गीता अध्याय १३, भाग 2 , ध्वनी - फीत
ज्ञानाचे ज्ञान, ज्ञान म्हणजे काय, ज्ञान कुणाचे घ्यायचे/ज्ञानेय , ज्ञान घेण्याची प्रक्रिया, ज्ञानी लक्षणे, अज्ञानी लक्षणे, परमेशवराचे व्यक्त, अव्यक्त स्वरूप आणि समन्वय, क्षेत्र, क्षेत्रद्न्य, पुरुष, प्रकृती, इत्यादी. हवेत उड्डाण करण्यासाठी पक्षाला पंख आणि शेपटी दोन्ही हवे. तसे माणसाला अध्यात्मिक भरारी घेण्यासाठी ज्ञान / भक्तीचे पंख आणि कर्माची शेपटी लागते, सर्वांची आवश्यकता आहे, ध्येय एकच आहे.
क्षेत्र/शेत - शेतात जे पेरू ते उगवते तसेच आपण जे कर्म आयुष्यात करू , त्याप्रमाणे कर्मफळ संचित होते आणि यथाकाल प्रारब्ध रूपाने आपल्यास भोगावे लागते . (क्रियमाण, संचित आणि प्रारब्ध) आपले क्रियमाण कसे सुधारावे, याचे उत्कृष्ठ ज्ञान गीता देते.
नम्रता दंभ-शून्यत्व , अहिंसा ऋजुता क्षमा
पावित्र्य गुरु-शुश्रूषा , स्थिरता आत्मसंयम. १३/७
निरहंकारिता चित्ती , विषयांत विरक्तता
जन्म-मृत्यू-जरा-रोग - दुःख-दोष-विचारणा १३/८
निःसंग वृत्ती कर्मात, पुत्रा दींत अलिप्तता
प्रिय-अप्रिय लाभात , अखंड समचित्तता १३/९
माझ्या ठाई अनन्यत्वें , भक्ती निष्काम निश्चळ
एकांताविषयी प्रीती , जन-संगात नावड १३/१०
आत्म-ज्ञानी स्थिर श्रद्धा , तत्वतां ज्ञेय दर्शन
हें ज्ञान बोलिले सारे , अज्ञान विपरीत जे १३/११.
ज्ञान - म्हणजे बुद्धीला अमुक अमुक कळणे असे न सांगता मान व दंभ सुटणे , अहिंसा ,अनासक्ती, सम-बुद्धी इत्यादी वरील पाच श्लोकात सांगितलेले 18 गुण मनुष्याचा अंगात दृष्टीस पडू लागले म्हणजे त्यास ज्ञान म्हणावे अशी ज्ञानाची व्याख्या वरील श्लोकांत केली आहे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांची ओळख पटली पाहिजे. मी कोण आहे? आणि मी कशात रमायला पाहिजे? याचा विवेक एकदा झाला पाहिजे. मला काय पाहिजे? या पेक्षा मला काय हव असायला पाहिजे? याचा विवेक आयुष्यात एकदा जागरूक झाला, की निराळ काही मिळेल.
खोट्या अहंकारा पासून मुक्ती.
तू खरा कोण आहेस ते ओळखायला शीक. तू भोवती जे खोट्या अहंकाराच वलय निर्माण केल आहेस त्या पासून मुक्त कसा होशील ? कवीने म्हंटले आहे.
कुणी न येथे भला-चांगला, जो तो पथ चुकलेला, जग हे बंदिशाला.
ज्याची त्याला प्यार कोठडी कोठडीतले सखे सौंगडी
हातकडी की अवजड बेडी, प्रिय हो ज्याची त्याला प्रिय हो ज्याची त्याला जग हे बंदिशाला
जो तो अपुल्या जागी जखडे नजर न धावे तटापलीकडे उंबरातले किडेमकोडे, उंबरीं करिती लीला .
सत्याचे ज्ञान.
तू ज्याला चिकटून बसला आहेस, तो देह तुझा नव्हे , एवढ तू ज्ञान करून घे. तू देह फक्त एक साधन म्हणून घेतला आहेस. त्या साधनाचा तू अवश्य .वापर कर. त्या देहाच कल्याण करण्याची आवश्यकता आहेच. देह तुला चिकटायला आलेला नसून तू देहाला चिकटला आहेस. आणि ज्या क्षणी तुझे हे चिकटणे संपेल, त्यावेळी तो देह दुखी होणार नाही.
ही जाणीव तुम्हाला सूक्ष्म अभ्यासाने, ज्ञानाने होते. त्याने हातून चांगले कर्म घडते. आणि मग तुम्ही पराक्रमाकडे पोहोचता. हा १३ व्या अध्यायाचा सारांश आहे. तो लक्षात घेऊ आणि त्या प्रमाणे काम करू.
विजय रा. जोशी .
गीता अध्याय १३, भाग 2 , ध्वनी - फीत
No comments:
Post a Comment