स्वामी विज्ञानानंद : मानवता कल्याणासाठी समर्पित जीवन
संकल्प दिन - २३ एप्रिल हा स्वामी विज्ञानानंद (स्वामीजी) यांचा जन्मदिवस. मनशक्ती साधक हा दिवस ‘संकल्प’ दिन म्हणून पाळतात. या दिनानिमित्त दि २५ एप्रिल २०२१ रोजी online घेतलेला पाठ.
समाधी स्थितीत देह काही काळ सोडून परत देहात येण्याचा आणि त्यामधील काळात काही संशोधन/प्रयोग करण्याचा , त्याचा अनुभव इतरांना देण्याचा हा एक अगोदर सार्वजनिकरित्या जाहीर केलेला विलक्षण प्रयोग सुरु होण्याच्या अगोदर काही मिनिटे थांबविला गेला.
हा प्रयोग काय होता, कशासाठी होता, त्यात काय साध्य करायचे होते, त्यासाठी किती दीर्घ काळ पूर्व तयारी केली होती, आणि तो का संपन्न होऊ शकला नाही यावर आणि इतर संबंधित गोष्टींवर नंतर स्वामीजींच्या जे सविस्तर निवेदन प्रसिद्ध केले, त्यातील काही भागावर आधारित हा ऑडिओ पाठ आहे.
स्वतःची सर्व साधना आणि अभ्यास , स्वामीजींनी विज्ञान आणि अध्यात्म याचा समन्वय करून मानवी जीवन/व्यवहार कसा योग्य, अर्थपूर्ण होऊ शकेल यावर मार्गदर्शन करण्यासाठी उपयोगात आणला. त्यातील हा न साधू शकलेला समाधी प्रयोग आणि त्याची सर्व हकीगत सर्व श्रोत्यांना नक्कीच विलक्षण आणि प्रेरणादायी वाटेल.
विजय रा. जोशी.
No comments:
Post a Comment