दिवसाची  सुरुवात मन्गलमय झाली की दिवस चांगला जायला मदत होते. याला दिवसभर सदाचाराची जोड द्यावी, दुराचार कमी करावा आणि मग या साधनेच्या वाटचालीत कधीतरी धन्यता आपल्या जीवनात येईल, निदान त्या दिशेने आपली प्रगती घडत राहील. 

रामदास स्वामी मनाला उपदेश करतात - वासना/ इच्छा चांगल्या आहेत, बुद्धी स्वतःसकट सर्वांना न्याय देणारी आहे, आपल्या कर्मात नीतीचा विचार झाला आहे हे सर्व काळजी पूर्वक आयुष्यभर पहा. म्हणजे संचित चांगले घडेल. आत्म विकास घडेल आणि मग प्रत्येक जन्मात उत्तरोत्तर प्रगती होत होत मोक्षाच्या मार्गावर प्रगती घडेल. 

देहबुद्धीपोटी स्वार्थ येतो. कळत नकळत कृती घडते , इतरांना त्रास होतो. पुण्यकर्म जाणीवपूर्वक करत राहिले पाहिजे. इतरांना त्रास देण्याची, पीडा देण्याची, इतरांविषयी बेफिकीर रहाण्याची वृत्ती / बुद्धी , हे टाळण्यासाठी सदैव जागृत रहायला हवे. देव आपल्या सर्व कृती पाहात असतो हि जाणीव, हे भान ठेवायचे म्हणजे मग सत्यसंकल्पात मन/ बुद्धी स्थिर राहील. उपासना आणि व्यवहार, प्रपंच आणि परमार्थ  याची सांगड घालणारे उपाय मनाचे श्लोक आपल्यासमोर मांडतात. 

या श्लोकांची मांडणी करणारे हे विवेचन ऐकून आपल्यास आवडले तर लिंक share करा आणि मनाच्या श्लोकांचा ज्ञान गुणाकार करा ही नम्र विनंती.. 


विजय रा. जोशी. 




Wednesday, August 18, 2021

मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

प्राथमिक माहितीचा पाठ : ध्वनिफीत 




समर्थांनी आजन्म राष्ट्रोद्धाराची चिंता केली . स्वतः विवाह केला नाही पण राष्ट्राचा प्रपंच निष्ठेने केला. शिस्तीने, व्यवस्थेने, मर्यादेने वागण्याचा कित्ता घालून दिला. उपासनेचे स्फुल्लिंग पेटविले.धर्माची पुनर्स्थापना केली. आणि शुद्ध अध्यात्म जागविले. श्रीराम गर्जनेसह भारतवर्ष दणाणून सोडले. जन-प्रबोधनार्थ अफाट ग्रंथरचना केली. अकरा मारुतींची प्राणप्रतिष्ठा करून मठस्थापना केली . मोठा शिष्य सम्प्रदाय निर्माण केला. अशा या थोर योग्याने आपल्या मुखाने निर्माण केलेल्या अत्यंत महत्वाच्या असलेल्या साहित्यामध्ये २०५ मनाच्या श्लोकांचा समावेश होतो. 

पारतंत्र्यामुळे मरगळ आलेल्या राष्ट्रात स्वाभिमाचा आणि अभ्युत्थानाचा अंगार उत्पन्न
करणाऱ्या समर्थांचे कार्य निःसंशय ऐतिहासिक स्वरूपाचे आहे. त्यांचे राष्ट्र जागृतीच्या कार्यातले
योगदान महत्वाचे आहे, आपण ते कदापि न विसरले पाहिजे. 

राष्ट्राच्या व समाजाच्या निकोप उन्नयनासाठी आणि आत्म-निर्भरतेसाठी त्यांनी संन्यासवृत्तीच्या तसेच
त्यागी संसारी भक्तांची उभारलेली संघटना , धर्म, संस्कृती स्वाभिमान या साठी ठिकठिकाणी स्थापन
केलेलं मठ, तेथील महंतांच्या रूपाने सामाजिक नेतृत्वाचे निर्माण केलेले आदर्श , समाजकंटकांसाठी
निर्माण केलेला धाक, या सर्वांचा स्वराज्य उदयाची पार्श्वभूमी म्हणून खूप मोठा उपयोग झाला.

समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनात प्रज्ञा आणि श्रद्धा, कर्म आणि सन्यास, परोपकार आणि
अनासक्ती, एकांत आणि लोकांत यांचा संगम आढळतो. हीच ज्ञानयुक्त श्रद्धा आधारित कर्म
करण्याची रीत आहे. याचा आदर्श  श्री समर्थांनी जगून दाखवला आहे. त्यांच्या बुद्धीला भ्रामक व
चुकीच्या कल्पनांचा स्पर्श कधीही झाला नाही. त्यांच्या श्रद्धेला ईश्वराहून अन्य वस्तू कधी रुचली
नाही. ईश्वरावरील अविचल श्रद्धेमुळे ते संकटात कधी डगमगले नाहीत. भयाने, चिंतेने त्यांच्या
मनास कधीच भ्रष्ट केले नाही. श्री रामरायास आपले जीवन सर्वस्व मानल्याने या जगातील सुखे,
संपत्ती त्यांनी कस्पटास्मान लेखली. त्यामुळे ईश्वरी सामर्थ्य त्यांच्या कर्तृत्वातून झळकले. पण 
‘कर्ता राम आहे’ अशी शंभर टक्के खरी भावना बाळगल्यामुळे जगात मोठेपणाच्या जाळ्यात ते
अडकले नाहीत. अखेरच्या क्षणापर्येत ते ‘रामाचा दास’ राहिले.

अशा श्री समर्थांनी श्रीरामावर प्रेम केले, त्याचे अखंड नाम जपले. त्याचे अखंड अनुसंधान सांभाळले.
या अभ्यासाने त्यांचे मन अतिशय शुद्ध व पवित्र झाले. तेव्हा श्रीरामाच्या कृपेने त्यांना
आत्मसाक्षात्कार झाला. त्या साक्षात्कारातून त्यांना परमानंद मिळाला. तो आनंद सर्वांना भोगायला
मिळावा हि तळमळ त्यांना लागली. 

आनंदाचा अनुभव घेणारे मन कसे तयार करावे हे समजावून सांगण्यासाठी समर्थांनी मनाचे श्लोक रचले. या श्लोकांना त्यांनी “मनोबोध” असेही नाव दिलेले आहे. 

या पाठमालेत आपण मनाच्या श्लोकांचा सविस्तर परिचय घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 
हा प्राथमिक पाठ आहे. 
 

विजय रा. जोशी. 



Sunday, August 1, 2021

 कोरोना , गीता आणि स्वास्थ्य - ध्वनी चित्रफीत


गीता-तत्व पालनाने व्याधी (कोरोना) मुक्ती



कोरोना सह सर्व व्याधी मुक्तीसाठी शाश्वत उपाय गीता देते का?

मुळात व्याधी म्हणजे काय?

स्वास्थ्य म्हणजे काय ? जागतिक आरोग्य संघटना या बाबत काय म्हणते?

स्वास्थ्य प्राप्ती, व्याधी मुक्ती यासाठी गीतेत काय मार्गदर्शन केले आहे.

ते तर्कशुद्ध आहे का?

जगातील सर्वांना उपयुक्त आहे का?

कोरोना सह सर्व व्याधी मुक्तीसाठी शाश्वत उपाय गीता देते का?

अशा विषयावर केलेलं हे संक्षीप्त विवेचन आपल्याला आवडेल. अशी आशा आहे. 


विजय  जोशी. 



Thursday, June 17, 2021

 

पसायदान भाग 2, ध्वनी फीत 


संत ज्ञानेश्वर--पसायदान

ज्ञानेश्वरी हा ग्रंथ तत्त्वज्ञान आणि काव्य यांचा मनोज्ञ संगम आहे. तत्वज्ञानाचे रहस्य मधुर काव्यरचनेतून उलगडून दाखवले आहे. आपल्या वैदिक तत्वज्ञानामध्ये उपनिषदे ,ब्रह्मसूत्र, भगवद्गीता अशी प्रस्थानत्रयी आहे. प्रस्थान म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे म्हणजे प्रेयसाकडून श्रेयसाकडे, प्रवृत्तीकडून निव्रुत्तीकडे हा जीवनाचा प्रवास आहे. आत्मोन्नती हे साध्य व प्रस्थानत्रयी हे साधन आहे. 



