Thursday, August 31, 2023

 N. P. 7 /11                   ५ मार्च 



अमरकंटक येथील लॉज छान होता. आज माझा उजवा पाय आणि गुडघा खूप दुखत होता. चालायला त्रास होत होता. पण लवकर उठायचे नव्हते. सकाळी ६ ला उठलो.रात्री १० ते सकाळी ६ विश्रांती झाली. केशरी मलम, १९ नंबर mixture, molish तेल आणि विश्रांती याने बरे वाटले. अर्थात यास अखंड प्रार्थनेचा आधार आणि भगवंताचे नामस्मरण याची साथ होती.   




सकाळी ७ ३० ला नाश्ता, नंतर आरामात अंघोळ,असे उरकून थोडे बाहेर पडलो. लॉज शेजारी कल्याण आश्रम आहे. आश्रम उत्कृष्ठ वाटला.


आत एक छान मंदिर आणि परिक्रमावासी, साधक यांचेसाठी निवास, भोजन निःशुल्क सोय आहे. अनेक सांस्कृतिक सामाजिक कामे येथे चालतात असे कळले. येथील मंदिराच्या बाहेर एक साधक हटयोग करत एका विशिष्ठ पद्धतीने निश्चल उभा होता.


हा आश्रम फारच स्वच्छ, व्यवस्थित आणि उत्कृष्ठ रीतीने ठेवलेला दिसला. असे काही अन्य आश्रम, संस्था येथे आहेत. 


अमरकंटक हे एक हिलस्टेशन देखील आहे. दुपारी जेवण झाल्यावर जीप मधून माईचा  बगीचा येथे आलो. हे नर्मदेचे उगमस्थान.


भडोचला दक्षिण तटावरून नर्मदेच्या उत्तर तटावर आलो होतो. येथे परत उगमस्थला पल्याड जाऊन उत्तरेकडून दक्षिण तटाकडे  आलो. नर्मदेचे मंदिर 




लिंक -  नर्मदा तट उत्तरेकडून परत दक्षिण तीरावर. 


 https://photos.google.com/photo/AF1QipNduSFnEv1CyL5ymDTT_bn_vvtquiAwid4C1gbW


आणि पुढे एक नदी उद्गमाचे कुंड आहे.

उगम झाल्यावर नर्मदा गुप्त होते आणि थोडे अंतरावर परत उगम पावते आणि मग सलग प्रवाहित होते. 

 

तिथेच थोड्या अंतरावर शोन आणि भद्र अशा दोन नद्या उगम पावतात. भद्राचा संगम शोंन नदिशी काही फुटांवर तेथेच होतो. आणि पुढे शोंण  नदी बिहारला गंगेस मिळते. 




वाटेत श्रीयंत्र मंदिर, जे अजून पूर्ण झाले नाही, ते बघितले. या मंदिराचे काम पूर्ण झाले नाही कारण वर्षातून फक्त १५ दिवसच येथे काम करायचे अशी प्रथा आहे. 


(अमरकंटक में बन रहे अष्टधातु के श्रीयंत्र मंदिर में सिर्फ गुरु पुष्य नक्षत्र में ही निर्माण कार्य होता है। 1991 में मंदिर बनना शुरू हुआ था। इसके सात-आठ साल के भीतर बन जाने की उम्मीद है। ज्योतिष के मुताबिक गुरु पुष्य नक्षत्र निर्माण के लिए सबसे शुभ होता है। इसलिए इसे इसी नक्षत्र में बनाया जा रहा है।



शिल्पकार दक्षिण भारत और पश्चिम बंगाल के हैं। इसे फिर से शुरू करने के लिए गुरु पुष्य नक्षत्र का इंतजार किया जाता है। मंदिर का निर्माण महामंडलेश्वर अटल पीठाधीश्वर स्वामी सुखदेवानंद करा रहे हैं। इसकी सबसे बड़ी खासियत है कि इसके केंद्र में मां त्रिपुर सुंदरी की प्रतिमा स्थापित की जा रही है।)


पुढे येथे  एक नर्मदा मंदिर आहे जेथून नर्मदा जल प्रवाह मार्गस्थ होतो. दक्षिण आणि उत्तर तट यात्रेकरूंना आपापल्या भागात रहायची दक्षता इथे घ्यावी लागते. दक्षिण तट आणि उत्तर तट यात्रेकरूंसाठी स्वतंत्र प्रवेश द्वारे आहेत . मूळ उगमस्थानी गुप्त झालेली नर्मदामय्या येथे या ठिकाणी असलेल्या जलकुंडात प्रकट होते.   या ठिकाणी जेथून जमिनीखालून हा प्रवाह मार्गस्थ होतो त्याचे मार्किंग नीट पाहून परिक्रमा करणाऱ्या यात्रेकरुंना आपापला तट सांभाळायची काळजी घ्यावी लागते. प्रभू दाम्पत्य यासाठी खूप काळजी घेत होते. 


तेथे सर्वांनी प्रार्थना केली, नर्मदाष्टक म्हंटले.

कपाळावर गंध रेखून घेतले, अनिकेतने त्याचे फोटो काढले, वगैरे. 


इथून पुढे अतिशय छोट्या प्रवाहात नर्मदा मार्गस्थ होते. पण काही ठिकाणी बंधारे बांधून काही जलाशय निर्माण केले आहेत. एका अशा जलाशयात  भव्य शंकराची पुतळा रुपी मूर्ती उभी केली आहे


येथून पुढील प्रवास काही वेळ घनदाट जंगलातून सुरू होतो. हा नक्षलवादी भाग आहे . येथे क्वचित जंगली प्राण्यांचे दर्शन घडू शकते. दंतेवाडा येथील ७० पोलिसांची हत्या याच जंगल भागात झाली. हा छतीसगड मधील प्रदेश आहे. 

 

नंतर हॉटेल अनुराग, दिंडोरी येथे आलो.  सामान वगैरे मिळायला थोडा वेळ लागला. आम्ही दुसऱ्या मजल्यावर होतो.खूप थकायला झालं होत. जेवलो नाही.


 N. P. 7 /12                                                                     पुढे…


No comments:

Post a Comment