गीता अध्याय १2, भाग 1 , ध्वनी फीत
गंगेचा ओघ सर्वत्र पावन व पवित्र. परंतु हरिद्वार, काशी , प्रयाग, अशी स्थाने अधिक पवित्र आहेत. भगवत गीतेचीही तशीच स्थिती आहे. भगवतगीता आरंभापासून अंतापर्येत सर्वत्र पवित्र आहे. परंतु मध्यंतरी काही अध्याय तीर्थक्षेत्रे झाली आहेत. ज्या अध्याय बद्दल आज बोलायचे आहे तो अध्याय मोठा पावन, तीर्थ झाला आहे. प्रत्यक्ष भगवानच या अध्यायाला अमृतधार असे म्हणत आहेत. हा लहानसा वीस श्लोकांचा अध्याय अमृताप्रमाणे मधुर आहे. या अध्यायात भगवंताच्या मुखातून भक्तिरसाच्या महात्म्याचे तत्व गायिले गेले आहे.
खऱ्या साधकानं आणि भक्तानं परमेश्वराचं सगुण निर्गुण रूप समजावून घेतले पाहिजे. काही साधक तत्त्वज्ञानी परमेश्वराच्या सगुण स्वरूपाला मानणारे नसतात. मूर्तिपूजेला त्यांचा विरोध असतो. तो विरोध त्यांच्यापुरता ठीक आहे; पण निर्गुण भक्ती करणाऱ्यांनी सगुण भक्ती करणाऱ्यांना कमी मानण्याचे काहीच कारण नाही. निर्गुणोपासनेचाही अभिनिवेश त्याज्यच मानाव लागेल. भक्ती सगुण रूपातील असो वा निर्गुण, त्यातील भाव महत्त्वाचे आहेत.
सगुण आणि निर्गुण परस्पर पूरक आहेत. सगुण सुलभ आहे, निर्गुण कठीण आहे तर तसे पहिले तर उलटही खरे आहे - सगुण कठीण आहे व निर्गुण सोपे आहे. दोहोंनी एकच ध्येय प्राप्त होते. भगवंतांनी सुलभता, कठीणता तारतम्य लक्षात घेऊन ‘सगुण सोपे’ असे उत्तर दिले आहे. नाही तर योग, सन्यास, सगुण, निर्गुण एकरूपच आहेत. शेवटी भगवान सांगतात ‘अर्जुना ! तू सगुण ऐस कि निर्गुण ऐस, भक्त ऐस म्हणजे झाले, गोटा राहू नकोस. असे सांगून भगवंतांनी शेवटी भक्ताची लक्षणे दिली आहेत.
हि लक्षणे मधुर आहेत. त्याची माधुरी चाखावी. या लक्षणांचा वर्तन अनुभव घ्यावा. स्थितप्रज्ञाच्या लक्षणाप्रमाणे हि लक्षणे आपण रोज सेवन करावी, मनन करावी, त्यातील थोडी थोडी आपल्या आचरणात आणून पुष्टी प्राप्त करून घ्यावी. अशा तर्हेने जीवन हळूहळू परमेश्व्राकडे न्यावे.
सगुण आणि निर्गुण भक्ती बद्दल या ध्वनिफितीतील माहिती आपल्याला नक्कीच उपयुक्त वाटेल, तर जरूर ऐका .
विजय रा. जोशी
No comments:
Post a Comment