गीता अध्याय १३, भाग १ , ध्वनी - चित्र फीत
तेराव्या अध्यायात जे पहायचे आहे ते स्वधर्माचरणास फार उपयुक्त आहे.
व्यासांनी आपल्या जीवनाचे सार भगवत्गीतेत ओतले आहे. महाभारताची संहिता लाख, सव्वा लाख आहे. आपण गीतेचा अभ्यास करत आहोत त्यातील मुख्य उद्देश हाच कि जीवनात ज्या ज्या वेळेला आपणास मदतीची आवश्यकता असेल त्या त्या वेळेला गीतेपासून ती मिळावी. अशी मदत आपल्याला सदैव मिळण्यासारखी आहे. गीता हे जीवन उपयोगी शास्त्र आहे. म्हणून गीतेमध्ये स्वधर्मावर जोर दिला आहे. तेराव्या अध्यायात जे पहायचे आहे ते स्वधर्माचरणास फार उपयुक्त आहे.
जीवन = जड (शरीर) व अजडाची (मन) एकत्रता.
तेराव्या अध्यायाच्या प्रारंभा पासून जीव हा भौतिक प्रकृतीच्या संपर्कात
कसा येतो , कर्म, ज्ञान, भक्तीच्या अधाराने भगवंत जीवाचा कसा
उद्धार करतात याचे विवरण करण्यात आले आहे. जीवात्मा हा जरी शरीरा पासून भिन्न असला तरी कोणत्या ना कोणत्या रीतीने त्याचा देहाशी संबंध येतो त्याचेही विश्लेशण करण्यात आले आहे.
आंतरिक शोध घेताना , म्हणजेच आत्म्याचे ज्ञान प्राप्त करीत असताना केवळ बुद्धी उपयोगी पडत नाही. जन्मो-जन्मी झालेल्या संस्कारांमुळे बुद्धीवर मलीनतेचा पडदा असतो. हा पडदा जो पर्येंत दूर होत नाही तो पर्यंत आत्म्याचा साक्षात्कार होत नाही.हा पडदा चित्त-शुदधी मुळे दूर होतो. अशी चित्त शुद्धी साधणे म्हणजेच ज्ञान बाकी सगळे अज्ञान.
‘तू आत्मरूप आहेस’ हे पवित्र ज्ञान येथे आपल्यास दिले जात आहे.
तू माझेच अल्पांश् रूप आहेस.आणि या माझ्या रुपाचा नाश करणेचे सामर्थ्य
कोणामध्येही नाही. हा सूक्ष्म विचार जीवनांतील अनेक भये दूर करणारा आहे. एक प्रकारचा अद्भुत आनंद मनात निर्माण करणारा आहे.मी देहासाठी नाही तर सद्हेतू साठी, परमेश्वरी कार्यासाठी जगेन. ज्या ज्या वेळी परमेश्वरी तत्व दुषित होत असेल त्यावेळी मी सर्वस्वाने लढेन. आवश्यक वाटेल तर
या कार्यासाठी मी माझा देह सुद्धा फेकून देईन. परमेश्वरी तत्वाला उज्ज्वल
करण्यासाठी देहाचा होम करायला मी सदैव तयार असेन...देह हे साधन आहे त्याचा उपयोग संपेल त्या दिवशी हा देह फेकून द्यायचा आहे. आत्म्याच्या (स्वतःच्या) विकासाची ही युक्ती भगवान येथे सांगत आहेत. या अध्यायात देहाचा व तो देह ज्याच्या सत्तेने चालतो त्या पुरुषाचा विचार केला आहे. ह्यालाच क्षेत्र क्षेत्रज्ञाचा विचार असे म्हणतात.
या अध्यायात क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. त्यासाठी हा भाग ऐका .
ज्ञान : देह – आत्मा यांचे पृथःकरण सत्यासत्य विवेका खेरीज शक्य नाही. हा
‘विवेक’ हे ‘ज्ञान’ अंगी बाणले पाहिजे. ज्ञान याचा अर्थ आपण ‘जाणणे’ असा करतो. परंतु ‘बुद्धीने जाणणे’ म्हणजे ज्ञान नव्हे... फक्त बुद्धीने जाणून भागात नाही. ज्ञान जीवनात भिनले पाहिजे, हृदयांत मुरले पाहिजे ते ज्ञान हात, पाय,
डोळा (यांच्या कृतीतून) यातून प्रकट झाले पाहिजे. सर्व ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये
विचार पूर्वक कर्म करीत आहेत असे झाले पाहिजे. भगवंतांनी ‘ज्ञान लक्षणे’ सांगितली आहेत, ‘अज्ञान लक्षणेही’ सांगितली आहेत. ती पुढच्या भागात बघू,
विजय रा. जोशी
गीता अध्याय १३, भाग १ , ध्वनी - चित्र फीत
No comments:
Post a Comment