Thursday, August 31, 2023

   

 N. P. 02/11        २७ फेब्रुवारी.



बसण्याच्या सोयीत समानता असावी म्ह्णून रोज बसमधील

आपली सीट बदलण्याची  रोटेशन सिस्टम आहे. 


ट्रीप मधे अमेरिका Canacticut येथील एक ज्येष्ठ जोडपे आहे. श्री कांबळी वय ८५ आणि त्यांची पत्नी.हे ट्रीप संचालक यांचे विशेष स्नेही, अतिथी आहेत.  त्यांच्या ज्येष्ठत्वाचा  मान म्हणून सर्वांनी त्यांना seat rotation मधून सवलत दिली आहे. बाकी सर्वांच्या बस मधील जागा (seats)  रोटेशन पद्धतीने बदलतात. बसमधे सर्वांना सारखी सोय, गैरसोय व्हावी यासाठी रोज एक रांग पुढे शिफ्ट व्हायचे.सर्वात पुढील सीट वरील लोकांनी सर्वात मागच्या रांगेत जायचे, अशी ही रोटेशन सिस्टीम आहे. देसाई जोडपे उजवीकडील पहिल्या रांगेत स्थिर रहातील. ही व्यवस्था आयोजकांनी सुचविली, सर्वांनी मान्य केली.

सौ कांबळी अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळात  मध्ये  सोशल वर्क करतात. 




आज २८ फेब्रुवारी, नेहमी प्रमाणे बस ६ला निघाली . प्रवास थेट शहादा ते भडोच,  जेथे नर्मदा समुद्रास मिळते तेथ पर्येत होता. वाटेत नेहमी प्रमाणे नाश्ता, चहा आणि एक नंबर साठी stops झाले. By the way, हा स्टॉप या परिक्रमेत नेहमीच आणि विशेषतः मध्य प्रदेशातून जातांना,

निसर्ग सानिध्यात under the sky roof असतो.


वाटेत संकलेश्वर हे शहर लागते. येथे प्रसिध्द खमण ढोकळा व बाटी डाल  सर्वांना देण्यात आली.

पुढे भडोच नंतर नर्मदा समुद्रास मिळते, तेथे खाडीवर एक ब्रीज आहे. तेथे बसमधून आम्ही नदी पार करून उत्तर तटावर आलो. तेथे श्री नीलकंठेश्र्वर शिव मंदिर आहे. तेथे देवदर्शन झाले.



मंदिराच्या मागील घाटावर जाऊन नर्मदा पूजा केली. दीपदान झाले. नर्मदेची प्रार्थना केली.

काही यथा योग्य दान धर्म, कुमारिका सन्मान  वगैरे केले. 

सर्वसाधारण प्रथे प्रमाणे, नर्मदा परिक्रमी सोबत नर्मदेचे पाणी बाटलीत बरोबर घेऊन प्रवास करतात. प्रभू ट्रॅव्हल्स त्या ऐवजी वेगळी व्यवस्था  करतात. ममलेश्वर घाटी सर्वांनी मिळून एक कलश भरून घेतला, त्याची पूजा केली

आणि नंतर त्या कलशाची बसमधे प्रवेश करताना समोर येईल अशी स्थापना केली. रोज बसमधे प्रवेश करताना सकाळी या कलशाची सर्व प्रार्थना करतात. आज या कलशातील थोडे पाणी बदलून निळकंठेशवर घाटावरील थोडे नर्मदेचे पाणी भरून घेतले. परत बस प्रवेश स्थानी कलशाची स्थापना केली. असा क्रम पुढे सुरु ठेवला. नर्मदेच्या काठी

पुढील प्रत्येक ठिकाणी या कलशातील थोडे पाणी कमी करून नवीन पाणी भरण्याचा उपक्रम आणि रोजचे दर्शन हे यात्रा सांगते पर्येत करायचे असते. आता रंग अवधूत स्वामी यांच्या नारेश्वर आश्रमाकडे  प्रवास आहे.




कोकणात जन्म घेतलेले स्वामी रंग अवधूत सत्य दर्शनाच्या अध्यात्मिक ओढीने साधनेसाठी भ्रमंती करत नर्मदेच्या किनाऱ्यावर पोहोचले, परिक्रमेत चातुर्मास मुक्कामासाठी निर्जन अशा नारेश्वर  येथे कुटी उभारून राहिले, ते स्थान आजमितीस  गुजरात नव्हे तर सर्व मानवतेला एक सात्विक वर्तनाचा

संदेश देता आहे. 


