N . P. 4/11
२ मार्च 2023
नर्मदेचे नाभिस्थान. केंद्र स्थान.
माहेश्वर येथून सकाळी सहाला नेहमी प्रमाणे नेमावर साठी निघालो.
सुमारे १ ला हॉटेलवर पोहोचलो.
भोजनानंतर नर्मदे मय्याच्या नाभिस्थान ठिकाणी
(केंद्र बिंदू, फोटोत तिथे लाल ध्वज लावलेला दिसेल.) पोचलो.
दुपारचा चारचा साधारण वेळ होता.
तेथे स्नान करणे हे यात्रेकरूंच्या साठी
खूप महत्वाचे आहे. स्नान पूजा, दीपदान,
कुमारी सन्मान हे सर्व केले.
घाटावर सिध्देश्वर शिव मंदिर अतिशय प्राचीन आहे.
येथून वरून नर्मदा पात्रात मधोमध असलेले नाभी स्थान
चांगले दिसते.
तेथे एक लाल रंगाचा ध्वज लावला आहे.
गर्दी फार नव्हती. दर्शन चांगले झाले.
या मंदिर परिसरात चहा पाणी झाले. काही निवांत वेळ मिळाला.
मंदिरा समोर बाकावर एक वृद्ध व्यक्ती बसली होती.
त्याला लोक पैसे देत होते.
ते सर्व पैसे ती व्यक्ती लगेचच गरजवंतांना वाटीत होते.
त्यांचे वास्तव्य तिथेच दीर्घ काळ असावे.
कोणी जवळ बसल्यावर ते या मंदिराबद्दल
त्यांना असलेली माहिती सांगत होते.
आमच्यातील काही लोकांनी, त्यांना काही प्रश्न व सल्ले विचारले.
मंदिराकडे पहात, हात हातात घेऊन
ते त्या त्या व्यक्तीची काही वैशिष्ट्ये
आणि त्यांच्या समोर सध्या असलेल्या समस्या सांगून
काही व्रत उपाय सांगत होते.
ऐकणाऱ्याला ते बोलणे प्रत्ययकारी वाटले.
अनेकांना त्यांच्याशी बोलावे वाटले, पण फार वेळ उपलब्ध
नव्हता.
शेजारी chinmyaanand मठ आहे.
तेथे नेहमी असलेले प्रमुख हे सन्यासी, व्रतस्थ , ज्ञानी आहेत.
पण ते परिक्रमेत असल्याने भेट झाली नाही.
रामदास स्वामी सारखे दिसणारे जोशी महाराज
तेथे पूर्वी असायचे.
त्यांचे आता देहान्तर झाले आहे. फोटो पाहिला.
मठात थोडे ध्यान, भजने, गीते (सौ परांजपे) झाली.
तेथील कार्यास मदत म्हणून लोकांनी पेटीत पैसे टाकले.
मीही दिले.
या आश्रमात खरे व्रतस्थ , मोक्षार्थी थोर साधकांची वस्ती असावी,
वातावरण प्रसन्न होते.
मठा पुढील भागात एक अतिशय छान, देखणी
कामधेनू वाटावी, अशी गाय होती.
पायी चालणाऱ्या यात्रेकरुंना येथे तीन दिवस
निवास आणि भोजन देण्यात येते. निःशुल्क.
परत हॉटेल वर आलो (संपदा गार्डन, खाटेगाव).
जेवून लवकर झोपलो. उद्या सकाळी ५ ला निघायचे,
जबलपूर हे पुढील स्थान आहे.
N. P. 4/11 पुढे
No comments:
Post a Comment