उपनिषदे संस्कृत मध्ये असून त्यातील तत्वज्ञान अभ्यासाला अवघड आहे . भगवद्गीतेत ते सुलभपणे सांगितले आहे आणि ज्ञानेश्वरांनी तर ते अनेक उपमा, दृष्टांत यांचा उपयोग करून सुलभ मराठी भाषेत आणले आहे. हे तत्वज्ञान जन सामान्यांपर्यंत पोचवण्याचे असामान्य कार्य ज्ञानेश्वरांनी केले आहे.

इये मह्राठियेचिये नगरी ।  ब्रह्मविद्येचा सुकाळु करी ।I  

ही ज्ञानेश्वरी मागील उदात्त बैठक आहे. ज्ञानेश्वरांनी ग्रंथरुपी यज्ञ सिध्दीस नेला. हा यज्ञ सात्विक यज्ञ आहे कारण तो करणे हे कर्तव्य आहे असे मानून फलाची अपेक्षा न ठेवता केला गेला आहे, त्या साठी आवश्यक असे तप केले आहे. या तपश्चर्येतून हा वाक्-यज्ञ  सफल झाला व त्यातून ‘ज्ञानेश्वरी’  नावाचे अमृत निघाले .

पसायदान म्हणजे संत वाङमयातील कौस्तुभमणी आहे.

विश्वात्मक देवाने तोषून (आनंदित होऊन) संतुष्ट अंत:करणाने पसायदान द्यावे अशी प्रार्थना केली आहे. संताचे हे पसायदान व्यत्त्तिगत हितासाठी नसते तर अखिल सजीवस्रुष्टीच्या कल्याणासाठी या शुभकामना असतात.  ”जे जे जगी जगते तया , माझे म्हणा करुणा करा” अशी ती विश्वव्यापी प्रार्थना असते. ज्या वेळी कोणताही यज्ञ सिध्दीस जातो त्या वेळी वैदिक संस्कृती प्रमाणे पसायदान म्हणजे कृपाप्रसाद मागण्यात येतो. संत ज्ञानेश्वरांनी मागितलेलें पसायदान म्हणजे संत वाङमयातील झगझगीत कौस्तुभमणी आहे.

पसायदानाच्या ओव्या म्हणजे विश्वा एवढ्या व्यापक झालेल्या अंतःकरणाने , विश्वात्मक देवाजवळ , विश्वाच्या कल्याणासाठी केलेले मागणे आहे. इथे देणारा, मागणारा, आणि मागितले गेलेले हे सर्वच एवढे मोठे आहे कि त्यांच्या दर्शनाने  माणसाचे लहानपण सरून जाते. या अपूर्व मागण्यामागील श्रीज्ञानदेवांचे हृद्गत काय असावे, याचा शोध त्यांनाच वाट पुसत या विवेचनात घेण्याचा प्रयत्न केला आहे. 

संदर्भ -

1 प्रा. राम शेवाळकर युट्युब 

2 डॉ. शंकर अभ्यंकर (इंटरनेट , युट्युब) 

3 डॉ. सुषमा वाटवे , (स्वामी माधवनाथ प्रवचन आधारित) 

4 देगलूरकर महाराज , पंढरपूर

(Main REF धुंडामहाराज आणि भानुदास देगलूरकर +  स्वामी विज्ञानानंद यांच्या लेखन, विवेचनातील विविध अध्यात्म संदर्भ) . 


विजय रा. जोशी. 



पसायदान भाग 2, ध्वनी फीत 


 

पसायदान भाग १ , ध्वनी फीत 


संत ज्ञानेश्वर--पसायदान

ज्ञानेश्वरी हा ग्रंथ तत्त्वज्ञान आणि काव्य यांचा मनोज्ञ संगम आहे. तत्वज्ञानाचे रहस्य मधुर काव्यरचनेतून उलगडून दाखवले आहे. आपल्या वैदिक तत्वज्ञानामध्ये उपनिषदे ,ब्रह्मसूत्र, भगवद्गीता अशी प्रस्थानत्रयी आहे. प्रस्थान म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे म्हणजे प्रेयसाकडून श्रेयसाकडे, प्रवृत्तीकडून निव्रुत्तीकडे हा जीवनाचा प्रवास आहे. आत्मोन्नती हे साध्य व प्रस्थानत्रयी हे साधन आहे. 



उपनिषदे संस्कृत मध्ये असून त्यातील तत्वज्ञान अभ्यासाला अवघड आहे . भगवद्गीतेत ते सुलभपणे सांगितले आहे आणि ज्ञानेश्वरांनी तर ते अनेक उपमा, दृष्टांत यांचा उपयोग करून सुलभ मराठी भाषेत आणले आहे. हे तत्वज्ञानजनसामान्यांपर्यंत पोचवण्याचे असामान्य कार्य ज्ञानेश्वरांनी केले आहे.

इये मह्राठियेचिये नगरी ।  ब्रह्मविद्येचा सुकाळु करी ।I  

ही ज्ञानेश्वरी मागील उदात्त बैठक आहे. ज्ञानेश्वरांनी ग्रंथरुपी यज्ञ सिध्दीस नेला. हा यज्ञ सात्विक यज्ञ आहे कारण तो करणे हे कर्तव्य आहे असे मानून फलाची अपेक्षा न ठेवता केला गेला आहे, त्या साठी आवश्यक असे तप केले आहे. या तपश्चर्येतून हा वाक्-यज्ञ  सफल झाला व त्यातून ‘ज्ञानेश्वरी’  नावाचे अमृत निघाले .

पसायदान म्हणजे संत वाङमयातील कौस्तुभमणी आहे.

विश्वात्मक देवाने तोषून (आनंदित होऊन) संतुष्ट अंत:करणाने पसायदान द्यावे अशी प्रार्थना केली आहे. संताचे हे पसायदान व्यत्त्तिगत हितासाठी नसते तर अखिल सजीव स्रुष्टीच्या कल्याणासाठी या शुभकामना असतात.  ”जे जे जगी जगते तया , माझे म्हणा करुणा करा” अशी ती विश्वव्यापी प्रार्थना असते. ज्या वेळी कोणताही यज्ञ सिध्दीस जातो त्या वेळी वैदिक संस्कृती प्रमाणे पसायदान म्हणजे कृपाप्रसाद मागण्यात येतो. संत ज्ञानेश्वरांनी मागितलेलें पसायदान म्हणजे संत वाङमयातील झगझगीत कौस्तुभमणी आहे.

पसायदानाच्या ओव्या म्हणजे विश्वा एवढ्या व्यापक झालेल्या अंतःकरणाने , विश्वात्मक देवाजवळ , विश्वाच्या कल्याणासाठी केलेले मागणे आहे. इथे देणारा, मागणारा, आणि मागितले गेलेले हे सर्वच एवढे मोठे आहे कि त्यांच्या दर्शनाने  माणसाचे लहानपण सरून जाते. या अपूर्व मागण्यामागील श्रीज्ञानदेवांचे हृद्गत काय असावे, याचा शोध त्यांनाच वाट पुसत या विवेचनात घेण्याचा प्रयत्न केला आहे. 

संदर्भ -

1 प्रा. राम शेवाळकर युट्युब 

2 डॉ. शंकर अभ्यंकर (इंटरनेट , युट्युब 

3 डॉ. सुषमा वाटवे , (स्वामी माधवनाथ प्रवचन आधारित) 

4 देगलूरकर महाराज , पंढरपूर

(धुंडामहाराज आणि भानुदास देगलूरकर +  स्वामी विज्ञानानंद यांच्या लेखन, विवेचनातील विविध अध्यात्म संदर्भ) . 


विजय रा. जोशी. 



Wednesday, June 2, 2021

 

गीता अध्याय 18, भाग 2, ध्वनी - फीत.


पूर्णत्व स्थिती प्रयत्न.

काम्य निषिद्ध कर्मांचा त्याग.

स्वधर्माचे निष्काम बुद्धीने आचरण.

सद्गुरू यांचा ज्ञानोपदेश मिळतो.

पण साधक तीव्र अधिकारी नसल्याने त्याची वृत्ती एकदम ब्रह्मरूप होत नाही.गुरूंनी सांगितलेल्या उपदेशाचा तो पुनःपुन्हा अभ्यास करून आपली बुद्धी शुद्ध करतो. मग ती बुद्धी आत्म चिंतनात रत होते. इंद्रियांचा निग्रह करून विषय वासना नाहीशी झाल्यावर मग तो इंद्रिये व मन योग धारणेकडे लावतो.मग इष्ट / अनिष्ट गोष्टींबद्दल प्रेम अथवा खेद काहीच उरत नाही.




जीवन आहे तिथ पर्येंत संपूर्ण त्याग अशक्य.

