Thursday, August 31, 2023

N. P. O1 / 11.

 परिक्रमा वर्णन  २४ फेब्रुवारी २०२३ . 


मी पनवेल येथे राहतो. २४ फेब्रुवारी पहाटे ६ वाजता परिक्रमेची बस दादरहून सुटणार होती. म्हणून काल सायंकाळी ५ वाजता घरून एस टी  बसने निघालो. साडे सहा सुमारास दादर चित्रा सिनेमा बस स्टॉपवर उतरलो. तेथून प्रतीमकडे (पुतणी)  जाण्यासाठी खूप प्रयत्न करून टॅक्सी न मिळाल्याने दादर वेस्ट ला चालत घरी पोहोचलो. प्रतीम ने उत्तम पाहुणचार केला. लवकर उठून स्नान करून तयार झाल्यावर, सकाळी सव्वा पाचला रघुने (जावई) प्रभू ट्रॅव्हल्सच्या  बसवर सोडले.






सहाला बस निघाली. वाटेत लोकांना pick-up करीत पुढे नाश्ता वगैरे झाल्यावर धुळ्याच्या अलीकडे ७० km वर जेवण घेतले. चारच्या सुमारास धुळे हॉटेल कान्हा रिजनसी ल पोहोचलो. चहा, थोडा आराम करून धुळ्याजवल असलेल्या स्वयंभू एकवीरा देवीचे दर्शन व आरती करून आता परत हॉटेलवर जात आहोत. जेवण व झोप.



रोज सकाळी सर्व आवरून सकाळी समानासह बसकडे यायचे आणि सहा वाजता प्रवास सुरू करायचा, असा रोजचा कार्यक्रम असेल. उद्या ओंकारेश्वर दर्शन, स्नान आणि परिक्रमा संकल्प पूजा असा कार्यक्रम आहे. ओंकारेश्वर ला दुपारी १२ वाजेतो पोहोचू.  ओम नर्मदे हर!!


२५ फेब्रुवारी


सकाळी सहाला बस सुटली. सुमारे एक वाजता ओंकारेश्वर पासून १२ कि.मी वर  बंधन रिसॉर्ट, मोरटक्का येथे  आली. सामान उतरवून रूममधे जायला बराच वेळ लागला. आमची रूम लॉक लागत नसल्याने बदलावी लागली. 



जेवण होऊन ममलेश्र्वर मंदिराकडे निघायला तीन वाजून गेले. मंदिर जवळच होते, सुमारे चारला पोहोचलो. 


नर्मदेच्या अलीकडे ममलेश्र्वरआणि पलीकडील तीरावर ओंकारेश्वर  असे मिळून हे एक ज्योतिर्लिंग आहे. पूर्वी पावसाळ्यात चार महिने ओंकारेश्वर मंदिर पाण्याखाली जात असे. म्हणून ममलेश्र्वरची पूजा होत असे. अजून ती प्रथा कायम आहे. येथे घाटावर प्रथम सर्व जणांनी स्नान केले.


पात्रात पाणी कमी होते तरी वाहत्या जलात स्नान झालं. छान वाटल. गर्दी बऱ्यापैकी होती. मंदिराजवळील घाटावर बसून सर्वांनी एकत्र यात्रेचा संकल्प पूजा, होम, आरती केली. यात्रा प्रारंभ झाला. नर्मदा जल एका कलशात भरून घेतले. हा कलश यात्रा समाप्ती पर्येंत जवळ ठेवायचा असतो.



 



नंतर, प्रत्यक्ष नर्मदेत जाऊन हळद, कुंकू पूजा आणि दीपदान केले. नंतर ममलेश्र्वर दर्शन झाले. त्या मंदिराच्या रांगेत पायी परिक्रमा पूर्ण झालेले काही यात्रेकरू भेटले. यात्रा पूर्तीचे समाधान त्यांच्या थकलेल्या कायेवर स्पष्ट दिसत होते. तिथे शेजारीच गजानन महाराज उत्कृष्ठ मंदिर आहे. दर्शन घेऊन रात्री रूमवर यायला आठ वाजले.


रोज तीन पाने "ओम नर्मदे हर" असा जप लिहिण्यासाठी प्रभू ट्रॅव्हल ने स्पेशल वही, पेन दिले आहे.नर्मदा अश्टकम चा प्रिंट आउट देखील दिला आहे.

