Thursday, August 31, 2023

 

Statu

N. P. 03 / 11 १, मार्च,  महेश्वर दर्शन. 


Statu पासून निघालो ते गुजरात पार करून मध्यप्रदेशातील महेश्वर येथे आलो.

उशिरा सायंकाळी पोचलो.

येथील प्रसिद्ध उद्योजक पवार यांच्या लॉजमध्ये सामान ठेवले. जेवून झोपी गेलो.



त्या अगोदर वाटेत,  भजन, प्रार्थना, नर्मदाष्टकम, नाश्ता असा प्रवासाचा एक टप्पा झाल्यावर

वाटेत जेवायला एका मंदिराशी थांबलो होतो. तो एक गरीब आदिवासी वस्तीचा गाव होता.

अनेक शाळकरी मुली तेथे जमल्या आणि बाजूला बसून होत्या. कुमारिकांना काही दान करावे

अशी या यात्रेत पद्धत आहे, त्या मुलींना काही वस्तू, खाऊ, थोडे पैसे आम्ही बऱ्याच जणांनी दिले.

त्यांच्या चेहऱ्यावरील मरगळ जाऊन हासू फुलले आणि मग त्यांनी आमच्या विनंतीवरून

त्यांचा पारंपरिक नाच केला. लिंक : 


https://photos.google.com/photo/AF1QipM_IK41HEncZM9Axs8oHo9W9CWOgdJQvT4k1rgd



पुण्यश्लोक अहिल्याबाई यांचे शहर - महेश्वर 


हॉटेल पायल  पॅलेस, महेश्वर शहर बाहेर १५ किमी वर आहे.

सकाळी  आज ७ वाजता खाली आलो. चहा नाश्ता करून नर्मदा घाटावर आलो.

महेश्वर  नदी तटावरील घाट मोठे, भव्य आहेत. आत  स्वच्छ, मोठा,

रुंद नर्मदा प्रवाह आहे. पायऱ्या आहेत. पण पाण्यात उतरून

५ ते  ६ फूट पुढे गेले की पाणी खूप खोल आहे. तेथे सर्वांनी स्नान केले.

नर्मदाश्टक म्हंटले. प्रार्थना , अर्घ्य आदी गोष्टी झाल्या.

पुरुष आणि स्त्रियांसाठी घाट स्वतंत्र होते. 



त्यानंतर ९ ते १२ वेळ हा खरेदीसाठी दिला होता. येथील महेश्वरी साड्या,

ड्रेस मटेरीयल प्रसिध्द आहे. येथे मंडळीनी मनमुराद खरेदी केली.

मी ही ३ साड्या घेतल्या.  


नंतर जवळ असलेल्या जगातील सर्वात मोठ्या दत्त मंदिरास भेट दिली.

हे दत्तमंदिर खूप मोठ्या , काही एकर प्लॉट वर आहे. मूर्ती भव्य आणी अती सुंदर आहे.

दत्त मंदिर परिसरात काही पायी प्रदक्षिणा करणारे यात्री भेटले. 

अशी चार मंदिरे भारतात बांधण्याचा संस्थेचा मूळ संकल्प  होता,

त्यातील तीन बांधून पूर्ण झाली. उत्तराखंड मधील मंदिर अजून व्हायचे आहे. 

नंतर. हॉटेलवर येऊन भोजन केले. 




दुपारी जेवण, आराम झाल्यावर पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या राजधानी

असलेल्या किल्ला, मुझियम, मंदिरे, स्मारक आदी गोष्टी पाहिल्या.


काशी विश्वनाथ मंदिर, अत्यंत प्राचीन मंदिर आहे.

मार्कंडेय ऋषींना फक्त १६ वर्षे आयुष्य होते. शिव कृपेने ते अमर झाले,

ते हे शिव मंदिर. ऋषींची अधिक माहिती लिंक:

https://www.bhaskar.com/magazine/aha-zindagi/news/maharishi-markandeya-was-immortalized-by-shivkripa-was-only-16-years-old-128319162.html


येथील नंदी खूप वैशिष्ठ्य पूर्ण आहे. समोर नर्मदेचे विशाल पात्र आहे.