एखादा रागावला असेल तर फार ओरडा करून किंवा बिलकुल न बोलून राग प्रकट करेल. ज्ञानी पुरुष लेशमात्रही क्रिया करीत नाहीत, परंतु कर्म अनंत करतात. त्यांचे केवळ अस्तित्वच अपार लोकसंग्रह करू शकते. त्यांचे हात, पाय कार्य करत नाहीत तरीही तो काम करतो. क्रिया सूक्ष्म होत जाते कर्म वाढत जाते. विचारांचा हा ओघ पुढे नेला तर असे म्हणता येईल की चित्त परिपूर्ण शुद्ध झाले म्हणजे क्रिया शून्यरुप होईल व कर्म अनंत होईल.आधी तीव्र, तीव्रातून सौम्य, त्यातून सूक्ष्म व सूक्ष्मातून शून्य असे ओघानेच क्रियाशून्यत्व प्राप्त होईल. पण मग अनंत कर्म आपोआप घडेल. 

गीता महती आणि फळ. 

हि गीता म्हणजे संसारात शिणलेल्या लोकांना विश्रांतीची जागा आहे. जो कायावाचामने करून गीतेची सेवा करेल त्याला संसारातील दुःख भासणार नाहीच, शिवाय ; अचिंत्य अशा ब्रह्माचा आनंद उपभोगास मिळेल. गीता हि प्रभू श्रीकृष्णाची वांग्मय-मूर्ती आहे. विश्व सुख-दुःखाने ग्रस्त झालेले पाहून भगवंताने हा ब्रह्मानंद अर्जुनाचे निमित्त करून सर्वांना उपलब्ध करून दिला आहे. गीतेचा अर्थ समजून घेऊन त्याप्रमाणे जो वर्तन  करील, जो नित्य श्रद्धा पूर्वक श्रवण, पठण करील त्याचे सर्व श्रेयस असेच होईल.

पसायदान / प्रार्थना 

माउलींनी ग्रंथाचा शेवट करतांना मराठी वांग्मयात अमर होऊन राहिलेले अलौकिक पसायदान ज्ञानेश्वर आपल्या गुरुंजवळ मागतात. खळ व दुष्ट लोकांचा उद्धार होऊन ते ईश्वरनिष्ठ कसे होतील याची काळजी माउलीला लागलेली स्पष्ट दिसते. म्हणून त्यांच्याबद्दल माउली प्रथम कळकळीने प्रार्थना करते. 

जगांतील खळ आणि दुष्ट लोकांच्या वृत्तीत पालट पडून , दुष्ट कर्मे टाकून सत्कर्मे करावी अशी त्यांना बुद्धी व्हावी. जगातील सर्व लोकांनी एकमेकांशी बंधुभावाने वागावे. सगळीकडे धर्माची वाढ होऊन सर्व सुखी व्हावेत. त्यांनी भगवंताची सेवा करण्यात आयुष्य घालवावे. व हे घडून येण्यासाठी संत, महात्मे यांचे वास्तव्य या पृथ्वीतलावर निरंतर असावे. …. 

‘सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज।

अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः।।18.66।।

माणसाचा धर्म एकच आहे. तो म्हणजे त्याला चिकटलेला ‘त्व’. हा ‘त्व’ समजायचा. ‘त्व’ मध्ये सारे जग येते, सर्व जगाशी एकरूप होणे, अद्वैत साधणे – म्हणजे “सर्व धर्मान परित्यज्य” ही स्थिती. गीता ऐकून संजय निर्भय झाला. गीता वाचून, त्यातील शिकवणीचे अनुकरण करून तीच निर्भयता माणसात येईल. “निर्भयता’ हेच गीतेचे फलीत आहे.

हरी ओम तत्सत ब्र्हमार्पणमस्तु II 


विजय रा. जोशी. 



गीता अध्याय 18, भाग 2, ध्वनी - फीत.


 

गीता अध्याय 18, भाग १, ध्वनी - फीत.


गीता मंदीर

वेद रत्नांच्या डोंगरावर उपनिषदांच्या पठारातून उत्तम रत्ने काढून शिल्पज्ञ व्यासांनी हे गीता-रत्न-मंदीर तयार केले आहे. १८ वा अध्याय या गीता-मंदिराचा कळस आहे. हा अध्याय म्हणजे जणू काही एकाध्यायी गीता आहे. १८ अध्याय व ७०० श्लोक मिळून एकच सिद्धांत गीतेने सांगितला आहे. तो म्हणजे जीवाच्या मागचे संसार दुःख जाण्यास जे कर्म करायचे ते समजण्यास “ज्ञान” हाच एक उपाय आहे. हे ज्ञान गीता देते. हा अठरावा अध्याय नाही, तर हि एकाध्यायी गीताचं आहे. 




अध्याय श्लोक-संगती. 

श्लोक १ ते १७. त्याग मीमांसा – ज्या पुरुषाच्या हृदयात “मी कर्ता आहे” ही भावना नाही, तो सर्व लोकाना मारूनही कोणाला मारत नाही. आणि मारण्याच्या कर्माचा दोष (बंधन) त्याला लागत नाही.

श्लोक १८ ते ४० (अध्यायाचा पूर्वार्ध). – सत्वभावाने रज-तम कर्म दूर करा (कर्मत्याग} आणि फळ त्यागाने सत्व शुद्ध करा. (फलत्याग)

श्लोक ४१ ते ५६. उजळणी – आत्ता पर्येंत जी साधना सांगितली ती अध्यायाच्या उत्तरार्धात भगवान पुन्हा सांगतात.

श्लोक ५७ ते ६३ (६६) –भगवान सांगतात की मी जे  काही सांगितले त्यावर स्वतंत्र बुद्धीने विचार कर. मग जे योग्य वाटेल ते कर. नंतर सांगतात – आपल्या स्वतंत्र बुद्धीने मला शरण ये. (१८८/६६). 

(पुढील श्लोक – फलश्रुती)

नित्य/नैमत्तिक कर्मे अवश्य केली पाहिजेत, पण फळ घेऊ नये. काम्य कर्मे (मनात वासना ठेऊन केलेली कर्मे) चुकून सुध्दा करू नयेत. कर्मे तर करावीच लागतात. कर्मदोष योग्य कर्मानेच दूर होऊ शकतो.

तामसी त्याग –   शैथिल्य, आळशी पणामुळे विहित, कर्तव्य कर्माचा त्याग.

राजस त्याग – देहास कष्ट होऊ लागले म्हणून केलेला कर्म त्याग.

सात्विक त्याग – विहित कर्मे यथायोग्य करून, कर्तुत्व-मद व  फालास्वादाचा त्याग.

सुटकेचा एकमेव उपाय – कर्म करून कर्म-बंधनातून जे मुक्त झाले त्या पुरुषांची रहाणी (शिकवण) डोळ्यासमोर ठेऊन त्याचा निरंतर विचार व त्याप्रमाणे स्वतःचे वर्तन. (उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे .कोणत्या कर्माचा त्याग करावयाचा आणि कोणत्या कर्मफलांचा त्याग करायचा हे नीट कळले पाहिजे. (ते या अध्यायात समजावून सांगितले आहे). 

यात एक नक्की आहे की , नित्य - नैमित्तिक कर्माचा कोणीही त्याग करू नये (स्वधर्म, स्वकर्तव्य वगैरे?). पण ती दक्षता पूर्वक, म्हणजे सावधपणे कर्तृत्व मद आणि फलास्वाद टाकून करावी. (१८/११०-१७७ , श्लोक १ ते ६)). 

पुढील भाग ऑडिओ मध्ये ऐकावा. 


विजय रा. जोशी.



Thursday, May 20, 2021

 

गीता अध्याय 17, भाग 2, ध्वनी - फीत.




यज्ञ, दान, तप आणि जीवन.


जन्मल्या बरोबर मनुष्याचा संबंध स्वतःच्या शरीराशी, समाजाशी (अन्य व्यक्ती) व सृष्टीशी येतो. स्व-शरीराचा वापर, अन्य व्यक्तींची मदत व सृष्टी/निसर्ग यामधील गोष्टींचा वापर करीत, त्याना झिजवून माणूस जीवन जगत असतो. या क्षति/पूर्तीसाठी तप, दान व यज्ञ हा कार्यक्रम जीवनात सांगितला आहे.



तप – शरीर सेवा / शरीर शुद्धी.

दान – मानव सेवा.

यज्ञ – सृष्टीची / निसर्गाची सेवा.


