गीता अध्याय १४, भाग २, ध्वनी - फीत
आपण सात्विक/राजस कि तामस ?
विषयांचा (wantedness) आपल्यावर जितका परिणाम होतो / न होतो, तसेच जितके अहम व आत्मा यांचे अनुसंधान (co-ordination) झालेले असते वा नसते , तितक्या प्रमाणात आपण सात्विक / राजस किंवा तामस ठरणार.अशा तऱ्हेने सतत जागृत राहून (आत्म्याचे अहमशी अनुसंधान ठेऊन) आपले संतुलन सतत ठेवणे ही साधना होय. मी म्हणजे देह ही वृत्ती नैसर्गिक आहे, साधनेने, प्रयत्नाने मी देह नाही तर आत्मा आहे ही जाणीव विकसित करावी लागते . त्यासाठी रोज स्वतः कडे अलिप्ततेने पहायला हवे , म्हणजेच आत्म-परीक्षण करायला हवे . स्वतःचे खरे रूप त्रयस्थ पणाने ओळखून घ्यायला हवे व प्रगतीसाठी प्रयत्न करायला हवे.
शास्त्रात संयम ही एक गोष्ट कसोटी म्हणून सांगितली आहे. मी बाह्य विषयांपासून दूर राहू शकतो की नाही? (इच्छ्यांपासून अलिप्त होऊ शकतो की नाही?) असा प्रश्न निर्माण होतो तेंव्हा प्रयत्न/आभ्यास करण्यासाठी माणूस कितीतरी गोष्टी सोडू लागतो. यास संयम असे म्हणतात. आपला स्वभाव आपण केलेल्या कृतीने बनत असतो. कृती बदलाने , शुद्ध हेतूच्या निग्रहाने आपण तो बदलू शकतो (तम--रज--सत्व).
स्व-व्यवस्थापन म्हणजेच गुण व्यवस्थापन. यासाठी संयम, निग्रहाने स्वतःत बदल घडवणे आवश्यक असते. १४ व्या अध्यायात भगवंत हे मार्गदर्शन करतात. या ध्वनिफितीत त्याचे वर्णन आहे.
विजय रा. जोशी.
गीता अध्याय १४, भाग २, ध्वनी - फीत
No comments:
Post a Comment