उद्या राजघाट, जैन मंदिर वगैरे गोष्टी करून मुक्कामी शहादा येथे जायचे आहे. रोजचा दिनक्रम जरा हेक्टिक आहे. पण ठीक आहे. 


ओम नर्मदे हर!!


२६ फेब्रुवारी.


आज सकाळी नेहमीप्रमाणे निघालो.आज  नाश्ता skip केला.

११ च्या  सुमारास राजघाटला  पोहोचलो. तिथे नर्मदा पूजा आणि दीपदान केले. माझे ४२ वर्षीय निवास साथी , श्री शेखर जोशी, हे एक उत्तम पुरोहित आहेत. अनेक स्तोत्र, मंत्र पाठ आहेत. काही विशिष्ठ साधना करतात. 

स्टेज आर्टिस्ट आहेत. सहा भाषा येतात. शेखरचे  पूजाविधी साठी  मार्गदर्शन घेतो.



येथे काही लहान मुले, मुली होत्या त्यांना आणलेली तयार खाऊ पाकिटे वाटली. येथे एकमुखी दत्त मंदिर आहे, पण ते पाण्याखाली गेले आहे असे सांगितले. 


नंतर तेथून पुढे बावन्न डोंगरात वसलेल्या जैन तीर्थक्षेत्री आलो. मार्गी जंगली प्रदेश आहे. पण उजाड आहे. पूर्वी या भागात काही स्थानिक लोकांची यात्रेकरूंना भीती वाटे.आता ती स्थिती नाही. 

जैन मंदिर परिसर प्रशस्त आहे. संपन्न आहे. मंदिर जुने आहे. येथे डोंगरात कोरलेली ८४ फुटी दिगंबर महावीर मूर्ती आहे.


 


येथे यात्रेकरू दिसल्यावर परिसरातील गरीब मुले जमतात.. त्यांना जरी मदत हवी असली तरी ते आपल्याकडे काही मागणी करत नाहीत. त्यांना आम्ही सर्वांनी खाऊ वाटप केले


आजपासून प्रवास सुरू होताना सकाळी गणपती, देवी, शंकराची आरती, नर्मदा आरती, दत्त आरती, नर्मदाश्टकं वगैरे स्तोत्रपाठ म्हणणे सुरू झाले. या व्यतिरिक्त भगिनी सहप्रवासी विष्णू सहस्त्रनाम अथर्वशीर्ष, श्रीसुक्त आणि त्यांच्या गुरू पंथाची स्तोत्रे अधिकीची देखील म्हणतात.


देसाई पती, पत्नी, आणि वडील देसाई , (प्रभंजन,-प्रभू, रागिणी आणि पप्पा), असे तीन जण यात्रा आयोजक आहेत. अनेक नर्मदा परिक्रमांचा अनुभव त्यांच्या गाठी आहे. ते सर्व जण वातावरण हलके, फुलके ठेवण्या बरोबर यात्रा आणि स्थळमहत्व वगैरे सांगतात. 


जेवण, नाश्ता, चहा, कॉफी व्यवस्था चांगली आहे. जेवण घरगुती वाटावे असे आहे. रोज बस प्रवासात काही गाणी एखादा चित्रपट असतो. आज सावरकर पुण्यतिथी निमित्त वीर सावरकर चित्रपट होता. वडील, पप्पा देसाई वेगवेगळे किस्से सांगतात. १५ दिवसात साधारण ४५०० किलो मीटर्स (मुंबई - परिक्रमा - मुंबई)  प्रवास आहे. म्हणजे  रोज भरपूर वेळ प्रवास असतो. प्रवास पूर्ण दिवसात असतो. रात्री नाही. 


26/02, आज सायंकाळी ६ च्या  सुमारास शेर ए पंजाब हॉटेलवर आलो. मुक्काम शहादा येथे आहे. हा गाव महाराष्ट्रात आहे. उद्या गुजरातेत जाऊ. नारेश्वर ला जाऊ. रंग अवधूत आश्रम आहे. 




N. P. 1/11                                                                           पुढे 


   

 N. P. 02/11        २७ फेब्रुवारी.



बसण्याच्या सोयीत समानता असावी म्ह्णून रोज बसमधील

आपली सीट बदलण्याची  रोटेशन सिस्टम आहे. 