आपण योग्य, अयोग्य अनेक संस्था निर्माण करतो. पण वरील तीन संस्था आपण निर्माण केलेल्या नाहीत, त्या स्वभावतः आपल्याला मिळाल्या आहेत. या संस्था कृत्रिम नाहीत. या संस्था आपण वापरतो, त्यांची क्षती करतो. या तिन्ही संस्थाचे काम उत्कृष्ठ चालेल असे वागणे हे आपले कर्तव्य आहे. हा आपला स्वभाव-प्राप्त

धर्म आहे कारण यज्ञ, दान, तप यांनी हे साधेल.  

यज्ञाने - सृष्टी संस्थेत साम्यावस्था प्राप्त होते. 

दानाने - समाजात समता प्राप्त होते . (दान, सन्मान , संगतीकरण - यज्ञ त्रिसूत्री). 

तपाने - शरीर शुद्धी होते. शरीराची दिवसे-दिवस झीज होत असते. 

आपण मन, बुद्धी, इंद्रिये यांना वापरतो, झिजवितो. या शरीर रूप संस्थेत जे विकार, जे दोष, उत्पन्न होतील, त्यांच्या शुद्धी  साठी तप  सांगितले आहे. 


मानवी जीवनाला मुलभूत असलेल्या ५ गोष्टी 


पुजाभाव / श्रद्धा 

आहार.

यज्ञ.

तप.

दान 


ओम तत् सत - 


अनादि , निर्गुण , निराकार परब्रह्माला ‘नाव’ नाही, पण “ओम तत् सत” रुपी परब्रह्माचे  नाव घेऊन सात्विक कर्मे केली, तर मोक्षाप्रत नेण्याचे सामर्थ्य कर्मात आणून ठेवण्याची शक्ती या नावात आहे. संसार तापाने पिडलेल्या लोकांची दया  येऊन श्रुतिमाऊलीने अशा लोकांच्या दुःखमुक्ती आणि ब्रह्मप्राप्तीसाठी हे नाव परब्रह्मास दिले आहे. 

“ओम तत् सत”  या नावाने युक्त होऊन सात्विक कर्म केले असता मोक्ष प्राप्ती सुलभ होते. पण हे नाव कसे घ्यावे, हे मात्र कळले पाहिजे.

या बद्दल सविस्तर माहिती या भागात  ऎका , गीता ज्ञान आत्मविकास साधण्यात खूप महत्वाचे आहे याचा अवश्य अनुभव घ्या. 



विजय रा. जोशी. 




गीता अध्याय 17, भाग 2, ध्वनी - फीत.







 

गीता अध्याय 17, भाग १, ध्वनी - फीत.


गीता शास्त्र - गीतेत जे जीवनाचे शास्त्र  सांगितले आहे, ते तसेच प्रमाण मानले तर, ग्रंथपूजा होईल. गीता हे एक प्रयोगशील (प्रयोगात्मक) शास्त्र आहे. एका निश्चित प्रक्रियेने ‘गीता शास्त्राचा’ प्रत्यक्ष अनुभव घेऊन (तो अनुभव तसे वागूनच येईल), कोणीही व्यक्ती समाधान घेऊ शकते. शक्यता/योग्यता असल्यास संशोधन करू शकते. अशी  वैज्ञानिक पद्धती, गीता शास्त्रास लागू आहे. (वेलोर प्रवचने). 



बुद्धीचे काम ज्ञान सांगण्याचे आहे. या ज्ञानावर स्थिर करण्याचे काम श्रद्धेचे आहे. काही लोक श्रद्धा व बुद्धी यांना परस्पर-विरोधी मानतात. पण ते तसे नाही. दोन्हीची आवश्यकता आहे. बुद्धिहीन श्रद्धा असेल तर डोळे मिटून चालणे आहे (अंधश्रद्धा). श्रद्धाहीन बुद्धी असेल तर अनेक वेळा कार्य घडत नाही, जीवन व्यर्थ जाते. (संशयात्मा विनश्यति).

स्वभाव म्हणजे पूर्वकाळ / पूर्वजन्म यात केलेल्या पुण्यापुण्याच्या संचयामुळे उत्पन्न झालेली मनोघटना. स्वभाव म्हणजे ज्ञान (विचार) शक्ती, किंवा क्रिया शक्ती यांचा मनावर झालेला परिणाम. ज्ञानशक्ती किंवा क्रियाशक्ती जेवढी तीव्र तेवढा परिणामही तीव्र असतो.

भगवंत शेवटी सांगतात : 

शुद्ध सत्वगुणांनी युक्त होऊन शास्त्रविहित कर्म केले (किंवा असे कर्म करणार्यावर श्रद्धा ठेवून त्यांचे अनुकरण केले), तर उत्तम लोक-लोकांतराचे फळ जीवाला मिळेल. पण त्यात आणखी एका गोष्टीची भर घातली तर साक्षात मोक्षाची प्राप्ती होईल. 

अशी कोणती गोष्ट आहे , ती जाणून घेण्याची उत्कंठा अर्जुनास लागून राहिली. 

ती पाहून भगवान ती वस्तू आणि तिचे महात्म्य सांगत आहेत. अशा रीतीने , एरवी जीवाला जन्म-मरणाच्या संसारात बांधणाऱ्या यज्ञदानादि कर्मांना त्यांच्या कर्त्यांसह ब्रह्मपर्येत पोहोचविण्याचे सामर्थ्य “ओम तत् सत “ या नामामध्ये आहे. परंतु असे समर्पण न करता नुसतीच मोठमोठी   ‘यज्ञ दान तप ‘ अशी कर्मेच करीत बसल्यास त्यांच्या या तपःचर्या , दाने सर्व फुकट जातील. त्यांना ऐहिक भोगही मिळणार नाहीत, परलोकाची गोष्ट तर बोलायलाच नको. 

ओम तत् सत -  या विषयी सविस्तर माहिती आपण पुढील भागात बघणार आहोत,  


विजय रा. जोशी. 




गीता अध्याय 17, भाग १, ध्वनी - फीत.


Friday, May 7, 2021

 

स्वामी विज्ञानानंद : मानवता कल्याणासाठी समर्पित जीवन


संकल्प दिन - २३ एप्रिल हा स्वामी विज्ञानानंद (स्वामीजी) यांचा जन्मदिवस. मनशक्ती साधक हा दिवस ‘संकल्प’ दिन म्हणून पाळतात. या दिनानिमित्त दि २५ एप्रिल २०२१ रोजी online घेतलेला पाठ. 

स्वामीजी २१ फेब्रुवारी १९७१ ला सकाळी समाधी प्रयोग करणार होते. त्या क्षणाचे अपूर्व अनुभव कथन एक आगळे, विचार क्षोभक प्रयोगपूर्ण संवेदन . जे त्यांनी सांगितले ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

समाधी स्थितीत देह काही काळ सोडून परत देहात येण्याचा आणि त्यामधील काळात काही संशोधन/प्रयोग करण्याचा , त्याचा अनुभव इतरांना देण्याचा हा  एक अगोदर सार्वजनिकरित्या जाहीर केलेला विलक्षण प्रयोग सुरु होण्याच्या अगोदर काही मिनिटे थांबविला गेला. 

हा प्रयोग काय होता, कशासाठी होता, त्यात काय साध्य करायचे होते, त्यासाठी किती दीर्घ काळ पूर्व तयारी केली होती, आणि तो का संपन्न होऊ शकला नाही यावर आणि इतर संबंधित गोष्टींवर नंतर स्वामीजींच्या जे सविस्तर निवेदन प्रसिद्ध केले, त्यातील काही भागावर आधारित  हा ऑडिओ पाठ आहे. 

स्वतःची सर्व साधना आणि अभ्यास , स्वामीजींनी   विज्ञान आणि अध्यात्म याचा समन्वय  करून मानवी जीवन/व्यवहार कसा योग्य, अर्थपूर्ण होऊ शकेल यावर मार्गदर्शन करण्यासाठी उपयोगात आणला. त्यातील हा न साधू शकलेला समाधी प्रयोग आणि त्याची सर्व हकीगत  सर्व श्रोत्यांना  नक्कीच विलक्षण आणि प्रेरणादायी वाटेल. 



विजय रा. जोशी. 



स्वामी विज्ञानानंद : मानवता कल्याणासाठी समर्पित जीवन

Thursday, April 29, 2021

  

गीता अध्याय 16, भाग २, ध्वनी - फीत.



६ वा अध्याय आपल्या रक्तात भिनला पाहिजे. 

