N. P. O1 / 11.
परिक्रमा वर्णन २४ फेब्रुवारी २०२३ .
मी पनवेल येथे राहतो. २४ फेब्रुवारी पहाटे ६ वाजता परिक्रमेची बस दादरहून सुटणार होती. म्हणून काल सायंकाळी ५ वाजता घरून एस टी बसने निघालो. साडे सहा सुमारास दादर चित्रा सिनेमा बस स्टॉपवर उतरलो. तेथून प्रतीमकडे (पुतणी) जाण्यासाठी खूप प्रयत्न करून टॅक्सी न मिळाल्याने दादर वेस्ट ला चालत घरी पोहोचलो. प्रतीम ने उत्तम पाहुणचार केला. लवकर उठून स्नान करून तयार झाल्यावर, सकाळी सव्वा पाचला रघुने (जावई) प्रभू ट्रॅव्हल्सच्या बसवर सोडले.
सहाला बस निघाली. वाटेत लोकांना pick-up करीत पुढे नाश्ता वगैरे झाल्यावर धुळ्याच्या अलीकडे ७० km वर जेवण घेतले. चारच्या सुमारास धुळे हॉटेल कान्हा रिजनसी ल पोहोचलो. चहा, थोडा आराम करून धुळ्याजवल असलेल्या स्वयंभू एकवीरा देवीचे दर्शन व आरती करून आता परत हॉटेलवर जात आहोत. जेवण व झोप.
रोज सकाळी सर्व आवरून सकाळी समानासह बसकडे यायचे आणि सहा वाजता प्रवास सुरू करायचा, असा रोजचा कार्यक्रम असेल. उद्या ओंकारेश्वर दर्शन, स्नान आणि परिक्रमा संकल्प पूजा असा कार्यक्रम आहे. ओंकारेश्वर ला दुपारी १२ वाजेतो पोहोचू. ओम नर्मदे हर!!
२५ फेब्रुवारी
सकाळी सहाला बस सुटली. सुमारे एक वाजता ओंकारेश्वर पासून १२ कि.मी वर बंधन रिसॉर्ट, मोरटक्का येथे आली. सामान उतरवून रूममधे जायला बराच वेळ लागला. आमची रूम लॉक लागत नसल्याने बदलावी लागली.
जेवण होऊन ममलेश्र्वर मंदिराकडे निघायला तीन वाजून गेले. मंदिर जवळच होते, सुमारे चारला पोहोचलो.
नर्मदेच्या अलीकडे ममलेश्र्वरआणि पलीकडील तीरावर ओंकारेश्वर असे मिळून हे एक ज्योतिर्लिंग आहे. पूर्वी पावसाळ्यात चार महिने ओंकारेश्वर मंदिर पाण्याखाली जात असे. म्हणून ममलेश्र्वरची पूजा होत असे. अजून ती प्रथा कायम आहे. येथे घाटावर प्रथम सर्व जणांनी स्नान केले.
पात्रात पाणी कमी होते तरी वाहत्या जलात स्नान झालं. छान वाटल. गर्दी बऱ्यापैकी होती. मंदिराजवळील घाटावर बसून सर्वांनी एकत्र यात्रेचा संकल्प पूजा, होम, आरती केली. यात्रा प्रारंभ झाला. नर्मदा जल एका कलशात भरून घेतले. हा कलश यात्रा समाप्ती पर्येंत जवळ ठेवायचा असतो.
नंतर, प्रत्यक्ष नर्मदेत जाऊन हळद, कुंकू पूजा आणि दीपदान केले. नंतर ममलेश्र्वर दर्शन झाले. त्या मंदिराच्या रांगेत पायी परिक्रमा पूर्ण झालेले काही यात्रेकरू भेटले. यात्रा पूर्तीचे समाधान त्यांच्या थकलेल्या कायेवर स्पष्ट दिसत होते. तिथे शेजारीच गजानन महाराज उत्कृष्ठ मंदिर आहे. दर्शन घेऊन रात्री रूमवर यायला आठ वाजले.
