मनाचे श्लोक (संत श्री रामदास स्वामी)
श्लोक २६ ते ३० - सारांश.
जीवन हे क्षणभन्गुर आहे.
जर भव, म्हणजे आपले प्रापंचिक जीवन, एक दिवस संपणार आहे, हे सत्य समजले की त्या शेवटाला
भिण्या ऐवजी तो शेवट कसा गोड होईल यासाठी तयारी केली पाहिजे. आपली मानसिकता
बनविली पाहिजे. आणि ती मानसिकता कशी बनवता येईल याचे मार्गदर्शन समर्थ या श्लोकात
आपल्याला करीत आहेत.
भगवंत आणि सद्गुरू त्यांच्या सच्चा, निष्ठावान भक्ताकडे दुर्लक्ष करीत नाहीत. अनेकदा भक्तांचे
जीवन जरी वरवर इतरांना दुःखमय वाटले तरी त्यांचे, त्यांच्या सत्कार्याचे भगवंत नेहमी संरक्षण
करतात.
अंतिमतः, भगवंत आपल्या भक्ताचा आपले पणाने सांभाळ करतात . त्यांची उपेक्षा कधीही करत
नाहीत .
आपल्या भक्ती साधनेने आपले जीवन कसे सार्थकी लागते त्याबद्दल केलेले
या श्लोकांवरील विवेचन जरूर ऐकावे आणि आपल्याला आवडल्यास इतरांशी शेअर करावे.
विजय रा. जोशी.
No comments:
Post a Comment