अध्याय आत्म-परीक्षणाचा , स्वतःला प्रामाणिकपणे ओळखण्यास सहाय्य  करणारा, आणि स्वतःची गुणात्मक प्रगती घडविण्यासाठी अत्यंत उपयुक्त. एखादा एखादी गोष्ट उत्तम शिकला उदा गायन, अभिनय तर आपण म्हणतो कला त्याच्यात पूर्ण भिनली आहे. ज्ञान, शौर्य, भीती त्याच्या रक्ताच्या थेंबा थेंबात आहे असे आपण वेगवेगळ्या व्यक्तींच वर्णन करतो. या पद्धतीने आपल्या चितात हा अध्याय धारण करायला हवा.
  

भौतिक जीवन व भोग वृत्ती. 

भौतिक जीवनही कामाला ताब्यात ठेवूनच सुखी होईल असे गीतेचे सांगणे आहे. स्त्री-पुरुष संबंध उत्तरोत्तर उच्च करायचे असतील तर मन/आत्म्याचा विचार हवा. ज्या समाजास फक्त शरीर सुखातच धन्यता वाटते  त्या समाजाची उत्साहशक्ती, जीवनशक्ती, धारणाशक्ती या नष्ट झालेल्या दिसतात. 

मानवा-मानवाशी असलेले संबंध जर उन्नत व विकसित करायचे असतील तर काम, क्रोध, लोभ रहीत (संयमित) समाज व व्यक्ती व्हावी अशी भगवंतांची इच्छा आहे.

या संयमाचे शास्त्र संतांच्या जीवनात, अनुभवात आपणास दिसेल. 

स्वतःच्या जीवनात प्रयोग करून संतांना जे सिद्धांत लाभले, त्याचे शास्त्र बनते.

आम्ही वैकुंठवासी | आलो याचि कारणासी | बोलिले जे ऋषि | साच भावे वर्ताया |

झाडू संतांचे मारग | आडरानी भरले जग | उच्छिष्टाचा भाग | शेष उरला तो सेवू |

अर्थे लोपली पुराणे | नाश केला शब्दज्ञाने | विषयलोभी मने | साधने बुडविली |

पिटू भक्तीचा डांगोरा | कळिकाळासी दरारा | तुका म्हणे करा | जयजयकार आनंदे || ५२०||

आसुरी संपत्ती टाळावी व दैवी संपत्ती कवटळावी. सद्गुण अंगी बाणल्याने वैयक्तिक विकास साधला, व्यक्ती विकास साधला तरी समष्टीचा विकास रहातोच. व्यक्तीने आपला विकास साध्य करत समाज, राष्ट्र यांतील लाखो व्यक्तींच्या विकासास सहाय्यभूत  व्हायचे असते.

जीव, जगत , जगदीश यांचे संपूर्ण पणे ज्ञान व संबंध करवून देते ते शास्त्र. जीवन म्हणजे काय ते समजावून आपल्याला खऱ्या अर्थाने जीवनात यशस्वी होण्यास मदत करणारे, ते शास्त्र. म्हणून शास्त्र सोडून चालणार नाही. 

दैवी गुण अंगी येण्यासाठी अखंड साधना

असतो  मा सतगमय I तमसोमा ज्योतिर्गमय I 

मृत्योर्मा अमृतमगमय I 

असत, तमस व मृत्यू या माझ्या स्थिती आहेत त्यातून मला सत , ज्योती व अमृत व्हायचे आहे. म्हणूनच मला प्रयत्नशील रहायला हवे असे समजून खरा साधक आत्मविश्वासाच्या बाबतीत,प्रभुकार्याच्या बाबतीत सतत प्रयत्नशील असतो. आणि दैवी गुण अंगी येण्यासाठी अखंड साधना करतो.  

माणसाचे मन कसे आहे, कसे असावे हे १६ व्या अध्यायात कळत.

त्याच मर्म असं आहे की ..माणसाने असं वागावं, त्याच मन असं असाव, की शेवटी ‘आसवं’ गाळण्याची पाळी येऊ नये. साधनात मी गुंतून पडू नये. आणि साध्याचा विसर मला कधी पडू नये. जो संपत्तीला, साधनाना आदराने वागवितो त्याचा कधी अनादर होत नाही. या अध्यायातले सर्व विचार स्वतःचे सर्वांगीण प्रगतीसाठी अत्यंत उपयुक्त वाटतील. 



विजय रा. जोशी. 



गीता अध्याय 16, भाग २, ध्वनी - फीत.




  गीता अध्याय 16, भाग १, ध्वनी - फीत.



गीताशास्त्र सर्वांना उपयोगी : उच्च आणि नीच स्थिती मधील सर्व माणसांसाठी.




हे सर्व आदर्शवत आहे. पण सर्वसामान्यांनी येथ पर्येंत पोहोचण्यासाठी काय केले पाहिजे, वास्तविक परिस्थिती काय आहे, हे समजावून घेण्यासाठी १६ वा अध्याय उपयुक्त आहे. कारण येथे मानवाची उच्च स्थिती (दैवी संपत्ती) आणि नीच स्थिती (आसुरी संपत्ती) याचे दर्शन घडविले आहे. आणि मग नीच स्थितीकडून उच्च स्थितीकडे जाणे कसे आवश्यक आहे तेही समजावून सांगितले आहे. 

कुरुक्षेत्र बाहेरही आहे आणि आपल्या मनातही आहे. सूक्ष्म रीतीने पाहिले तर जो झगडा मनात असतो तोच बाहेर आपणास मूर्तिमंत दिसत असतो. बाहेर जो शत्रू उभा आहे तो माझ्याच मनातील विकार साकार होऊन उभा आहे. जागेपणाचे विचार जसे मला स्वप्नात दिसतात तसे मनातील विचार मला बाहेर (बाह्य जगात) दिसतात. आपल्या अंतःकरणात एका बाजूला सद्गुण तर दुसऱ्या बाजूस दुर्गुण उभे आहेत. या दोन्ही मिळून आपले व्यक्तिमत्व साकार झाले आहे. जे खरे युध्द आहे ते आंतच आहे. १६ व्या अध्यायात आत्म-परीक्षण करण्या साठी भरपूर माहिती उपलब्ध आहे.

जडवाद, निरीश्वरवाद आणि भोगवाद.

केवळ स्वार्थ साधण्याची प्रवृत्ती असते. त्याकरताच बुद्धीचा उपयोग केला जातो. असुरी लोक समजतात की ‘स्वार्थ साधला कि सगळे झाले’. व आपल्या स्वार्थाला अनुरूप प्रवृत्तीत ते मग्न असतात. त्यांच्या अशा प्रवृत्तीमुळे त्यांच्यावर कसलेही बंधन किंवा अंकुश नसतो. व यांना कोठल्याही आचारसंहितेची गरज वाटत नाही. जसा स्वार्थ साधेल तसेच काम करणे हि त्यांची सहज प्रवृत्ती असते. आणि म्हणून, ज्यामुळे स्वार्थही साधला जाऊन आत्मिक विकास देखील घडू शकेल असे प्रवृत्ती व निवृत्तीचे सिद्धांत त्यांना मान्य नसतात. 

माऊलींचे जनप्रेमी कोमलहृदय. 

 आसुरी संपत्तीच्या लोकांना ज्या थोर यातना भोगाव्या लागतात त्याचे वर्णन करतांना श्रीज्ञानदेवांच्या अंगावर शहारे येऊन त्यांची वाणी रडकुंडीला आलेली दिसते व ‘हे असुरी लोक का बरे असे वागतात? असे निराशेचे पण कळवळ्याचे उद्गार त्यांच्या मुखातून निघतात. (४१७-२४)

म्हणोनि तवा धनुर्धरा,I  नोहावे गा तिया मोहरा I  

जेवता वासू असुरा I संपत्तीवन्त II (४२३) 

आणि दंभादी दोष साही I हे संपूर्ण जयांच्या ठायी I 

ते त्यजावे हे काई I  म्हणो कीर II (४२४)

म्हणून अर्जुना ! ज्या ठिकाणी आसुरी संपत्तीवाल्यांचे राहणे असेल , त्या बाजूला तू जाऊ नकोस. आणि दंभादी करून सहा दोष सर्वांच्या सर्व ज्यांच्या ठिकाणी असतील , त्यांचा त्याग करावा, हे खरोखरच सांगितले  पाहिजे का ? (४२३-२४)

बुडते हे जन न देखवे डोळा I येतो कळवळा म्हणउनी : संत  तुकाराम 

“आसुरी  गुणांचा त्याग करून दैवी गुणांचा अंगीकार करावा ”  हा संदेश श्रीकृष्ण भगवान यांचे पासून माउली , तुकोबाराय आणि अनेक संत महात्मे आपल्या पर्येंत पोहोचविण्याचा असा अथक प्रयत्न करत आहेत.  स्वतःचे जीवनात तसे वर्तन करून आपल्यासमोर आदर्श ठेवत आहेत , त्यांच्या पुण्यकार्याला मनोमन वंदन करून त्यांचा उपदेश आपल्या जीवनात शक्य तेवढा उतरविण्याचा संकल्प आपण करू या. 