ट्रीप मधे अमेरिका Canacticut येथील एक ज्येष्ठ जोडपे आहे. श्री कांबळी वय ८५ आणि त्यांची पत्नी.हे ट्रीप संचालक यांचे विशेष स्नेही, अतिथी आहेत.  त्यांच्या ज्येष्ठत्वाचा  मान म्हणून सर्वांनी त्यांना seat rotation मधून सवलत दिली आहे. बाकी सर्वांच्या बस मधील जागा (seats)  रोटेशन पद्धतीने बदलतात. बसमधे सर्वांना सारखी सोय, गैरसोय व्हावी यासाठी रोज एक रांग पुढे शिफ्ट व्हायचे.सर्वात पुढील सीट वरील लोकांनी सर्वात मागच्या रांगेत जायचे, अशी ही रोटेशन सिस्टीम आहे. देसाई जोडपे उजवीकडील पहिल्या रांगेत स्थिर रहातील. ही व्यवस्था आयोजकांनी सुचविली, सर्वांनी मान्य केली.

सौ कांबळी अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळात  मध्ये  सोशल वर्क करतात. 




आज २८ फेब्रुवारी, नेहमी प्रमाणे बस ६ला निघाली . प्रवास थेट शहादा ते भडोच,  जेथे नर्मदा समुद्रास मिळते तेथ पर्येत होता. वाटेत नेहमी प्रमाणे नाश्ता, चहा आणि एक नंबर साठी stops झाले. By the way, हा स्टॉप या परिक्रमेत नेहमीच आणि विशेषतः मध्य प्रदेशातून जातांना,

निसर्ग सानिध्यात under the sky roof असतो.


वाटेत संकलेश्वर हे शहर लागते. येथे प्रसिध्द खमण ढोकळा व बाटी डाल  सर्वांना देण्यात आली.

पुढे भडोच नंतर नर्मदा समुद्रास मिळते, तेथे खाडीवर एक ब्रीज आहे. तेथे बसमधून आम्ही नदी पार करून उत्तर तटावर आलो. तेथे श्री नीलकंठेश्र्वर शिव मंदिर आहे. तेथे देवदर्शन झाले.



मंदिराच्या मागील घाटावर जाऊन नर्मदा पूजा केली. दीपदान झाले. नर्मदेची प्रार्थना केली.

काही यथा योग्य दान धर्म, कुमारिका सन्मान  वगैरे केले. 

सर्वसाधारण प्रथे प्रमाणे, नर्मदा परिक्रमी सोबत नर्मदेचे पाणी बाटलीत बरोबर घेऊन प्रवास करतात. प्रभू ट्रॅव्हल्स त्या ऐवजी वेगळी व्यवस्था  करतात. ममलेश्वर घाटी सर्वांनी मिळून एक कलश भरून घेतला, त्याची पूजा केली

आणि नंतर त्या कलशाची बसमधे प्रवेश करताना समोर येईल अशी स्थापना केली. रोज बसमधे प्रवेश करताना सकाळी या कलशाची सर्व प्रार्थना करतात. आज या कलशातील थोडे पाणी बदलून निळकंठेशवर घाटावरील थोडे नर्मदेचे पाणी भरून घेतले. परत बस प्रवेश स्थानी कलशाची स्थापना केली. असा क्रम पुढे सुरु ठेवला. नर्मदेच्या काठी

पुढील प्रत्येक ठिकाणी या कलशातील थोडे पाणी कमी करून नवीन पाणी भरण्याचा उपक्रम आणि रोजचे दर्शन हे यात्रा सांगते पर्येत करायचे असते. आता रंग अवधूत स्वामी यांच्या नारेश्वर आश्रमाकडे  प्रवास आहे.




कोकणात जन्म घेतलेले स्वामी रंग अवधूत सत्य दर्शनाच्या अध्यात्मिक ओढीने साधनेसाठी भ्रमंती करत नर्मदेच्या किनाऱ्यावर पोहोचले, परिक्रमेत चातुर्मास मुक्कामासाठी निर्जन अशा नारेश्वर  येथे कुटी उभारून राहिले, ते स्थान आजमितीस  गुजरात नव्हे तर सर्व मानवतेला एक सात्विक वर्तनाचा

संदेश देता आहे. 


स्वामीजींच्या. अधिक माहिती साठी पुढील लिंक पहावी :


http://www.dattamaharaj.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%A4


आम्ही स्वामींच्या आश्रमात पोहोचलो.

मंदिरात दर्शन घेऊन काही मिनिटे डोळे बंद करून  विचारशून्य होण्याचा अभ्यास केला.

