Thursday, October 29, 2020

गीता अध्याय १

 

 

गीता अध्याय १  - ध्वनी फीत 


अध्याय एक :  पाठ (पाठ दिनांक २१ जून २०२०).

अर्जुन विषाद योग. / सुख टिकेल  कसं?

अर्जुनास पापाचे भय वाटत होते.

गुरुजनांस – आप्तांस युद्धात मारणे हे पाप वाटत होते.

(मी मारणारा व हे मरणारे असे गृहीत होते).

म्हणून युद्ध करावे / न करावे ?

कशाने पाप-दुःख टळेल, पुण्य-सुख निर्माण होईल ?

योग्य / अयोग्य काय ?  हे कळत नव्हते. 

आपले सर्वसाधारणतः प्रश्न असतात : मला सुख कसं मिळेल?

त्या साठी जो झगडा करावा लागेल त्या यश कसं मिळेल ??

अर्जुनाला यशाची खात्री होती. त्याच्या प्रश्नाचे महानपण सर्वश्रेष्ठ होते, शंका अद्वितीय होती.

तो विचारत होता: 

“मला निश्चित मिळणारं ‘सुख’, माझ्या शत्रूला ‘दुःख’ देऊन मी भोगणं योग्य आहे का?

अशा त्यागपूर्ण, सूक्ष्म आणि भव्य प्रश्नाच उत्तर देणारा कृष्ण समोर होता हे अर्जुनाचं भाग्य ! 

अर्जुनाच्या विषादयुक्त मनस्थितीचं आणि त्यासंबंधी मुद्द्यांचं वर्णन या अध्यायात आहे. 


विजय रा.जोशी.


गीता अध्याय १ - ध्वनी फीत




Friday, October 23, 2020

गीता विवेचन ऑडिओ पोस्ट

 गीता विवेचन ऑडिओ पोस्ट  


प्रस्तावना पाठ - ध्वनी फीत 


मनशक्ती जळगाव जिल्हा केंद्र आयोजित गीतेवरील विवेचन मी जून २०२० पासून घेत आहे. आतापर्येत ९ अध्याय पूर्ण झाले असून १० वा  अध्याय सुरु आहे. ही विवेचन ऐकणाऱ्या अनेक श्रोत्यांनी विवेचने on line उपलब्ध करण्याचे सुचविले होते. म्हणून झालेली विवेचने ब्लॉग वर पोस्ट करण्याचा विचार आहे. त्यातील पहिले विवेचन, जे या उपक्रमाचा उद्देश सांगून गीता अभ्यास करणे प्रत्येकास सध्याच्या जीवनातही कसे उपयुक्त आहे, गीतेतील ज्ञान कसे सर्वस्पर्शी आहे, स्वतःच्या जीवनात प्रगती करून कशा पद्धतीने या ज्ञानाने मानव सुखी समाधानी होऊ शकतो इत्यादी माहिती दिली आहे. 


हे प्रस्तावना विवेचन इथे प्रसिद्ध करीत आहे. नंतर साधारण आठवड्याला एकेक विवेचन प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. ही  विवेचने  डाउन लोड तसेच शेअर करता येतील , आपल्याला यावर कमेंट्स देखील लिहिता येतील. 


एक तज्ज्ञ नव्हे तर अभ्यासक म्हणून हा उपक्रम घेत आहे. आपल्या सूचना योग्य वाटल्या तर त्याचा मला उपयोग होऊ शकेल. 


हरी ओम. 


विजय रा. जोशी