या अध्यायातील वरील सूत्राला धरून केलेले विवेचन आपणास नक्कीच उपयुक्त वाटेल अशी खात्री आहे. 


विजय रा. जोशी 



गीता अध्याय 16, भाग १, ध्वनी - फीत.


Thursday, April 22, 2021

 

गीता अध्याय 15, भाग २, ध्वनी - फीत.


जग – श्लोक   ( १ ते ५). जीव –  श्लोक (६ ते 11).

हा भाग पाहून झाला. आता पुढील भाग :

जगदीश –  (श्लोक   १2 ते १५). जगदीशाचे श्रेष्ठत्व. –(श्लोक  १६ ते २०).


या संसारात क्षर आणि अक्षर असे दोन पुरुष आहेत. सर्व भुते म्हणजे क्षर, आणि मायोपाधीने (माया -उपाधीने)  
युक्त असे जे चैतन्य त्यास अक्षर असे म्हणतात. (१५/१६)

पण या दोहोंहून वेगळा, ज्याला परमात्मा असे म्हणतात, जो त्रैलोक्यात प्रवेश करून त्यास धारण करतो व जो अव्यय व ईश आहे, असा उत्तम पुरुष आहे. (१५/१७) 

ज्या अर्थी मी (परमात्मा) क्षराच्या पलीकडचा आहे आणि अक्षराहून देखील उत्कृष्ठ आहे  , त्या अर्थी (म्हणून) जगामध्ये आणि वेदामध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे.  (१५/१८)

जो ज्ञानी; या प्रकारे मला, पुरुषोत्तमाला जाणतो, तो सर्वज्ञ होय. तो (स्वतः सकट सर्व माझे स्वरूप आहे असे जाणून ) सर्व प्रकारे माझी भक्ती करतो.    (१५/१९)

हे पापरहिता, या प्रमाणे हे अत्यंत गुह्य शास्त्र मी तुला सांगितले. याचे ज्ञान करून घेऊन मनुष्य बुद्धिमान आणि कृतकृत्य होतो. (१५/२०).

हे शास्त्र तसे अवघड आहे. भगवंतांनी ते सोपे करून सांगितले आहे , तरी ते आपल्या डोक्यात उतरत नाही. श्रोता व वक्ता यांचा हृदयाचा मिलाफ झाला तरच गीता कळेल. भगवंत सांगतात, हे समजून घे, बुद्धिमान हो. बुद्धिमान याचा अर्थ शहाणा हो असे नाही, विद्यापीठात पहिला नम्बर मिळव असाही नाही, तर बुध्दीवान हो याचा येथे अर्थ ‘आत्मसाक्षात्कारी हो’ असा आहे. 

एकीकडे भोगशक्ती आहे, दुसरीकडे ज्ञानशक्ती आहे, त्यात बुद्धी ‘अहं ‘ ला पकडून भोगशक्तीकडे न वळता ज्ञानशक्तीकडे वळली तर बुद्धिमान होता येईल. आपण आत्मसाक्षात्कारी व्हावे आणि कृतकृत्य व्हावे असे सूचित  करून भगवंतांनी हा अध्याय पूर्ण केला आहे. 

मनुष्याचा आत्म विकास कसा होतो / व्हावा - हे सर्व या अध्यायात भगवंतांनी समजावले आहे. हि शिकवण सर्व मानवमात्रांस उपयुक्त आहे. त्या संबंधी माहिती आपण ऐकाल. 



विजय रा. जोशी. 




गीता अध्याय 15, भाग २, ध्वनी - फीत.


 

गीता अध्याय 15, भाग १, ध्वनी - फीत.  



मी कूठून आलो?  हे सर्व जग कुठून आलं ?




माझा जन्म आई/वडिलांमुळे झाला. त्यांचा ; त्यांच्या आईवडिलांमुळे,  असे मागे मागे जात राहिले तर आपण आदी-मानव पर्येंत पोहोचतो, मानवाचे निर्माण एक पेशीय जीवापासून झाले असे विज्ञान सांगते. अमिबापासून माणूस बनला. पण अमिबा कशातून बनला? जगातल्या पहिल्या  पेशींचे निर्माण कसे झाले त्याचे उत्तर शोधतांना  आपण, व्हायरस, आणि कोअसर्व्हेट ड्रॉप्स (विशिष्ठ प्रकारचे सेंद्रिय क्षारयुक्त जलबिंदू) येथे पोचतो. (संदर्भ -  पुस्तक Mind Power by Swami Vijnananand). 

त्या जलबिंदूंची निर्मिती  पृथ्वीमुळे. पृथ्वीतील गोष्टींमुळे. 

पृथ्वी -- सूर्य, -- सविता देवता --  परमात्मा का तेजपुञ्ज ब्रह्म

तर अशा तर्हेने आपण स्वतःचा विचार करताना मूलगामी शोध घेतला तर परमात्म्या पर्येंत पोहोचतो. या सर्व शोध जिज्ञासेची पूर्ती करायची असेल तर गीता मार्गदर्शन करण्यास सदैव उभी आहे . ते या गीतेच्या शेवट ६ अध्यायात (विशेषतः अध्याय  १३ते  १५ मध्ये) दिलेले आहे म्ह्णून यास ज्ञान कांड / ज्ञान योग असे म्हणतात.  

येथे असे सांगितले आहे कि तुम्ही ‘पुरुषा’ चे अंश (क्षेत्रज्ञ अंश) आहात  तर देह हा प्रकृतीचा अंश (क्षेत्र-अंश) आहे.आणि पुरुष आणि प्रकृती  हि परमात्म्यापासून निर्माण झाली आहे. फक्त तुम्हीच नाही , तर या विश्वात जे जे म्हणून काही आहे ते ते सर्व या क्षेत्र / क्षेत्रज्ञ यापासून बनले आहे. म्हणजेच परमात्म्यापासून बनले आहे.  पण एवढे असून तो परमात्मा कशातही अडकलेला नाही, या सर्व गोष्टींच्या तपशिलांवर प्रकाश टाकणारे हे अध्याय आहेत. हे ज्ञान विचारांच्या म्हणजेच बुद्धीच्या पलीकडे आहे. स्वतःला खऱ्या स्वरूपात पहाण्यासाठी रोज काही काळ ध्यान हा उपाय.

चित्तशुद्धी अनिवार्य

भगवान सांगतात कि या देहात रहाणारा जीवात्मा माझाच सनातन अंश आहे. (माझा चि अंश संसारी झाला जीव सनातन १५/७). त्रिगुणमयी मायेत राहून तो मना सहित पाच इंद्रियांना खेचतो. मग सांगतात कि जीवाचे स्वरूप ओळखण्यासाठी चित्त-शुद्धी व्यतिरिक्त कोठलेही साधन नाही. कधीकधी केवळ बौद्धिक प्रक्रियेने , श्रावण-मननाने ज्ञान होते, 

परंतु चित्त-शुद्धी नसेल तर ते टिकत नाही. अनेक लोक श्रद्धवान असूनही चित्तशुद्धीचे महत्व ओळखत नाहीत असे विनोबाजी सांगतात. चित्त शुद्धी कशी साधायची हे पुढील भागात पाहू .


विजय रा. जोशी. 




गीता अध्याय 15, भाग १, ध्वनी - फीत.

   

Friday, April 16, 2021

 

गीता अध्याय १४, भाग २, ध्वनी - फीत


आपण सात्विक/राजस कि तामस ?




विषयांचा (wantedness) आपल्यावर जितका परिणाम होतो / न होतो, तसेच जितके अहम व आत्मा यांचे अनुसंधान (co-ordination) झालेले असते वा नसते , तितक्या प्रमाणात आपण सात्विक / राजस किंवा तामस ठरणार.अशा तऱ्हेने सतत जागृत राहून (आत्म्याचे अहमशी अनुसंधान ठेऊन) आपले संतुलन सतत ठेवणे ही साधना होय. मी म्हणजे देह ही वृत्ती नैसर्गिक आहे, साधनेने, प्रयत्नाने मी देह नाही तर आत्मा आहे ही जाणीव विकसित करावी लागते . त्यासाठी रोज स्वतः कडे अलिप्ततेने पहायला हवे , म्हणजेच आत्म-परीक्षण करायला हवे . स्वतःचे खरे रूप त्रयस्थ पणाने ओळखून घ्यायला हवे व प्रगतीसाठी प्रयत्न करायला हवे.

