गीता अध्याय १2, भाग 2 , ध्वनी फीत
भक्त लक्षणे
सर्व भुतांच्या ठिकाणी द्वेष न करणारा, मैत्रीने वागणारा, आणि तसाच कृपयुक्त , मी-माझेपण रहित, सुख व दुःख समान मानणारा. क्षमाशील (१२/१३)
सर्वदा संतुष्ट, योगी, नियतचित्त, माझ्या ठिकाणी ज्याचे मन दृढ आहे असा, माझ्या ठिकाणी ज्याने मन व बुद्धी अर्पण केली आहेत; असा जो माझा भक्त असतो , तो मला प्रिय आहे. (१२/१४)
ज्याचा लोक कंटाळा करत नाहीत व जो लोकांचा कंटाळा करत नाही , जो हर्ष, क्रोध, भय यांच्यापासून सुटला आहे; तोच मला प्रिय आहे. (१२/१५)
निरपेक्ष, शुद्ध, तत्वार्थींचा देखणा, उदासीन, संसारदुःख विरहित, कर्मारंभास आवश्यक असणारा जो अहंकार ;तद्विरहित, असा जो माझा भक्त असतो तो मला प्रिय आहे. (१२/१६)
जो हर्ष पावत नाही, द्वेष करत नाही, शोक करत नाही, (अप्राप्त वस्तूची) इच्छा करीत नाही, चांगले व वाईट या दोन्हीचा त्याग केलेला जो भक्तिमान मनुष्य असतो, तो मला प्रिय आहे. (१२/१७)
शत्रू, मित्र, मान व अपमान यांच्या ठिकाणी समान असणारा , शीत व उष्ण , सुख व दुःख यांच्या ठिकाणी समान असणारा (अंतर्बाहय), सग रहित. (१२/१८)
निंदा व स्तुती समान मानणारा ,मौनी, जे काही मिळेल त्यांत संतोषवृत्ती ठेवणारा, कोठेच आश्रय धरून न रहाणारा, स्थिरबुद्धी असलेला जो भक्तिमान मनुष्य , तो मला प्रिय आहे. (१२/१९)
भगवंताचे गुण आदर्श समजून त्या प्रमाणे वागणे म्हणजे भक्ती
भक्तीसाठी मन तयार करायला व भक्तीचे वातावरण तयार करायला -- ज्या कृती, कर्म कांड आहे तेवढेच आपण करतो. व ती भक्ती असे समजून चालतो. पण हे विधी केल्यावर भगवंतात मिसळून जायचे असते ते आपण करत नाही. म्हणून अनेक वर्षे आपली पूजा असफल रहाते.
मी गोपाळ कृष्णाचा भक्त आहे तर मला गोपाल कृष्णाच्या गुणांचे ज्ञान असायला हवे. ते गुण माझ्या वर्तनात आणण्याचा प्रयत्न मी कसोशीने केला पाहिजे.
भक्तीची अंतीम अवस्था म्हणजे भक्त गुण-वर्तनाने संपूर्ण भगवंतमय होणे.
अशी भक्ती घडण्यासाठी काय प्रयत्न करावे या बद्दल उपयुक्त माहिती या ऑडिओमध्ये ऐका.
विजय रा. जोशी
गीता अध्याय १2, भाग 2 , ध्वनी फीत
No comments:
Post a Comment