काही काळ खूप शांत वाटले. स्वतःसाठी स्वतःशी परीक्षणार्थ संवाद झाला. पुढील जीवन कसे असावे यावर थोडे चिंतन

चित्तात काही क्षण स्थिरावले. 

 "ज्या मार्गात आहेस त्या मार्गाने प्रगती कर” असा संदेश  अंतर्मनात उमटला. 

समाधान वाटले. 


परिसरात फेरी मारूनआश्रमाच्या वातावरणातील शांती अनुभवली. कार्यालयात ऐच्छिक देणगी दिली. येथल्या पुस्तक भंडारातून दत्त बावनी, अत्तर, विभूती, अष्टगंध घेतले. आणि हे पुण्यस्थळ पुढील प्रवासासाठी सोडले. 


येथून पुढे जेथे जेथे अशा सन्यासी, लोक कल्याणकारी, विभुतींच्या पुण्य स्थळांना भेटी झाल्या, येथे बहुदा  सर्वत्र मला स्वामीजींची, (स्वामी विज्ञानानंद, मनशक्तिकेंद्र, संस्थापक), महाशून्य बिंदुची आणि त्यांनी दिलेल्या सेवा संदेशाची आठवण प्रकर्षाने झाली, आजपर्येंत  मार्गात आपण स्थिर असल्याचे, राहिल्याचे समाधानही वाटले. या मार्गी प्रगती होण्याची

आणि सर्व कल्याणाची मागणी मनात उमटली. एक वेगळ्याच शांत अनुभूतीचा शब्दात व्यक्त न होणारा अनुभव, प्रत्यय आला.


भडोचला दिशा बदलली. दक्षिण किनाऱ्यावरून आता उत्तर किनाऱ्यावर आलो. या दिशेने  नर्मदा मय्या परिक्रमा सुरू आहे. 


येथील सुरवातीचा परिसर तरी अधिक समृद्ध, सुपीक आणि हिरवागार वाटतो. आता केवडिया कडे जात आहोत.

या परिक्रमेत जसा विविध पिकांनी समृद्ध असा विशाल शेतीचा परिसर लागतो,

तसाच डोंगराळ पण उजाड (दक्षिण किनारा, शूल पाणी पर्वत भाग)) तर डोंगराळ पण गर्द  झाडीने भरलेला आरण्याचा भाग देखील लागतो. नर्मदेचे पात्र कुठे अतिकृश तर कोठे विशाल

आणि विस्तीर्ण पाहायला मिळते. 


आता पुढील मुक्काम. ,केवदिया जवळ एक AC Tent camp, युनिटी रिसॉर्ट आहे. आज तिथे रहायची सोय आहे, जरा वेगळा अनुभव आहे. टेन्टच्या  बाहेर व्हरांड्यात बसायला आरामखुर्ची ठेवली आहे. इथून नर्मदा dam जवळ आहे. सरदार वल्लभभाई पटेल statue, आहे. Statue Of Unity.

हा नर्मदा जिल्हा आहे.




                                                                  


AC Tent मधील मुक्काम  जरा वेगळा वाटला. प्रवेश द्वाराने आत आलो. कडेला चारी बाजूस Tents आणि मधे मोठे मैदान आहे. 


सायंकाळी उशिरा पोहोचलो होतो.  गेल्यानंतर थोडा आराम केल्यावर, निवासी स्थिरस्थावर झाल्यावर,  काही सहप्रवासी  यात्रिक आपापल्या ग्रुपमधे जमले. गप्पा, गाणी, भेंड्या फिरणे असा कार्यक्रम करायला लोकांना फुरसत मिळाली. वातावरणात गुलाबी थंडी होती. हलका वारा होता. आकाश निरभ्र होते. क्षितिजावर स्पष्टपणे गुरू आणि शुक्र जवळ प्रकाशित झालेले  होते. शुक्र अधिक मोठा आणि प्रकाशमान दिसत होता तर गुरू थोडा तांबूस पण आकाराने लहान होता.


मंडळींनी कॅम्प फायर पेटविला. प्रभंजननने  सर्वांना एकत्र क्रेले.जेवण तयार होत होते. मग त्याने त्याच्या गत वर्षांतील यात्रेच्या दरम्यान भेटलेल्या काही वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती आणि वल्ली चे अनुभव सांगितले. त्यातील काही विशेष वाटले. पण एकंदर सांगण्याची पद्धत एकसुरी आणि अनाकर्षक वाटली. Tent मधे विश्रांती झाली.