स्वामीजींच्या. अधिक माहिती साठी पुढील लिंक पहावी :


http://www.dattamaharaj.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%A4


आम्ही स्वामींच्या आश्रमात पोहोचलो.

मंदिरात दर्शन घेऊन काही मिनिटे डोळे बंद करून  विचारशून्य होण्याचा अभ्यास केला.

काही काळ खूप शांत वाटले. स्वतःसाठी स्वतःशी परीक्षणार्थ संवाद झाला. पुढील जीवन कसे असावे यावर थोडे चिंतन

चित्तात काही क्षण स्थिरावले. 

 "ज्या मार्गात आहेस त्या मार्गाने प्रगती कर” असा संदेश  अंतर्मनात उमटला. 

समाधान वाटले. 


परिसरात फेरी मारूनआश्रमाच्या वातावरणातील शांती अनुभवली. कार्यालयात ऐच्छिक देणगी दिली. येथल्या पुस्तक भंडारातून दत्त बावनी, अत्तर, विभूती, अष्टगंध घेतले. आणि हे पुण्यस्थळ पुढील प्रवासासाठी सोडले. 


येथून पुढे जेथे जेथे अशा सन्यासी, लोक कल्याणकारी, विभुतींच्या पुण्य स्थळांना भेटी झाल्या, येथे बहुदा  सर्वत्र मला स्वामीजींची, (स्वामी विज्ञानानंद, मनशक्तिकेंद्र, संस्थापक), महाशून्य बिंदुची आणि त्यांनी दिलेल्या सेवा संदेशाची आठवण प्रकर्षाने झाली, आजपर्येंत  मार्गात आपण स्थिर असल्याचे, राहिल्याचे समाधानही वाटले. या मार्गी प्रगती होण्याची

आणि सर्व कल्याणाची मागणी मनात उमटली. एक वेगळ्याच शांत अनुभूतीचा शब्दात व्यक्त न होणारा अनुभव, प्रत्यय आला.


भडोचला दिशा बदलली. दक्षिण किनाऱ्यावरून आता उत्तर किनाऱ्यावर आलो. या दिशेने  नर्मदा मय्या परिक्रमा सुरू आहे. 


येथील सुरवातीचा परिसर तरी अधिक समृद्ध, सुपीक आणि हिरवागार वाटतो. आता केवडिया कडे जात आहोत.

या परिक्रमेत जसा विविध पिकांनी समृद्ध असा विशाल शेतीचा परिसर लागतो,

तसाच डोंगराळ पण उजाड (दक्षिण किनारा, शूल पाणी पर्वत भाग)) तर डोंगराळ पण गर्द  झाडीने भरलेला आरण्याचा भाग देखील लागतो. नर्मदेचे पात्र कुठे अतिकृश तर कोठे विशाल

आणि विस्तीर्ण पाहायला मिळते. 


आता पुढील मुक्काम. ,केवदिया जवळ एक AC Tent camp, युनिटी रिसॉर्ट आहे. आज तिथे रहायची सोय आहे, जरा वेगळा अनुभव आहे. टेन्टच्या  बाहेर व्हरांड्यात बसायला आरामखुर्ची ठेवली आहे. इथून नर्मदा dam जवळ आहे. सरदार वल्लभभाई पटेल statue, आहे. Statue Of Unity.

हा नर्मदा जिल्हा आहे.




                                                                  


AC Tent मधील मुक्काम  जरा वेगळा वाटला. प्रवेश द्वाराने आत आलो. कडेला चारी बाजूस Tents आणि मधे मोठे मैदान आहे. 


सायंकाळी उशिरा पोहोचलो होतो.  गेल्यानंतर थोडा आराम केल्यावर, निवासी स्थिरस्थावर झाल्यावर,  काही सहप्रवासी  यात्रिक आपापल्या ग्रुपमधे जमले. गप्पा, गाणी, भेंड्या फिरणे असा कार्यक्रम करायला लोकांना फुरसत मिळाली. वातावरणात गुलाबी थंडी होती. हलका वारा होता. आकाश निरभ्र होते. क्षितिजावर स्पष्टपणे गुरू आणि शुक्र जवळ प्रकाशित झालेले  होते. शुक्र अधिक मोठा आणि प्रकाशमान दिसत होता तर गुरू थोडा तांबूस पण आकाराने लहान होता.


मंडळींनी कॅम्प फायर पेटविला. प्रभंजननने  सर्वांना एकत्र क्रेले.जेवण तयार होत होते. मग त्याने त्याच्या गत वर्षांतील यात्रेच्या दरम्यान भेटलेल्या काही वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती आणि वल्ली चे अनुभव सांगितले. त्यातील काही विशेष वाटले. पण एकंदर सांगण्याची पद्धत एकसुरी आणि अनाकर्षक वाटली. Tent मधे विश्रांती झाली.


