Statu
N. P. 03 / 11 १, मार्च, महेश्वर दर्शन.
Statu पासून निघालो ते गुजरात पार करून मध्यप्रदेशातील महेश्वर येथे आलो.
उशिरा सायंकाळी पोचलो.
येथील प्रसिद्ध उद्योजक पवार यांच्या लॉजमध्ये सामान ठेवले. जेवून झोपी गेलो.
त्या अगोदर वाटेत, भजन, प्रार्थना, नर्मदाष्टकम, नाश्ता असा प्रवासाचा एक टप्पा झाल्यावर
वाटेत जेवायला एका मंदिराशी थांबलो होतो. तो एक गरीब आदिवासी वस्तीचा गाव होता.
अनेक शाळकरी मुली तेथे जमल्या आणि बाजूला बसून होत्या. कुमारिकांना काही दान करावे
अशी या यात्रेत पद्धत आहे, त्या मुलींना काही वस्तू, खाऊ, थोडे पैसे आम्ही बऱ्याच जणांनी दिले.
त्यांच्या चेहऱ्यावरील मरगळ जाऊन हासू फुलले आणि मग त्यांनी आमच्या विनंतीवरून
त्यांचा पारंपरिक नाच केला. लिंक :
https://photos.google.com/photo/AF1QipM_IK41HEncZM9Axs8oHo9W9CWOgdJQvT4k1rgd
पुण्यश्लोक अहिल्याबाई यांचे शहर - महेश्वर
हॉटेल पायल पॅलेस, महेश्वर शहर बाहेर १५ किमी वर आहे.
सकाळी आज ७ वाजता खाली आलो. चहा नाश्ता करून नर्मदा घाटावर आलो.
महेश्वर नदी तटावरील घाट मोठे, भव्य आहेत. आत स्वच्छ, मोठा,
रुंद नर्मदा प्रवाह आहे. पायऱ्या आहेत. पण पाण्यात उतरून
५ ते ६ फूट पुढे गेले की पाणी खूप खोल आहे. तेथे सर्वांनी स्नान केले.
नर्मदाश्टक म्हंटले. प्रार्थना , अर्घ्य आदी गोष्टी झाल्या.
पुरुष आणि स्त्रियांसाठी घाट स्वतंत्र होते.
त्यानंतर ९ ते १२ वेळ हा खरेदीसाठी दिला होता. येथील महेश्वरी साड्या,
ड्रेस मटेरीयल प्रसिध्द आहे. येथे मंडळीनी मनमुराद खरेदी केली.
मी ही ३ साड्या घेतल्या.
नंतर जवळ असलेल्या जगातील सर्वात मोठ्या दत्त मंदिरास भेट दिली.
हे दत्तमंदिर खूप मोठ्या , काही एकर प्लॉट वर आहे. मूर्ती भव्य आणी अती सुंदर आहे.
दत्त मंदिर परिसरात काही पायी प्रदक्षिणा करणारे यात्री भेटले.
अशी चार मंदिरे भारतात बांधण्याचा संस्थेचा मूळ संकल्प होता,
त्यातील तीन बांधून पूर्ण झाली. उत्तराखंड मधील मंदिर अजून व्हायचे आहे.
नंतर. हॉटेलवर येऊन भोजन केले.
दुपारी जेवण, आराम झाल्यावर पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या राजधानी
असलेल्या किल्ला, मुझियम, मंदिरे, स्मारक आदी गोष्टी पाहिल्या.
काशी विश्वनाथ मंदिर, अत्यंत प्राचीन मंदिर आहे.
मार्कंडेय ऋषींना फक्त १६ वर्षे आयुष्य होते. शिव कृपेने ते अमर झाले,
ते हे शिव मंदिर. ऋषींची अधिक माहिती लिंक:
येथील नंदी खूप वैशिष्ठ्य पूर्ण आहे. समोर नर्मदेचे विशाल पात्र आहे.
इथे दर्शन घेतले, प्रभूने ग्रुप फोटो काढले.
नंतर शेजारील सहस्राअर्जुन मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
हा येथील राज्l . याने अती बलाढ्य अशा रावणाचा पराभव केला.
महिष्मतीi हे महेश्वर चे पूर्वीचे नाव.