शास्त्रात संयम ही एक गोष्ट कसोटी म्हणून सांगितली आहे. मी बाह्य  विषयांपासून दूर राहू शकतो की नाही? (इच्छ्यांपासून अलिप्त होऊ शकतो की नाही?) असा प्रश्न निर्माण होतो तेंव्हा प्रयत्न/आभ्यास करण्यासाठी माणूस कितीतरी गोष्टी सोडू लागतो. यास संयम असे म्हणतात. आपला स्वभाव आपण केलेल्या कृतीने बनत असतो. कृती बदलाने , शुद्ध हेतूच्या निग्रहाने आपण तो बदलू शकतो (तम--रज--सत्व). 

स्व-व्यवस्थापन म्हणजेच गुण व्यवस्थापन. यासाठी संयम, निग्रहाने स्वतःत बदल घडवणे आवश्यक असते. १४ व्या अध्यायात भगवंत हे मार्गदर्शन करतात. या ध्वनिफितीत त्याचे वर्णन आहे. 


विजय रा. जोशी. 



गीता अध्याय १४, भाग २, ध्वनी - फीत


 

गीता अध्याय १४, भाग १, ध्वनी - फीत


एकाच प्रकृतीपासून नानाविध सृष्टी, विशेषतः सजीव सृष्टी  होते याचे आणि विश्व, 

विश्व-निर्माता  आणि मी यात काय नाते/संबंध  आहे? याचे या अध्यायात भगवंत निरूपण करतात. क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे वर्णन केल्यावर प्राणिमात्राला संसारात ओढणारी प्रकृती, तिच्या गुणांची उत्पत्ती, तिचे कार्य, तिचे धर्म, तिचे स्वभाव वगैरे सांगणारा व या त्रिगुणांच्या अतीत कसे व्हायचे हे समजाऊन सांगणारा  हा अध्याय आहे.



श्लोक ५ ते १८   सत्व, रज, तम या तीन गुणांचे वर्णन आहे.

श्लोक १९.       आत्म्याचे निर्गुणत्व सांगितले आहे.

श्लोक २१.       अर्जुन त्रिगुणातीत (माणूस) कसा असतो असे विचारतो.

श्लोक २२ ते २७  त्रिगुणातीताचे वर्णन भगवान करतात.

जशी व्यक्ती आपल्या गुणाने (वर्तनाने) प्रकट होते तशी ही सर्व चराचर सृष्टी (प्रकृती) त्रिगुणांनी प्रकट होते. या संबंधी हा अध्याय आहे.

सत्व, रज, व तम हे तीन गुण सर्व पदार्थांच्या मूलद्रव्यात म्हणजे प्रकृतीत प्रारंभापासून असतात.  या ती गुणांपैकी प्रत्येकाचा जोर आरंभी सारखाच असल्यामुळे प्रथमतः प्रकृती समावस्थेत असते. हि साम्यावस्था जगाच्या आरंभी होती. व जगाचा लय झाला म्हणजे पुनः येईल. साम्यावस्थेत काही हालचाल नाही, सर्वस्तब्ध असते. पण पुढे हे तीन गुण कमीजास्त होऊ लागले म्हणजे प्रवृत्यात्मक रजोगुणामुळे मूळ प्रकृतीपासून निरनिराळे पदार्थ उत्पन्न होऊन सृष्टीला आरंभ होतो. 

मूळ प्रकृती एक असताना हे नानात्व कसे निर्माण होते याचा जो विचार त्याला विज्ञान म्हणतात. व यातच सर्व अधिभौतिक शास्त्रांचा समावेश होतो. माणूस देखील त्रिगुणात्मक आहे. प्रत्येक माणसामध्ये तिन्ही गुण असतात. पण त्यापैकी एक इतर दोहोंपेक्षा वरचढ असतो. या वरचढ गुणा प्रमाणे प्रत्येक माणूस हा सत्वगुणी, रजोगुणी अथवा तमोगुणी मानला जातो.

या सर्वांचे तपशीलवार वर्णन समजण्यासाठी हि ध्वनी फीत जरूर ऐका . 


विजय रा. जोशी. 



गीता अध्याय १४, भाग १, ध्वनी - फीत


Tuesday, April 13, 2021

 

गीता अध्याय १३, भाग 2 , ध्वनी - फीत


ज्ञानाचे ज्ञान, ज्ञान म्हणजे काय, ज्ञान कुणाचे घ्यायचे/ज्ञानेय , ज्ञान घेण्याची प्रक्रिया, ज्ञानी लक्षणे, अज्ञानी लक्षणे, परमेशवराचे व्यक्त, अव्यक्त स्वरूप आणि समन्वय, क्षेत्र, क्षेत्रद्न्य, पुरुष, प्रकृती, इत्यादी. हवेत उड्डाण करण्यासाठी पक्षाला पंख आणि शेपटी दोन्ही हवे. तसे माणसाला अध्यात्मिक भरारी घेण्यासाठी ज्ञान / भक्तीचे पंख आणि कर्माची शेपटी लागते, सर्वांची आवश्यकता आहे, ध्येय एकच आहे. 



क्षेत्र/शेत - शेतात जे पेरू ते उगवते तसेच आपण जे कर्म आयुष्यात करू , त्याप्रमाणे कर्मफळ संचित होते आणि यथाकाल प्रारब्ध रूपाने आपल्यास भोगावे लागते . (क्रियमाण, संचित आणि प्रारब्ध)  आपले क्रियमाण कसे सुधारावे, याचे उत्कृष्ठ ज्ञान गीता देते. 

नम्रता दंभ-शून्यत्व , अहिंसा ऋजुता क्षमा 

पावित्र्य गुरु-शुश्रूषा , स्थिरता आत्मसंयम.              १३/७

निरहंकारिता चित्ती , विषयांत विरक्तता 

जन्म-मृत्यू-जरा-रोग - दुःख-दोष-विचारणा             १३/८

निःसंग वृत्ती कर्मात, पुत्रा दींत   अलिप्तता 

प्रिय-अप्रिय लाभात , अखंड समचित्तता                १३/९

माझ्या ठाई अनन्यत्वें , भक्ती निष्काम निश्चळ 

एकांताविषयी प्रीती , जन-संगात नावड                 १३/१०

आत्म-ज्ञानी स्थिर श्रद्धा , तत्वतां ज्ञेय दर्शन 

हें ज्ञान बोलिले सारे , अज्ञान विपरीत जे                 १३/११. 

ज्ञान - म्हणजे बुद्धीला अमुक अमुक कळणे असे न सांगता  मान व दंभ सुटणे , अहिंसा ,अनासक्ती, सम-बुद्धी इत्यादी वरील पाच श्लोकात सांगितलेले 18  गुण मनुष्याचा अंगात दृष्टीस पडू लागले म्हणजे त्यास ज्ञान म्हणावे अशी ज्ञानाची व्याख्या वरील श्लोकांत केली आहे.  क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांची ओळख पटली पाहिजे. मी कोण आहे? आणि मी कशात रमायला पाहिजे? याचा विवेक एकदा झाला पाहिजे. मला काय पाहिजे? या पेक्षा मला काय हव असायला पाहिजे? याचा विवेक आयुष्यात एकदा जागरूक झाला, की निराळ काही मिळेल. 

खोट्या अहंकारा पासून मुक्ती.

तू खरा कोण आहेस ते ओळखायला शीक. तू भोवती जे खोट्या अहंकाराच वलय निर्माण केल आहेस त्या पासून मुक्त कसा होशील ? कवीने म्हंटले आहे. 

कुणी न येथे भला-चांगला, जो तो पथ चुकलेला, जग हे बंदिशाला.

ज्याची त्याला प्यार कोठडी    कोठडीतले सखे सौंगडी

हातकडी की अवजड बेडी, प्रिय हो ज्याची त्याला प्रिय हो ज्याची त्याला जग हे बंदिशाला

जो तो अपुल्या जागी जखडे    नजर न धावे तटापलीकडे    उंबरातले किडेमकोडे, उंबरीं करिती लीला .

सत्याचे ज्ञान.

तू ज्याला चिकटून बसला आहेस, तो देह तुझा नव्हे , एवढ तू ज्ञान  करून घे. तू देह फक्त एक साधन म्हणून घेतला आहेस. त्या साधनाचा तू अवश्य .वापर कर. त्या देहाच कल्याण करण्याची आवश्यकता आहेच. देह तुला चिकटायला आलेला नसून तू देहाला चिकटला आहेस. आणि  ज्या क्षणी तुझे हे चिकटणे संपेल, त्यावेळी तो देह दुखी होणार नाही.