इथे दर्शन घेतले, प्रभूने ग्रुप फोटो काढले.

नंतर शेजारील सहस्राअर्जुन  मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

हा येथील राज्l . याने अती बलाढ्य अशा रावणाचा   पराभव केला.

महिष्मतीi हे महेश्वर चे पूर्वीचे नाव.

या पराक्रमी राजाने या शिवलिंगा  मधे देह सोडून जातांना आपले तेज

समर्पित केले असे सांगतात. 


(रामायण में सहस्त्रबाहु अर्जुन का कई बार उल्लेख होता है।

तुलसीदास जी ने रावण की महिमा घटाने के लिये दो बार उनका उल्लेख किया है।

रावण की सभा में हनूमान और अंगद जब दूत बन कर जाते हैं,

तो रावण का उपहास करने के लिये यह उल्लेख करना नहीं भूलते

कि उसे सहस्त्रार्जुन ने बांध कर अपने किले के कोने में कैद कर लिया था

और फिर पुलस्त्य ऋषि के आग्रह पर छोड़ा था। एक बार परशुराम जनक की सभा में

कहते हैं कि उन्होने सहस्त्रार्जुन का वध किया था,

और वे यहां भी उनका नाश करने से चूकेंगे नहीं, अगर उन्हें यह नहीं बताया गया कि

पिनाक किसने तोड़ा है। कुल मिला कर रावण के संदर्भ में और परशुराम के संदर्भ में

सहस्त्रबाहु अर्जुन का बार बार उल्लेख मिलता है। \

हैहय सम्राट कार्तवीर्य अर्जुन (सहस्त्रार्जुन) के बारे में

अनेक प्राचीन महाभारतकालीन या उससे पहले के काल को दर्शाते हुये उपन्यासों में

बार बार पढ़ा था, वह माहेश्वर का था )


परिसर विडिओ लिंक. 

https://photos.app.goo.gl/RFSdTuPTNy7GYt8t9


अहिल्याबाई होळकरांनी  महेश्वरला आपली राजधानी केली होती. हिंदू धर्म स्थळांसाठी

त्यांनी भारतभर प्रचंड धन खर्चून जीर्णोद्धार केला. पण स्वतःचे नाव कुठे लावले नाही.

या किल्यात त्यांनी वापरलेल्या गोष्टी शस्त्रे, पूजा उपकरणे, शिवलिंग असे अत्यंत

अमूल्य आणि दुर्मिळ अशा गोष्टी ठेवल्या आहेत. नगर वासियांनी त्यांचे

जे पुतळा रूपाने स्मारक केले तेही आहे.



अहिल्याबाई, भारतातील सर्वतीर्थ क्षेत्रांचा जीर्णोद्धार, नाव कोठेही लावले नाही.

नगर वासियांनी पुतळा, घाटावर उभारला होता.

पण काही विशेष कारण नसतांना देखील . तीन वेळा पडला.

बहुधा निसर्गाला ती जागा मान्य नसावी ,

त्यांच्या राजवाड्याजवळ, पूजा घराजवळ नंतर

गावकऱ्यांनी तो किल्यात वर स्थापन केला. आणि मग तो स्थिर राहिला,

त्यावर नेहमी एक खार असते. असे प्रभू जी सांगत होते.

(जशी दोन कबुतरे नेहमी अमरनाथ क्षेत्री असतात.)

Link घाट परिसर 

https://photos.google.com/photo/AF1QipPiINCtJX4DD7ngcv1_2NU1qk_CP4xuCZdpazLp


तिथून घाटावर उतरलो. येथे अनेक मंदिरे आणि सुंदर दगडातील कोरीव  शिल्पे असलेली मूर्ती,

इमारती, मंदिरे, सभागृहे आहेत. घाटावरील सूर्यास्त खूप प्रेक्षणीय असतो.

