मनाचे श्लोक (संत श्री रामदास स्वामी)
श्लोक ४१- ४५ सारांश .
थोडा शोध , प्रयत्न आवश्यक आहे . पण अति चंचलता (बहू हिंडता) , धरसोड उपयुक्त नाही. गरजेपुरते प्रयत्न आवश्यकच आहे. ध्येय कोणते, तिथे पोहोचण्याचा आपला मार्ग कोणता हे समजले पाहिजे. स्वतःला काहीकाळ तरी विसरण्याचा जेव्हा आपण सराव करतो, (ध्यान) त्यावेळीआपण खूप शांती अनुभवतो. ती शांती, आनंद वर्णनातीत असते. स्वतःला विसरण्यातला,अहंकार सोडण्याचा तो आनंद असतो.अशा अखण्ड एकतेने “रघूनायका आपुलेसे करावे” हे साध्य होते.
कर्मा चे फळ सर्वांनांच भोगावे लागतात, अगदी देवांची सुद्धा ह्यातून सुटका ज्ञालेली नाही. आपल्या कर्मावर सतत लक्ष ठेवा.
अनावश्यक बोलणे म्हणजे स्वतःची शक्ती वाया घालवणे आहे. म्हणून अनावश्यक बोलणे टाळणे हे परमार्थिकाने नाही तर प्रापंचिकांसाठी देखील आवश्यक आहे. समाधान मिळणे मुळात अवघड आहे. पण जेव्हा कधी मिळाले तर ते सुद्धा कुसंगतीने भंग पावते, नाहीसे होते. सत्संगतीच्या योगाने अनेक माणसं उद्धरून गेली, म्ह्णून संत्संगतीत राहावे.
हा सर्व बोध आपल्या बुद्धीला, विचारांना व्हावा असे समर्थ सांगत आहेत.
आपल्या रोजच्या वर्तनात थोडा बदल करून आपला सर्वांगीण विकास कसा साधता येईल यावरील समर्थांच्या उपदेशावरील हे विवरण जरूर ऐका . आणि आवडल्यास इतरांशी शेअर करा.
धन्यवाद.
विजय रा. जोशी.
No comments:
Post a Comment