आपल्या शेजारील असलेल्या  tent मधील आवाज येत स्पष्ट  होते. दिवसभर दमल्याने सर्व लगेचच झोपले. परिसर शांत , निवांत झाला. 


दुसऱ्या दिवशी, २८ Feb 


सकाळी सहाला निघालो.

गरुडेश्र्वर तेथील दत्त मंदिर, टेंबे स्वामी समाधी यांना भेट दिली. दर्शन घेतले, प्रार्थना केली.



प्रखर भक्ती आणि समर्पित साधना असलेल्या या पुण्यभूमी मधे, नर्मदा परिक्रमा करणाऱ्या टेंबे स्वामी  यांनी चातुर्मास केला. चातुर्मास केला म्हणजे काय ? 


त्यावेळी पायी परिक्रमा दीर्घकाळ चालणारी असे . पाऊस सुरु झाल्यावर पावसाळ्यात ती चालू ठेवणे शक्य नसे. याच दरम्यान  विशेष नियम, उपवास आणि व्रत पालनाचा चातुर्मास येतो. सर्व यात्रिक या काळात, परिक्रमा बंद ठेवून यात्रेकरूंना एकाच ठिकाणी रहावे लागते. 


अशा वेळी आपल्या यात्रेत, त्या काळी  निर्जन असलेल्या ठिकाणी, नर्मदा तीरावर  असलेल्या जागेत एक कुटी उभारून टेंबे स्वामी  राहिले. पुढे त्यांना  ही जागा आवडली. त्यांच्या साधनेसाठी, निवासासाठी  त्यांनी ती नक्की केली. आणि आज ते हजारो श्रध्दाळू लोकांचे  श्रध्दास्थान झाले  आहे. 

स्वामीजींच्या अधिक माहितीसाठी लिंक  (टेम्बेस्वामी)  


http://www.dattamaharaj.com/%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80


बस थांबण्याचे ठिकाण थोडे दूर आहे. तेथे भल्या पहाटे उतरलो. गावातून पाय वाटेने ग्रामीण परिसरात असलेल्या मंदिरात पोहोचलो. प्रातःपूजा सुरु होती. सर्वांनी या मंदिरात दर्शन घेतले, ध्यान प्रार्थना केली. आणि मग मय्याच्या घाटावर गेलो. वाटेत पायी प्रदक्षिणा करणारे यात्रेकरू भेटले. त्यांना दक्षिण देऊन वंदन करून थोडेसे बोलून पुढे आलो. 



आश्रमाच्या मागे  बंधाऱ्यावरून खळाळत वहात असलेली नर्मदा आहे. सकाळच्या वेळी सूर्योदयाच्या सुमारास थंड वाऱ्याच्या हलक्या झुळूकेमूळे खूप प्रसन्न वाटतं होते. सर्वांनी नर्मदाष्टकम एकत्रित म्हंटले आणि पुढे केवडीया, जिल्हा नर्मदा,  प्रवास सुरू झाला. केवडियाला नर्मदा dam आणि त्यावर असलेला सरदार पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. त्या परिसरात सकाळी ७ ४५ सुमारास पोहोचलो.


Statue of Unity . 

.

Unity statue ही जागा आणि पर्यटन स्थळ पूर्ण अंतर राष्ट्रीय दर्जाचं केलेले आहे. रेल्वे स्टेशन, तिकीट घर, पार्किंग, हॉटेल, फूड place  Caffeteria, स्वच्छता, elevators, moving paths, campus, buses सर्व, सर्वच उत्कृष्ठ दर्जाचे ठेवले आहे.


त्या  सर्व परिसरामधे statue व्यतिरिक्त पर्यटकांसाठी अन्य अनेक activities ,  attractions आहेत.

प्रवेशाचे तिकीट फक्त डिजिटल पद्धतीने मिळते. कॅश चालत नाही.

पार्किंग जवळ तिकीट घर आहे. तिथे सकाळी ८ वाजता तिकीट घेतले . रुपये १५०/ तिकीट, त्यात statue च्या पाया पर्येंत जाऊ शकता. पण statue मध्ये  असलेल्या viewings gallery मधे जाता येत नाही.



८५० रुपये तिकिटावर तिथे जाता येते. सायंकाळी असलेला लेझर शो पण include असतो. आम्हाला वेळ जास्त नव्हता. म्हणून १५० चे तिकीट घेतले.