आपल्या शेजारील असलेल्या  tent मधील आवाज येत स्पष्ट  होते. दिवसभर दमल्याने सर्व लगेचच झोपले. परिसर शांत , निवांत झाला. 


दुसऱ्या दिवशी, २८ Feb 


सकाळी सहाला निघालो.

गरुडेश्र्वर तेथील दत्त मंदिर, टेंबे स्वामी समाधी यांना भेट दिली. दर्शन घेतले, प्रार्थना केली.



प्रखर भक्ती आणि समर्पित साधना असलेल्या या पुण्यभूमी मधे, नर्मदा परिक्रमा करणाऱ्या टेंबे स्वामी  यांनी चातुर्मास केला. चातुर्मास केला म्हणजे काय ? 


त्यावेळी पायी परिक्रमा दीर्घकाळ चालणारी असे . पाऊस सुरु झाल्यावर पावसाळ्यात ती चालू ठेवणे शक्य नसे. याच दरम्यान  विशेष नियम, उपवास आणि व्रत पालनाचा चातुर्मास येतो. सर्व यात्रिक या काळात, परिक्रमा बंद ठेवून यात्रेकरूंना एकाच ठिकाणी रहावे लागते. 


अशा वेळी आपल्या यात्रेत, त्या काळी  निर्जन असलेल्या ठिकाणी, नर्मदा तीरावर  असलेल्या जागेत एक कुटी उभारून टेंबे स्वामी  राहिले. पुढे त्यांना  ही जागा आवडली. त्यांच्या साधनेसाठी, निवासासाठी  त्यांनी ती नक्की केली. आणि आज ते हजारो श्रध्दाळू लोकांचे  श्रध्दास्थान झाले  आहे. 

स्वामीजींच्या अधिक माहितीसाठी लिंक  (टेम्बेस्वामी)  


http://www.dattamaharaj.com/%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80


बस थांबण्याचे ठिकाण थोडे दूर आहे. तेथे भल्या पहाटे उतरलो. गावातून पाय वाटेने ग्रामीण परिसरात असलेल्या मंदिरात पोहोचलो. प्रातःपूजा सुरु होती. सर्वांनी या मंदिरात दर्शन घेतले, ध्यान प्रार्थना केली. आणि मग मय्याच्या घाटावर गेलो. वाटेत पायी प्रदक्षिणा करणारे यात्रेकरू भेटले. त्यांना दक्षिण देऊन वंदन करून थोडेसे बोलून पुढे आलो. 



आश्रमाच्या मागे  बंधाऱ्यावरून खळाळत वहात असलेली नर्मदा आहे. सकाळच्या वेळी सूर्योदयाच्या सुमारास थंड वाऱ्याच्या हलक्या झुळूकेमूळे खूप प्रसन्न वाटतं होते. सर्वांनी नर्मदाष्टकम एकत्रित म्हंटले आणि पुढे केवडीया, जिल्हा नर्मदा,  प्रवास सुरू झाला. केवडियाला नर्मदा dam आणि त्यावर असलेला सरदार पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. त्या परिसरात सकाळी ७ ४५ सुमारास पोहोचलो.


Statue of Unity . 

.

Unity statue ही जागा आणि पर्यटन स्थळ पूर्ण अंतर राष्ट्रीय दर्जाचं केलेले आहे. रेल्वे स्टेशन, तिकीट घर, पार्किंग, हॉटेल, फूड place  Caffeteria, स्वच्छता, elevators, moving paths, campus, buses सर्व, सर्वच उत्कृष्ठ दर्जाचे ठेवले आहे.


त्या  सर्व परिसरामधे statue व्यतिरिक्त पर्यटकांसाठी अन्य अनेक activities ,  attractions आहेत.

प्रवेशाचे तिकीट फक्त डिजिटल पद्धतीने मिळते. कॅश चालत नाही.

पार्किंग जवळ तिकीट घर आहे. तिथे सकाळी ८ वाजता तिकीट घेतले . रुपये १५०/ तिकीट, त्यात statue च्या पाया पर्येंत जाऊ शकता. पण statue मध्ये  असलेल्या viewings gallery मधे जाता येत नाही.



८५० रुपये तिकिटावर तिथे जाता येते. सायंकाळी असलेला लेझर शो पण include असतो. आम्हाला वेळ जास्त नव्हता. म्हणून १५० चे तिकीट घेतले.


