Thursday, October 29, 2020

गीता अध्याय १

 

 

गीता अध्याय १  - ध्वनी फीत 


अध्याय एक :  पाठ (पाठ दिनांक २१ जून २०२०).

अर्जुन विषाद योग. / सुख टिकेल  कसं?

अर्जुनास पापाचे भय वाटत होते.

गुरुजनांस – आप्तांस युद्धात मारणे हे पाप वाटत होते.

(मी मारणारा व हे मरणारे असे गृहीत होते).

म्हणून युद्ध करावे / न करावे ?

कशाने पाप-दुःख टळेल, पुण्य-सुख निर्माण होईल ?

योग्य / अयोग्य काय ?  हे कळत नव्हते. 

आपले सर्वसाधारणतः प्रश्न असतात : मला सुख कसं मिळेल?

त्या साठी जो झगडा करावा लागेल त्या यश कसं मिळेल ??

अर्जुनाला यशाची खात्री होती. त्याच्या प्रश्नाचे महानपण सर्वश्रेष्ठ होते, शंका अद्वितीय होती.

तो विचारत होता: 

“मला निश्चित मिळणारं ‘सुख’, माझ्या शत्रूला ‘दुःख’ देऊन मी भोगणं योग्य आहे का?

अशा त्यागपूर्ण, सूक्ष्म आणि भव्य प्रश्नाच उत्तर देणारा कृष्ण समोर होता हे अर्जुनाचं भाग्य ! 

अर्जुनाच्या विषादयुक्त मनस्थितीचं आणि त्यासंबंधी मुद्द्यांचं वर्णन या अध्यायात आहे. 


विजय रा.जोशी.


गीता अध्याय १ - ध्वनी फीत




4 comments:

  1. व्ही आर काका अतिशय उत्तमरीत्या तुम्ही मांडणी केली आहे,

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद।
      कंमेंट्स कुणाचे?
      नाव कळलं नाही।

      Delete
  2. ज्या बंधूं बरोबर ;मित्रांबरोबर लहानपणापासून खेळला;शिकला ;वाढला त्यांच्याबरोबर व शिवाय ज्यांनी शिकवलंअसे शिक्षक ; पिता मह सारखे लोकं समोर असताना त्यांना मारण्याची कल्पना वेदना देणारी होती!

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्याला ही कल्पनाही वेदनादायक वाटली यातुन आपली सहृदयता दिसते. आपल्या जिज्ञासेचे निराकरण होण्यासाठी गीता पाठ ध्वनिफिती जरूर ऐका.

      Delete