Monday, December 27, 2021

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 66 ते 70 : ध्वनिफीत




सारांश श्लोक ६६ - ७०. 

सत आणि असत यातील सत घ्यावे असत टाकावे असे कितीही सांगितले तरी असत संसार हाच सत वाटल्यामुळे माणूस संसारात गुंतूंन राहातो. राघवाचे ध्यान करा असे सांगतांना तो राघव कसा आहे याचे वर्णन हे श्लोक करतात .

सावळ्या  वर्णाचा , अतिशय सुंदर, धैर्यवान आहे, शांत आहे, स्थितप्रज्ञ असा आहे. लहानपणी अनेक राक्षसांचा यज्ञ संरक्षणासाठी  सामना करावा लागला, राज्याभिषेक व्हायच्या क्षणी वनवासात निघावे लागले, वनवासात अतिशय खडतर जीवनक्रम कंठावा लागला, रावण वध झाला सीतेला अग्निदिव्य करावे लागले . कोठेही चलबिचल झाली नाही (महाधीर गंभीर).

भगवंताजवळ सुख आणि आनंद आहे आणि देण्याची इच्छा पण आहे. ते भयाचे निवारण करतात. पण भक्ती बरोबर जर चुकीचे वागणे आणि हेवा/मत्सर असेल तर भक्ती उपयोगी पडणार नाही. म्ह्णून भक्ताचे वागणे सावध हवे, काळजीपूर्वक चांगुलपणा जपायला, सांभाळायला हवा. 

सद्गुरू निष्ठा , ईश्वर निष्ठा याचे आध्यत्मिक जीवनात खूप महत्व आहे.  त्याने जीवनात वैचारिक अधिष्ठान , स्थिरता प्राप्त होते, साधनेच्या वर्तनाने ती वाढत जाते. म्हणून राम भक्ती जीवनास जोडा. 

प्रत्येक दिवस - प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥ आणि दिवसभर हे अनुसंधान राखून निजतांना सर्व दिवसकार्य रामास समर्पण करून शांत व्हावे आणि निद्रा स्थितीत विलीन व्हावे. 

घरातील ज्येष्ठ व्यक्ती आपुलिकने जसे आपल्याला भले  काय ते सांगतात तसा हा उपदेश आहे. 

काय होत आहे आणि आपण काय करायला पाहिजे , दोन्ही सांगितले आहे. हे सर्व समजून घेण्यासाठी ध्वनीफीत जरूर ऐका . आवडल्यास इतरांना ऐकण्याची शिफारस करा ही  विनंती. 



विजय रा. जोशी. 

 

 



1 comment:

  1. रामदास स्वामी यांनी श्रीरामाच्या अनुसंधानात सतत रहावे आणि रात्री सर्व रामाला अर्पण करावे.संसारात गुंतले कि राघवाचे विस्मरण होते म्हणून हा संसार असतं आहे हे लक्षात घ्यावे हे उत्तम समजावले! धन्यवाद!

    ReplyDelete