स्टॅच्यू ऑफ युनिटी , हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे. हा पुतळा भारताततील गुजरात राज्याच्या राजपिपळा शहराजवळ नर्मदा धरणाजवळील साधू बेटावर उभारलेला आहे.

 


स्मारक २०,००० चौरस मीटर क्षेत्रात आहे आणि १२ कि. मी.  आकाराच्या कृत्रिम तलावाने घेरलेले आहे. १८२ मीटर (५९७ फूट) उंचीचा हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. ऑक्टोबर २०१४ मध्ये, या प्रकल्पाची संरचना, बांधकाम आणि देखभाल यासाठी २९८९ कोटी रुपयांचा करार लार्सन ॲन्ड ट्यूब्रो यांच्याशी केला होता. पुतळ्याचे बांधकाम ३१ ऑक्टोबर २०१४पासून सुरू झाले आणि मध्य-ऑक्टोबर २०१८मध्ये पूर्ण झाले.

भारतीय मूर्तिकार राम व्ही. सुतार यांनी ही संरचना (डिझाइन) केली होती. आणि पटेलांच्या जयंतीच्या दिवशी ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचे उद्घाटन केले


पुतळ्याची भव्यता जसजसे जवळ जाऊ तशी वाढत जाते. जगातील सर्वात जास्त उंची असलेला हा पुतळा आहे. त्याची भव्यता समजून घ्यायची असेल तर कल्पना करा. अगदी जवळून पाहिले तर त्याच्या पायांच्या अंगठ्याच्या एका नखांचा आकार तीन सुपा एवढा मोठा आहे. 

 

खालच्या लेवलवर मोठे exibition आहे. संबंधित सर्व माहिती तेथे चार्ट, पिक्चर्स, व्हिडिओज इत्यादी माध्यमातून पहायला मिळते. येथील सेक्युरिटी खूप  strict  पण नम्रपणे वागणारी आहे.स्वच्छता, टापटीप वाखाणण्यासारखी आहे. 


एकीकडे पुतळ्याची भव्यता तर चहू बाजूला नर्मदेचे अथांग पाणी आहे.

विंध्य आणि सातपुडा पर्वतांच्या तटांनी सर्व भव्य जलाशय बांधून गेला आहे.

सभोवताली नर्मदेचा अथांग जलाशय,  वर भव्य-अथांग आकाश , थंडगार वारा, प्रसन्न हवा, आपण उभे असलेली भूमी आणि सर्व  परिसराला प्रकाशमय करणारे सूर्य तेज अशा पंच भूतांच्या सानिध्यातील अशा  परिसरात चित्त प्रसन्न झाले.  स्व-देशात उभारलेल्या या मानव निर्मित वैशिष्ठयपूर्ण शिल्पाचे 

आणि त्याच्या व्यवस्थापनाचे एक असाधारण उदाहरण पाहिल्याने मन भरून येते. आपल्या देशाचे हे सर्वात उंच शिल्प आपल्याला अभिमानाचे, आणि उन्नत आत्मविश्वासाचे प्रतीक वाटते. 


नर्मदेचे वाहन, मगरीचे दर्शन. 


पुतळ्याच्या पायाकडून वरील दोन टप्पे करून खालच्या टप्प्यावर आलो. तेथून नदीकडे पाहिले तर किनाऱ्यवर थोडी बाहेर थोडी पाण्यात,  एक मगर पहुडलेली दिसली. मगर हे नर्मदा देवतेचे वाहन आहे असे म्हंटले जाते. या परिक्रमेत मगर दर्शन होणे,  सुलक्षणी मानतात.

आमच्यापैकी अनेकांच्या मोबाईल कॅमेरा मधून हे सुलक्षण टिपले गेले.


तिकीट घरापासून statue  दूर आहे. त्यासाठी जायला, यायला बसची सोय आहे. गुलाबी रंगाच्या ऑटो रिक्षा पण आहेत. या स्पेशल रिक्षा नर्मदा सरोवरामुळे  विस्थापित परिसरातील आदिवासी महिला ड्राईव्ह करतात. त्यांच्या साठी सरकारने त्यांना प्रशिक्षण दिले आहे.


अनेक शाळांचे विद्यार्थी statue दर्शनासाठी आले होते. विद्यार्थींना तिकीट कन्सेशन मधे मिळते. देशी, परदेशी अनेक पर्यटक दिसत होते. Statue ऑफ Unity  दर्शनाच्या अनुभव खूप चांगला होता.