या पराक्रमी राजाने या शिवलिंगा मधे देह सोडून जातांना आपले तेज
समर्पित केले असे सांगतात.
(रामायण में सहस्त्रबाहु अर्जुन का कई बार उल्लेख होता है।
तुलसीदास जी ने रावण की महिमा घटाने के लिये दो बार उनका उल्लेख किया है।
रावण की सभा में हनूमान और अंगद जब दूत बन कर जाते हैं,
तो रावण का उपहास करने के लिये यह उल्लेख करना नहीं भूलते
कि उसे सहस्त्रार्जुन ने बांध कर अपने किले के कोने में कैद कर लिया था
और फिर पुलस्त्य ऋषि के आग्रह पर छोड़ा था। एक बार परशुराम जनक की सभा में
कहते हैं कि उन्होने सहस्त्रार्जुन का वध किया था,
और वे यहां भी उनका नाश करने से चूकेंगे नहीं, अगर उन्हें यह नहीं बताया गया कि
पिनाक किसने तोड़ा है। कुल मिला कर रावण के संदर्भ में और परशुराम के संदर्भ में
सहस्त्रबाहु अर्जुन का बार बार उल्लेख मिलता है। \
हैहय सम्राट कार्तवीर्य अर्जुन (सहस्त्रार्जुन) के बारे में
अनेक प्राचीन महाभारतकालीन या उससे पहले के काल को दर्शाते हुये उपन्यासों में
बार बार पढ़ा था, वह माहेश्वर का था )
परिसर विडिओ लिंक.
https://photos.app.goo.gl/RFSdTuPTNy7GYt8t9
अहिल्याबाई होळकरांनी महेश्वरला आपली राजधानी केली होती. हिंदू धर्म स्थळांसाठी
त्यांनी भारतभर प्रचंड धन खर्चून जीर्णोद्धार केला. पण स्वतःचे नाव कुठे लावले नाही.
या किल्यात त्यांनी वापरलेल्या गोष्टी शस्त्रे, पूजा उपकरणे, शिवलिंग असे अत्यंत
अमूल्य आणि दुर्मिळ अशा गोष्टी ठेवल्या आहेत. नगर वासियांनी त्यांचे
जे पुतळा रूपाने स्मारक केले तेही आहे.
अहिल्याबाई, भारतातील सर्वतीर्थ क्षेत्रांचा जीर्णोद्धार, नाव कोठेही लावले नाही.
नगर वासियांनी पुतळा, घाटावर उभारला होता.
पण काही विशेष कारण नसतांना देखील . तीन वेळा पडला.
बहुधा निसर्गाला ती जागा मान्य नसावी ,
त्यांच्या राजवाड्याजवळ, पूजा घराजवळ नंतर
गावकऱ्यांनी तो किल्यात वर स्थापन केला. आणि मग तो स्थिर राहिला,
त्यावर नेहमी एक खार असते. असे प्रभू जी सांगत होते.
(जशी दोन कबुतरे नेहमी अमरनाथ क्षेत्री असतात.)
Link घाट परिसर
https://photos.google.com/photo/AF1QipPiINCtJX4DD7ngcv1_2NU1qk_CP4xuCZdpazLp
तिथून घाटावर उतरलो. येथे अनेक मंदिरे आणि सुंदर दगडातील कोरीव शिल्पे असलेली मूर्ती,
इमारती, मंदिरे, सभागृहे आहेत. घाटावरील सूर्यास्त खूप प्रेक्षणीय असतो.
या घाटावर अनेक चित्रपटांची शूटिंग झाली आहेत.
रोज येथे गंगेची सार्वजनिक आरती केली जाते. आम्ही येथे नर्मदा पूजन, दीपदान केले,
प्रार्थना केली आणि मग या आरतीत सहभागी झालो. प्रत्येकाच्या हाती आरतीसाठी साहित्य दिले
आणि छान सामुदायिक आरतीचा आनंद घेतला.
आपण रुपये ३६५ दिले तर आपल्या नावे वर्षभर आरतीची वात पेटविली जाते.
अनेक जणांनी या साठी धन दिले. मीही दिले. नंतर रात्रीच्या विश्रांतीसाठी हॉटेलवर आलो.
N.P. 3 /11 पुढे ...
No comments:
Post a Comment