Tuesday, September 5, 2023

   N. P. 00 /11                                                                           

नर्मदा परिक्रमा २४ फेब्रुवारी ते १० मार्च २०२३. 

विजय रा. जोशी. 

भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना लोकमाता अर्थात देवता मानतात. निसर्गा बद्दल  पूज्यभावना कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्याची पुरातन परंपरा भारतीय भूमीत चालत आलेली आहे. कृतज्ञता आणि सदभाव  व्यक्त करण्याच्या नानाविध प्रथा, पद्धती आणि रितीभाती आहेत. अशापैकी एक वैशिष्ट्यपूर्ण आणि पृथ्वीतलावरची एकमेवाद्वितीय परंपरा आहे. नर्मदा परिक्रमेची !

नर्मदा परिक्रमा: नर्मदेच्या काठाकाठाने केलेली प्रदक्षिणा म्हणजेच नर्मदा परिक्रमा. ही एक धार्मिक यात्रा आहे, जी पायी पूर्ण करावयाची असते . ही यात्रा धार्मिक अंगाने केली जात असली तरी वाटेत पावलोपावली भेटणारा निसर्ग परिक्रमावासीयांना अंतर्मुख होण्यापलीकडेही बरंच काही शिकवून जातो. ही परिक्रमा म्हणजे मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक तप आहे.

हि परिक्रमा पायी पूर्ण करण्याला खूप महत्व आहे. परिक्रमेतील आत्मिक व दैवी अनुभूती फक्त पायी परीक्रमेतच मिळू शकतात. परंतु आताच्या काळात ज्यांना शरीर अस्वास्थ्यामुळे अथवा वेळे अभावी पायी परिक्रमा करणे शक्य नसते असे लोक हि यात्रा बसने अथवा स्वतःच्या दुचाकी, चारचाकी वाहनाने देखील १५ दिवस, २१ दिवसांत पूर्ण करतात.

नर्मदा परिक्रमा ही मोठी परिक्रमा आहे. श्री काशी क्षेत्राची पंचकोस परिक्रमा, तर अयोध्या - मथुरा यांची चौऱ्याऐंशी कोस परिक्रमा, नैमिषारण्य - जनकपुरी परिक्रमा या सर्वाहून मोठी परिक्रमा म्हणजे नर्मदा नदीची परिक्रमा, जी जवळजवळ ३,५०० कि.मी. आहे . सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ नदी म्हणून गंगेचे महत्त्व असले तरी फक्त नर्मदा नदीचीच परिक्रमा होते. नदी जशी वाहते तशी तिच्या काठाने केलेली गोल प्रदक्षिणा म्हणजे नर्मदा परिक्रमा.

नर्मदा मैया मध्य प्रदेश व गुजरात या दोन राज्यांतून वाहणारी प्रमुख नदी आहे. अमरकंटक शिखरातून तिचा उगम होतो. सातपुडय़ाच्या अमरकंटक या छोटय़ाशा गावातून निघून बराच मोठा प्रवास करून ती अरबी समुद्रास मिळते. नर्मदा नदीस उत्तर आणि दक्षिण भारताची सीमारेषाही मानली जाते. नर्मदेचे धार्मिक महत्त्वही खूप मोठे आहे. महाभारत आणि रामायणात ती रेवा या नावाने ओळखली जाते. हिच्या महिमेचे वर्णन चारही वेदांत आहे.

भरतखण्डात नर्मदेपेक्षाही आकार विस्तार नि लांबीत अन्य मोठ्या नद्या असल्या तरी त्यांचं आकारमान आणि विस्ताराच्या मोजमापांपेक्षा नर्मदेचं प्राचीनत्व नि पुण्यप्रदान करण्याचं सर्वश्रेष्ठत्व अशा वैशिष्ट्यांमुळे परिक्रमा केवळ नर्मदेचीच केली जाते !

नर्मदा-परिक्रमेचे प्रवर्तक श्रीमार्कण्डेय मुनी ! त्यांनी सुमारे सात हजार वर्षापूर्वी नर्मदेची परिक्रमा केली. त्या परिक्रमेचं वैशिष्ट्य असं की त्यांनी नर्मदेचीच नव्हे तर तिच्या उभय तटांवर  येऊन मिळणाऱ्या ९९९ नद्यांच्या धारा-प्रवाह न ओलांडता प्रत्येकीच्या उगमाला वळसा घालून मार्गक्रमण केलं. अशा पूर्णत: शास्त्रोक्त महापरिक्रमेला त्यांना २७ वर्षे लागली !

नर्मदेच्या दक्षिण तटावरील राजघाट ते अंकलेश्र्वर दरम्यानच्या दीडशे किलोमीटर टापूतील शूलपाणीची तसेच उत्तरतटावरील गरुडेश्वर ते धर्मराय कोटेश्वर दरम्यानची जंगल-झाडीची वाट नर्मदेच्या तटानंच पार करणे हे पूर्वी फार खडतर तसेच धोक्याचे असे. पण बदलत्या सामाजिक,आर्थिक परिस्थितीने हे आत एवढे अवघड राहिले नाही. तसेच येथील मार्गदेखील पूर्वी सारखे दुर्गम राहिले नाहीत. 

नर्मदा-परिक्रमा कोणत्या वयात करावी ? कुणी म्हणतील, नर्मदा-परिक्रमा ही जेव्हा रिकामपण येतं तेव्हा म्हणजे उत्तर आयुष्यात - वानप्रस्थाश्रमाची वाटचाल आहे. खरं तर मानवी मनाचं उन्नयन, निर्मलीकरण, सबलीकरण साधण्याचा मानवी जीवनातील आदर्श कालखंड म्हणजे ब्रह्माचर्याश्रम आणि  गृहस्थाश्रम ह्या दरम्यानचाच आहे. कारण ह्या कालावधीत जर प्रत्येकानं आपापल्या मनाचं उन्नयन/सबलीकरण निर्मलीकरण साधलं (सांगायला जरी हे ठीक असलं तरी ते सोपं निश्चितच नाही!) तर ते त्या व्यक्तीच्या पर्यायानं समाजाच्या स्वास्थ्याला उपकारकच असणार आहे. अर्थात चांगलं कृत्य करायला कधीच उशीर झालेला नसतो. त्यामुळे नर्मदा-परिक्रमा आयुष्यात केव्हाही करायला काहीच हरकत नाही. 

नर्मदा-परिक्रमा कशी करावी ? ज्यांना शारीरिकदृष्ट्या किंवा वेळेअभावी पायी परिक्रमा शक्य नाही अशांनी अगदी दोन - तीन आठवड्याच्या कालावधीत वाहनाद्वारे नर्मदा-परिक्रमा केली तरीसुद्धा चालेल. परिक्रमा कशीही करावी, पण ती जाणीवपूर्वक, डोळसपणे नि श्रद्धेनं करणं अगत्याचं आहे.

त्वदीयपाद पंकजं नमामी देवी नर्मदे ! नर्मदे हर !!

 N . P. 00 / 11                                                                                 पुढे … 

No comments:

Post a Comment