स्टॅच्यू ऑफ युनिटी , हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे. हा पुतळा भारताततील गुजरात राज्याच्या राजपिपळा शहराजवळ नर्मदा धरणाजवळील साधू बेटावर उभारलेला आहे.

 


स्मारक २०,००० चौरस मीटर क्षेत्रात आहे आणि १२ कि. मी.  आकाराच्या कृत्रिम तलावाने घेरलेले आहे. १८२ मीटर (५९७ फूट) उंचीचा हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. ऑक्टोबर २०१४ मध्ये, या प्रकल्पाची संरचना, बांधकाम आणि देखभाल यासाठी २९८९ कोटी रुपयांचा करार लार्सन ॲन्ड ट्यूब्रो यांच्याशी केला होता. पुतळ्याचे बांधकाम ३१ ऑक्टोबर २०१४पासून सुरू झाले आणि मध्य-ऑक्टोबर २०१८मध्ये पूर्ण झाले.

भारतीय मूर्तिकार राम व्ही. सुतार यांनी ही संरचना (डिझाइन) केली होती. आणि पटेलांच्या जयंतीच्या दिवशी ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचे उद्घाटन केले


पुतळ्याची भव्यता जसजसे जवळ जाऊ तशी वाढत जाते. जगातील सर्वात जास्त उंची असलेला हा पुतळा आहे. त्याची भव्यता समजून घ्यायची असेल तर कल्पना करा. अगदी जवळून पाहिले तर त्याच्या पायांच्या अंगठ्याच्या एका नखांचा आकार तीन सुपा एवढा मोठा आहे. 

 

खालच्या लेवलवर मोठे exibition आहे. संबंधित सर्व माहिती तेथे चार्ट, पिक्चर्स, व्हिडिओज इत्यादी माध्यमातून पहायला मिळते. येथील सेक्युरिटी खूप  strict  पण नम्रपणे वागणारी आहे.स्वच्छता, टापटीप वाखाणण्यासारखी आहे. 


एकीकडे पुतळ्याची भव्यता तर चहू बाजूला नर्मदेचे अथांग पाणी आहे.

विंध्य आणि सातपुडा पर्वतांच्या तटांनी सर्व भव्य जलाशय बांधून गेला आहे.

सभोवताली नर्मदेचा अथांग जलाशय,  वर भव्य-अथांग आकाश , थंडगार वारा, प्रसन्न हवा, आपण उभे असलेली भूमी आणि सर्व  परिसराला प्रकाशमय करणारे सूर्य तेज अशा पंच भूतांच्या सानिध्यातील अशा  परिसरात चित्त प्रसन्न झाले.  स्व-देशात उभारलेल्या या मानव निर्मित वैशिष्ठयपूर्ण शिल्पाचे 

आणि त्याच्या व्यवस्थापनाचे एक असाधारण उदाहरण पाहिल्याने मन भरून येते. आपल्या देशाचे हे सर्वात उंच शिल्प आपल्याला अभिमानाचे, आणि उन्नत आत्मविश्वासाचे प्रतीक वाटते. 


नर्मदेचे वाहन, मगरीचे दर्शन. 


पुतळ्याच्या पायाकडून वरील दोन टप्पे करून खालच्या टप्प्यावर आलो. तेथून नदीकडे पाहिले तर किनाऱ्यवर थोडी बाहेर थोडी पाण्यात,  एक मगर पहुडलेली दिसली. मगर हे नर्मदा देवतेचे वाहन आहे असे म्हंटले जाते. या परिक्रमेत मगर दर्शन होणे,  सुलक्षणी मानतात.

आमच्यापैकी अनेकांच्या मोबाईल कॅमेरा मधून हे सुलक्षण टिपले गेले.


तिकीट घरापासून statue  दूर आहे. त्यासाठी जायला, यायला बसची सोय आहे. गुलाबी रंगाच्या ऑटो रिक्षा पण आहेत. या स्पेशल रिक्षा नर्मदा सरोवरामुळे  विस्थापित परिसरातील आदिवासी महिला ड्राईव्ह करतात. त्यांच्या साठी सरकारने त्यांना प्रशिक्षण दिले आहे.


अनेक शाळांचे विद्यार्थी statue दर्शनासाठी आले होते. विद्यार्थींना तिकीट कन्सेशन मधे मिळते. देशी, परदेशी अनेक पर्यटक दिसत होते. Statue ऑफ Unity  दर्शनाच्या अनुभव खूप चांगला होता.



भोजन नंतर चा प्रवास पुढे सुरु झाला. 








N. P. 2/11                                                                           पुढे ...


No comments:

Post a Comment