ही जाणीव तुम्हाला सूक्ष्म अभ्यासाने, ज्ञानाने होते. त्याने हातून चांगले कर्म घडते. आणि मग तुम्ही पराक्रमाकडे पोहोचता. हा १३ व्या अध्यायाचा सारांश आहे. तो लक्षात घेऊ आणि त्या प्रमाणे काम करू.


विजय रा. जोशी . 


गीता अध्याय १३, भाग 2 , ध्वनी - फीत


Saturday, April 10, 2021

 

 गीता अध्याय १३, भाग १ , ध्वनी - चित्र फीत



तेराव्या अध्यायात जे पहायचे आहे ते स्वधर्माचरणास फार उपयुक्त आहे. 




व्यासांनी आपल्या जीवनाचे सार भगवत्गीतेत ओतले आहे.  महाभारताची संहिता लाख, सव्वा लाख आहे. आपण गीतेचा अभ्यास करत आहोत  त्यातील मुख्य उद्देश हाच कि जीवनात ज्या ज्या वेळेला आपणास मदतीची आवश्यकता असेल त्या त्या वेळेला गीतेपासून ती मिळावी. अशी मदत आपल्याला सदैव मिळण्यासारखी आहे. गीता हे जीवन उपयोगी शास्त्र आहे. म्हणून गीतेमध्ये स्वधर्मावर जोर दिला आहे. तेराव्या अध्यायात जे पहायचे आहे ते स्वधर्माचरणास फार उपयुक्त आहे. 


जीवन = जड (शरीर) व अजडाची (मन) एकत्रता.


तेराव्या अध्यायाच्या प्रारंभा पासून जीव हा भौतिक प्रकृतीच्या संपर्कात 

कसा येतो , कर्म, ज्ञान, भक्तीच्या अधाराने भगवंत जीवाचा कसा 

उद्धार करतात याचे विवरण करण्यात आले आहे. जीवात्मा हा जरी शरीरा पासून भिन्न असला तरी कोणत्या ना कोणत्या रीतीने त्याचा देहाशी संबंध येतो त्याचेही विश्लेशण करण्यात आले आहे.

आंतरिक शोध घेताना , म्हणजेच आत्म्याचे ज्ञान प्राप्त करीत असताना केवळ बुद्धी उपयोगी पडत नाही. जन्मो-जन्मी झालेल्या संस्कारांमुळे बुद्धीवर मलीनतेचा पडदा असतो. हा पडदा जो पर्येंत दूर होत नाही तो पर्यंत आत्म्याचा साक्षात्कार होत नाही.हा पडदा चित्त-शुदधी मुळे दूर होतो. अशी चित्त शुद्धी साधणे म्हणजेच ज्ञान बाकी सगळे अज्ञान.

‘तू आत्मरूप आहेस’ हे पवित्र ज्ञान येथे आपल्यास दिले जात आहे.

तू माझेच अल्पांश् रूप आहेस.आणि या माझ्या रुपाचा नाश करणेचे सामर्थ्य 

कोणामध्येही नाही. हा सूक्ष्म विचार जीवनांतील अनेक भये दूर करणारा आहे.  एक प्रकारचा अद्भुत आनंद मनात निर्माण करणारा आहे.मी देहासाठी नाही तर सद्हेतू साठी, परमेश्वरी कार्यासाठी जगेन. ज्या ज्या वेळी परमेश्वरी तत्व दुषित होत असेल त्यावेळी मी सर्वस्वाने लढेन. आवश्यक वाटेल तर 

या कार्यासाठी मी माझा देह सुद्धा फेकून देईन. परमेश्वरी तत्वाला उज्ज्वल 

करण्यासाठी देहाचा होम करायला मी सदैव तयार असेन...देह हे साधन आहे त्याचा उपयोग संपेल त्या दिवशी हा देह फेकून द्यायचा आहे. आत्म्याच्या (स्वतःच्या) विकासाची ही युक्ती भगवान येथे सांगत आहेत. या अध्यायात देहाचा व तो देह ज्याच्या सत्तेने चालतो त्या पुरुषाचा विचार केला आहे. ह्यालाच क्षेत्र क्षेत्रज्ञाचा विचार असे म्हणतात.


या अध्यायात क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. त्यासाठी हा भाग ऐका . 

 

ज्ञान :  देह – आत्मा यांचे पृथःकरण सत्यासत्य विवेका खेरीज शक्य नाही. हा

‘विवेक’ हे ‘ज्ञान’ अंगी बाणले पाहिजे. ज्ञान याचा अर्थ आपण ‘जाणणे’ असा करतो. परंतु ‘बुद्धीने जाणणे’ म्हणजे ज्ञान नव्हे... फक्त बुद्धीने जाणून भागात नाही. ज्ञान जीवनात भिनले पाहिजे, हृदयांत मुरले पाहिजे ते ज्ञान हात, पाय, 

डोळा (यांच्या कृतीतून) यातून प्रकट झाले पाहिजे. सर्व ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये 

विचार पूर्वक कर्म करीत आहेत असे झाले पाहिजे. भगवंतांनी ‘ज्ञान लक्षणे’ सांगितली आहेत, ‘अज्ञान लक्षणेही’ सांगितली आहेत.  ती पुढच्या भागात बघू,


विजय रा. जोशी 



गीता अध्याय १३, भाग १ , ध्वनी - चित्र फीत


Tuesday, March 30, 2021

 

गीता अध्याय १2, भाग 2 , ध्वनी फीत



भक्त लक्षणे 



सर्व भुतांच्या ठिकाणी द्वेष न करणारा, मैत्रीने वागणारा, आणि तसाच कृपयुक्त , मी-माझेपण रहित, सुख व दुःख समान मानणारा. क्षमाशील  (१२/१३)

सर्वदा संतुष्ट, योगी, नियतचित्त, माझ्या ठिकाणी ज्याचे मन दृढ आहे असा, माझ्या ठिकाणी ज्याने मन व बुद्धी अर्पण केली आहेत; असा जो माझा भक्त असतो , तो मला प्रिय आहे. (१२/१४)

ज्याचा लोक कंटाळा करत नाहीत व जो लोकांचा कंटाळा करत नाही , जो हर्ष, क्रोध, भय यांच्यापासून सुटला आहे; तोच मला प्रिय आहे. (१२/१५)

निरपेक्ष, शुद्ध, तत्वार्थींचा देखणा, उदासीन, संसारदुःख विरहित, कर्मारंभास आवश्यक असणारा जो अहंकार ;तद्विरहित, असा जो माझा भक्त असतो तो मला प्रिय आहे. (१२/१६)

जो हर्ष पावत नाही, द्वेष करत नाही, शोक करत नाही, (अप्राप्त वस्तूची) इच्छा करीत नाही, चांगले व वाईट या दोन्हीचा त्याग केलेला जो भक्तिमान मनुष्य असतो, तो मला प्रिय आहे.  (१२/१७)

शत्रू, मित्र, मान व अपमान यांच्या ठिकाणी समान असणारा , शीत व उष्ण , सुख व दुःख यांच्या ठिकाणी समान असणारा (अंतर्बाहय), सग रहित.   (१२/१८)

निंदा व स्तुती समान मानणारा ,मौनी, जे काही मिळेल त्यांत संतोषवृत्ती ठेवणारा, कोठेच आश्रय धरून न रहाणारा, स्थिरबुद्धी असलेला जो भक्तिमान मनुष्य , तो मला प्रिय आहे.   (१२/१९)


भगवंताचे गुण आदर्श समजून त्या प्रमाणे वागणे म्हणजे भक्ती  


भक्तीसाठी मन तयार करायला व भक्तीचे वातावरण तयार करायला -- ज्या कृती, कर्म कांड आहे तेवढेच आपण करतो. व ती भक्ती असे समजून चालतो. पण हे विधी केल्यावर भगवंतात मिसळून जायचे असते ते आपण करत नाही. म्हणून अनेक वर्षे आपली पूजा असफल रहाते.

मी गोपाळ कृष्णाचा भक्त आहे तर मला गोपाल कृष्णाच्या गुणांचे ज्ञान असायला हवे. ते गुण माझ्या वर्तनात आणण्याचा प्रयत्न मी कसोशीने केला पाहिजे.

भक्तीची अंतीम अवस्था म्हणजे भक्त गुण-वर्तनाने संपूर्ण भगवंतमय होणे.

अशी भक्ती घडण्यासाठी  काय प्रयत्न करावे या बद्दल उपयुक्त माहिती या ऑडिओमध्ये ऐका. 


विजय रा. जोशी 




गीता अध्याय १2, भाग 2 , ध्वनी फीत