मनाचे श्लोक (संत श्री रामदास स्वामी)
श्लोक ११ – १५ : सारांश
सर्वकाळ सुखी कोणी नाही. पूर्व संचिता प्रमाणे भोग येतात.
देहबुद्धी कमी करत रहाणे हा मुक्तीचा मार्ग आहे.
दुष्ट वासना असतील तर कितीही शूर, पराक्रमी व्यक्तींचाही नाश होतो. आणि
त्यातून जीवन व्यर्थ जाते .
जन्म होतो, जगात माणूस येतो. जीवनभर पूर्वकर्मानुसार सुख-दुःखे येतात, जातात.
आणि केव्हातरी हे जग सोडावे लागते.
हे जग मृत्युभूमी आहे. पण जगणारा माणूस “मृत्यू येणार” हे सत्य विसरतो.
लक्षात घेत नाही. मग माणसात “मी”, “अहं” आणि “अहंकार” निर्माण होतो.
हे सर्व लक्षात घेऊन जीवन कसे जगावे याचे दिशा दर्शन श्री समर्थ आपल्याला करीत आहेत.
श्लोकांचे अर्थ विवरण आणि संदेश आपण ध्वनिफितीमध्ये ऐकू शकाल.
विजय रा. जोशी.
No comments:
Post a Comment