रोज तीन पाने "ओम नर्मदे हर" असा जप लिहिण्यासाठी प्रभू ट्रॅव्हल ने स्पेशल वही, पेन दिले आहे.नर्मदा अश्टकम चा प्रिंट आउट देखील दिला आहे.
उद्या राजघाट, जैन मंदिर वगैरे गोष्टी करून मुक्कामी शहादा येथे जायचे आहे. रोजचा दिनक्रम जरा हेक्टिक आहे. पण ठीक आहे.
ओम नर्मदे हर!!
२६ फेब्रुवारी.
आज सकाळी नेहमीप्रमाणे निघालो.आज नाश्ता skip केला.
११ च्या सुमारास राजघाटला पोहोचलो. तिथे नर्मदा पूजा आणि दीपदान केले. माझे ४२ वर्षीय निवास साथी , श्री शेखर जोशी, हे एक उत्तम पुरोहित आहेत. अनेक स्तोत्र, मंत्र पाठ आहेत. काही विशिष्ठ साधना करतात.
स्टेज आर्टिस्ट आहेत. सहा भाषा येतात. शेखरचे पूजाविधी साठी मार्गदर्शन घेतो.
येथे काही लहान मुले, मुली होत्या त्यांना आणलेली तयार खाऊ पाकिटे वाटली. येथे एकमुखी दत्त मंदिर आहे, पण ते पाण्याखाली गेले आहे असे सांगितले.
नंतर तेथून पुढे बावन्न डोंगरात वसलेल्या जैन तीर्थक्षेत्री आलो. मार्गी जंगली प्रदेश आहे. पण उजाड आहे. पूर्वी या भागात काही स्थानिक लोकांची यात्रेकरूंना भीती वाटे.आता ती स्थिती नाही.
जैन मंदिर परिसर प्रशस्त आहे. संपन्न आहे. मंदिर जुने आहे. येथे डोंगरात कोरलेली ८४ फुटी दिगंबर महावीर मूर्ती आहे.
येथे यात्रेकरू दिसल्यावर परिसरातील गरीब मुले जमतात.. त्यांना जरी मदत हवी असली तरी ते आपल्याकडे काही मागणी करत नाहीत. त्यांना आम्ही सर्वांनी खाऊ वाटप केले
आजपासून प्रवास सुरू होताना सकाळी गणपती, देवी, शंकराची आरती, नर्मदा आरती, दत्त आरती, नर्मदाश्टकं वगैरे स्तोत्रपाठ म्हणणे सुरू झाले. या व्यतिरिक्त भगिनी सहप्रवासी विष्णू सहस्त्रनाम अथर्वशीर्ष, श्रीसुक्त आणि त्यांच्या गुरू पंथाची स्तोत्रे अधिकीची देखील म्हणतात.
देसाई पती, पत्नी, आणि वडील देसाई , (प्रभंजन,-प्रभू, रागिणी आणि पप्पा), असे तीन जण यात्रा आयोजक आहेत. अनेक नर्मदा परिक्रमांचा अनुभव त्यांच्या गाठी आहे. ते सर्व जण वातावरण हलके, फुलके ठेवण्या बरोबर यात्रा आणि स्थळमहत्व वगैरे सांगतात.
जेवण, नाश्ता, चहा, कॉफी व्यवस्था चांगली आहे. जेवण घरगुती वाटावे असे आहे. रोज बस प्रवासात काही गाणी एखादा चित्रपट असतो. आज सावरकर पुण्यतिथी निमित्त वीर सावरकर चित्रपट होता. वडील, पप्पा देसाई वेगवेगळे किस्से सांगतात. १५ दिवसात साधारण ४५०० किलो मीटर्स (मुंबई - परिक्रमा - मुंबई) प्रवास आहे. म्हणजे रोज भरपूर वेळ प्रवास असतो. प्रवास पूर्ण दिवसात असतो. रात्री नाही.
26/02, आज सायंकाळी ६ च्या सुमारास शेर ए पंजाब हॉटेलवर आलो. मुक्काम शहादा येथे आहे. हा गाव महाराष्ट्रात आहे. उद्या गुजरातेत जाऊ. नारेश्वर ला जाऊ. रंग अवधूत आश्रम आहे.
N. P. 1/11 पुढे
No comments:
Post a Comment