N. P. 5 / 11 ३ मार्च
सकाळी पाचला रूममधून खाली आलो.
नेहमीपेक्षा लवकर निघालो.
वाटेत नाश्ता, जेवण झाले. प्रवास खूप लांबचा होता.
३ वाजायच्या सुमारास बेडा घाट जवळील नर्मदा माई जवळ आलो.
धुवा धार धबधबा, ६४ योगिणी मंदिर, आणि भेडा घाट नाव सैर
आदी पहाणे येथे झाले.
धुवाधार छोटा धबधबा : तेथे नर्मदा पूजन,
दीपदान ओटी भरणे वगैर केले.
बस पासून दूर चालत जावे लागते.
Link धुवाधार
https://photos.google.com/photo/AF1QipNb3xr92hY1y-1cQK23G5WIO49idv7HqOU7zCVW
दुपारची वेळ, बऱ्यापैकी गरम होते.
नंतर तेथून चालत चौसष्ठ योगिनी
मंदिराला गेलो. येथे डोंगरावर सुमारे ३०० पायऱ्या
चढून जावे लागते.
मधोमध मंदिर असून मंदिराच्या चार बाजूला
६४ कलांच्या चौसष्ठ देवी मूर्ती आहेत.
पण या सर्व मोड तोड झालेल्या आहेत.
भंग झालेल्या आहेत.
नीट असते तर ते एक उत्कृष्ठ शिल्प कलेचे
वैशिष्ठ्य-पूर्ण ठिकाण झालं असते.
येथून खालच्या बाजूला नर्मदा पात्राचा
छान व्ह्यू मिळतो.
येथून पुढे भेडा घाट येथे नौका विहारा साठी गेलो.
हल्ली वरून घाटावर उतरण्यासाठी एक लिफ्ट केलीआहे.
प्रत्येकाने आपापले तिकीट घेतले.
भेडा घाट नौका विहार विशेष आहे.
येथे नर्मदेचे पात्र दोन्ही बाजूस असलेल्या
उंच काठांनी बंदिस्त संगमरवरी
दगडांच्या मध्ये वहाते.
या बोटीच्या फेरीत आपल्याला फिरविणारे
नावाडी माहिती देतात पण ती विशिष्ठ पद्धतीत.
त्यांची ही script वर्षानुवर्षे बदलत नाही,
७-८ वर्षांपूर्वी केलेल्या बोट राईडचे सर्व जोक्स
आणि शेर शायरी हा आमचा नावाडी आजही
त्या राईडचे वैशिष्ठय सांगतांना करीत होता.
त्यामुळे यात्रेकरूंची करमणूक होते, लोक खुश होतात
आणि नावाडी चांगली टीप मिळवतात.
सर्व संपेपर्येत सायंकाळ झाली. निवासासाठी जबलपूर, सत्य रक्षा हॉटेल वर आलो.
N. P. 5 /11. पुढे …
No comments:
Post a Comment