भोजन नंतर चा प्रवास पुढे सुरु झाला. 








N. P. 2/11                                                                           पुढे ...


 

Statu

N. P. 03 / 11 १, मार्च,  महेश्वर दर्शन. 


Statu पासून निघालो ते गुजरात पार करून मध्यप्रदेशातील महेश्वर येथे आलो.

उशिरा सायंकाळी पोचलो.

येथील प्रसिद्ध उद्योजक पवार यांच्या लॉजमध्ये सामान ठेवले. जेवून झोपी गेलो.



त्या अगोदर वाटेत,  भजन, प्रार्थना, नर्मदाष्टकम, नाश्ता असा प्रवासाचा एक टप्पा झाल्यावर

वाटेत जेवायला एका मंदिराशी थांबलो होतो. तो एक गरीब आदिवासी वस्तीचा गाव होता.

अनेक शाळकरी मुली तेथे जमल्या आणि बाजूला बसून होत्या. कुमारिकांना काही दान करावे

अशी या यात्रेत पद्धत आहे, त्या मुलींना काही वस्तू, खाऊ, थोडे पैसे आम्ही बऱ्याच जणांनी दिले.

त्यांच्या चेहऱ्यावरील मरगळ जाऊन हासू फुलले आणि मग त्यांनी आमच्या विनंतीवरून

त्यांचा पारंपरिक नाच केला. लिंक : 


https://photos.google.com/photo/AF1QipM_IK41HEncZM9Axs8oHo9W9CWOgdJQvT4k1rgd



पुण्यश्लोक अहिल्याबाई यांचे शहर - महेश्वर 


हॉटेल पायल  पॅलेस, महेश्वर शहर बाहेर १५ किमी वर आहे.

सकाळी  आज ७ वाजता खाली आलो. चहा नाश्ता करून नर्मदा घाटावर आलो.

महेश्वर  नदी तटावरील घाट मोठे, भव्य आहेत. आत  स्वच्छ, मोठा,

रुंद नर्मदा प्रवाह आहे. पायऱ्या आहेत. पण पाण्यात उतरून

५ ते  ६ फूट पुढे गेले की पाणी खूप खोल आहे. तेथे सर्वांनी स्नान केले.

नर्मदाश्टक म्हंटले. प्रार्थना , अर्घ्य आदी गोष्टी झाल्या.

पुरुष आणि स्त्रियांसाठी घाट स्वतंत्र होते. 



त्यानंतर ९ ते १२ वेळ हा खरेदीसाठी दिला होता. येथील महेश्वरी साड्या,

ड्रेस मटेरीयल प्रसिध्द आहे. येथे मंडळीनी मनमुराद खरेदी केली.

मी ही ३ साड्या घेतल्या.  


नंतर जवळ असलेल्या जगातील सर्वात मोठ्या दत्त मंदिरास भेट दिली.

हे दत्तमंदिर खूप मोठ्या , काही एकर प्लॉट वर आहे. मूर्ती भव्य आणी अती सुंदर आहे.

दत्त मंदिर परिसरात काही पायी प्रदक्षिणा करणारे यात्री भेटले. 

अशी चार मंदिरे भारतात बांधण्याचा संस्थेचा मूळ संकल्प  होता,

त्यातील तीन बांधून पूर्ण झाली. उत्तराखंड मधील मंदिर अजून व्हायचे आहे. 

नंतर. हॉटेलवर येऊन भोजन केले. 




दुपारी जेवण, आराम झाल्यावर पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या राजधानी

असलेल्या किल्ला, मुझियम, मंदिरे, स्मारक आदी गोष्टी पाहिल्या.


काशी विश्वनाथ मंदिर, अत्यंत प्राचीन मंदिर आहे.

मार्कंडेय ऋषींना फक्त १६ वर्षे आयुष्य होते. शिव कृपेने ते अमर झाले,

ते हे शिव मंदिर. ऋषींची अधिक माहिती लिंक:

https://www.bhaskar.com/magazine/aha-zindagi/news/maharishi-markandeya-was-immortalized-by-shivkripa-was-only-16-years-old-128319162.html


येथील नंदी खूप वैशिष्ठ्य पूर्ण आहे. समोर नर्मदेचे विशाल पात्र आहे.

इथे दर्शन घेतले, प्रभूने ग्रुप फोटो काढले.

