गीता अध्याय १४, भाग १, ध्वनी - फीत
एकाच प्रकृतीपासून नानाविध सृष्टी, विशेषतः सजीव सृष्टी होते याचे आणि विश्व,
विश्व-निर्माता आणि मी यात काय नाते/संबंध आहे? याचे या अध्यायात भगवंत निरूपण करतात. क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे वर्णन केल्यावर प्राणिमात्राला संसारात ओढणारी प्रकृती, तिच्या गुणांची उत्पत्ती, तिचे कार्य, तिचे धर्म, तिचे स्वभाव वगैरे सांगणारा व या त्रिगुणांच्या अतीत कसे व्हायचे हे समजाऊन सांगणारा हा अध्याय आहे.
श्लोक ५ ते १८ सत्व, रज, तम या तीन गुणांचे वर्णन आहे.
श्लोक १९. आत्म्याचे निर्गुणत्व सांगितले आहे.
श्लोक २१. अर्जुन त्रिगुणातीत (माणूस) कसा असतो असे विचारतो.
श्लोक २२ ते २७ त्रिगुणातीताचे वर्णन भगवान करतात.
जशी व्यक्ती आपल्या गुणाने (वर्तनाने) प्रकट होते तशी ही सर्व चराचर सृष्टी (प्रकृती) त्रिगुणांनी प्रकट होते. या संबंधी हा अध्याय आहे.
सत्व, रज, व तम हे तीन गुण सर्व पदार्थांच्या मूलद्रव्यात म्हणजे प्रकृतीत प्रारंभापासून असतात. या ती गुणांपैकी प्रत्येकाचा जोर आरंभी सारखाच असल्यामुळे प्रथमतः प्रकृती समावस्थेत असते. हि साम्यावस्था जगाच्या आरंभी होती. व जगाचा लय झाला म्हणजे पुनः येईल. साम्यावस्थेत काही हालचाल नाही, सर्वस्तब्ध असते. पण पुढे हे तीन गुण कमीजास्त होऊ लागले म्हणजे प्रवृत्यात्मक रजोगुणामुळे मूळ प्रकृतीपासून निरनिराळे पदार्थ उत्पन्न होऊन सृष्टीला आरंभ होतो.
मूळ प्रकृती एक असताना हे नानात्व कसे निर्माण होते याचा जो विचार त्याला विज्ञान म्हणतात. व यातच सर्व अधिभौतिक शास्त्रांचा समावेश होतो. माणूस देखील त्रिगुणात्मक आहे. प्रत्येक माणसामध्ये तिन्ही गुण असतात. पण त्यापैकी एक इतर दोहोंपेक्षा वरचढ असतो. या वरचढ गुणा प्रमाणे प्रत्येक माणूस हा सत्वगुणी, रजोगुणी अथवा तमोगुणी मानला जातो.
या सर्वांचे तपशीलवार वर्णन समजण्यासाठी हि ध्वनी फीत जरूर ऐका .
विजय रा. जोशी.
गीता अध्याय १४, भाग १, ध्वनी - फीत
No comments:
Post a Comment