नंतर शेजारील सहस्राअर्जुन  मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

हा येथील राज्l . याने अती बलाढ्य अशा रावणाचा   पराभव केला.

महिष्मतीi हे महेश्वर चे पूर्वीचे नाव.

या पराक्रमी राजाने या शिवलिंगा  मधे देह सोडून जातांना आपले तेज

समर्पित केले असे सांगतात. 


(रामायण में सहस्त्रबाहु अर्जुन का कई बार उल्लेख होता है।

तुलसीदास जी ने रावण की महिमा घटाने के लिये दो बार उनका उल्लेख किया है।

रावण की सभा में हनूमान और अंगद जब दूत बन कर जाते हैं,

तो रावण का उपहास करने के लिये यह उल्लेख करना नहीं भूलते

कि उसे सहस्त्रार्जुन ने बांध कर अपने किले के कोने में कैद कर लिया था

और फिर पुलस्त्य ऋषि के आग्रह पर छोड़ा था। एक बार परशुराम जनक की सभा में

कहते हैं कि उन्होने सहस्त्रार्जुन का वध किया था,

और वे यहां भी उनका नाश करने से चूकेंगे नहीं, अगर उन्हें यह नहीं बताया गया कि

पिनाक किसने तोड़ा है। कुल मिला कर रावण के संदर्भ में और परशुराम के संदर्भ में

सहस्त्रबाहु अर्जुन का बार बार उल्लेख मिलता है। \

हैहय सम्राट कार्तवीर्य अर्जुन (सहस्त्रार्जुन) के बारे में

अनेक प्राचीन महाभारतकालीन या उससे पहले के काल को दर्शाते हुये उपन्यासों में

बार बार पढ़ा था, वह माहेश्वर का था )


परिसर विडिओ लिंक. 

https://photos.app.goo.gl/RFSdTuPTNy7GYt8t9


अहिल्याबाई होळकरांनी  महेश्वरला आपली राजधानी केली होती. हिंदू धर्म स्थळांसाठी

त्यांनी भारतभर प्रचंड धन खर्चून जीर्णोद्धार केला. पण स्वतःचे नाव कुठे लावले नाही.

या किल्यात त्यांनी वापरलेल्या गोष्टी शस्त्रे, पूजा उपकरणे, शिवलिंग असे अत्यंत

अमूल्य आणि दुर्मिळ अशा गोष्टी ठेवल्या आहेत. नगर वासियांनी त्यांचे

जे पुतळा रूपाने स्मारक केले तेही आहे.



अहिल्याबाई, भारतातील सर्वतीर्थ क्षेत्रांचा जीर्णोद्धार, नाव कोठेही लावले नाही.

नगर वासियांनी पुतळा, घाटावर उभारला होता.

पण काही विशेष कारण नसतांना देखील . तीन वेळा पडला.

बहुधा निसर्गाला ती जागा मान्य नसावी ,

त्यांच्या राजवाड्याजवळ, पूजा घराजवळ नंतर

गावकऱ्यांनी तो किल्यात वर स्थापन केला. आणि मग तो स्थिर राहिला,

त्यावर नेहमी एक खार असते. असे प्रभू जी सांगत होते.

(जशी दोन कबुतरे नेहमी अमरनाथ क्षेत्री असतात.)

Link घाट परिसर 

https://photos.google.com/photo/AF1QipPiINCtJX4DD7ngcv1_2NU1qk_CP4xuCZdpazLp


तिथून घाटावर उतरलो. येथे अनेक मंदिरे आणि सुंदर दगडातील कोरीव  शिल्पे असलेली मूर्ती,

इमारती, मंदिरे, सभागृहे आहेत. घाटावरील सूर्यास्त खूप प्रेक्षणीय असतो.

या घाटावर अनेक चित्रपटांची शूटिंग झाली आहेत.

रोज येथे गंगेची सार्वजनिक आरती केली जाते. आम्ही येथे नर्मदा पूजन, दीपदान केले,

प्रार्थना केली आणि मग या आरतीत सहभागी झालो. प्रत्येकाच्या हाती आरतीसाठी साहित्य दिले

आणि छान सामुदायिक आरतीचा आनंद घेतला.

आपण रुपये ३६५ दिले तर आपल्या नावे वर्षभर आरतीची वात पेटविली जाते.

अनेक जणांनी या साठी धन दिले. मीही दिले. नंतर रात्रीच्या विश्रांतीसाठी हॉटेलवर आलो.




N.P. 3 /11                                                                           पुढे ...