या घाटावर अनेक चित्रपटांची शूटिंग झाली आहेत.

रोज येथे गंगेची सार्वजनिक आरती केली जाते. आम्ही येथे नर्मदा पूजन, दीपदान केले,

प्रार्थना केली आणि मग या आरतीत सहभागी झालो. प्रत्येकाच्या हाती आरतीसाठी साहित्य दिले

आणि छान सामुदायिक आरतीचा आनंद घेतला.

आपण रुपये ३६५ दिले तर आपल्या नावे वर्षभर आरतीची वात पेटविली जाते.

अनेक जणांनी या साठी धन दिले. मीही दिले. नंतर रात्रीच्या विश्रांतीसाठी हॉटेलवर आलो.




N.P. 3 /11                                                                           पुढे ...


 

                                                                         

N . P. 4/11


२ मार्च  2023


नर्मदेचे नाभिस्थान. केंद्र स्थान.

माहेश्वर येथून सकाळी सहाला नेहमी प्रमाणे नेमावर साठी निघालो.

सुमारे १ ला हॉटेलवर पोहोचलो.

भोजनानंतर नर्मदे मय्याच्या  नाभिस्थान ठिकाणी

(केंद्र बिंदू, फोटोत तिथे लाल ध्वज लावलेला दिसेल.) पोचलो.

दुपारचा चारचा साधारण वेळ होता.

तेथे स्नान करणे हे यात्रेकरूंच्या साठी

खूप महत्वाचे आहे. स्नान पूजा, दीपदान,

कुमारी सन्मान हे सर्व केले. 



घाटावर सिध्देश्वर शिव मंदिर अतिशय प्राचीन आहे.

येथून वरून नर्मदा पात्रात मधोमध असलेले नाभी स्थान

चांगले दिसते.

तेथे एक लाल रंगाचा ध्वज लावला आहे.

गर्दी फार नव्हती. दर्शन चांगले झाले.  

या मंदिर परिसरात चहा पाणी झाले. काही निवांत वेळ मिळाला. 

मंदिरा समोर बाकावर एक वृद्ध व्यक्ती बसली होती.

त्याला लोक पैसे देत होते.

ते सर्व पैसे ती व्यक्ती लगेचच गरजवंतांना वाटीत होते.

त्यांचे वास्तव्य तिथेच दीर्घ काळ असावे.

कोणी जवळ बसल्यावर ते या मंदिराबद्दल

त्यांना असलेली माहिती सांगत होते.

आमच्यातील काही लोकांनी, त्यांना काही  प्रश्न व सल्ले विचारले.

मंदिराकडे पहात, हात हातात घेऊन

ते त्या त्या व्यक्तीची काही वैशिष्ट्ये

आणि त्यांच्या समोर सध्या असलेल्या समस्या सांगून

काही व्रत उपाय सांगत होते.


ऐकणाऱ्याला ते बोलणे प्रत्ययकारी वाटले.

अनेकांना त्यांच्याशी बोलावे वाटले, पण फार वेळ उपलब्ध

नव्हता.  



शेजारी chinmyaanand मठ आहे.

तेथे नेहमी असलेले प्रमुख हे सन्यासी, व्रतस्थ , ज्ञानी आहेत.

पण ते परिक्रमेत असल्याने भेट झाली नाही.

रामदास स्वामी सारखे दिसणारे जोशी महाराज

तेथे पूर्वी असायचे.

त्यांचे आता देहान्तर झाले आहे. फोटो पाहिला. 

मठात थोडे ध्यान, भजने, गीते (सौ परांजपे) झाली.

तेथील कार्यास मदत म्हणून लोकांनी पेटीत पैसे टाकले.

मीही दिले.

या आश्रमात खरे व्रतस्थ , मोक्षार्थी थोर साधकांची वस्ती असावी,

वातावरण प्रसन्न होते.

मठा पुढील भागात  एक अतिशय छान, देखणी

कामधेनू वाटावी, अशी गाय होती. 

पायी चालणाऱ्या यात्रेकरुंना येथे तीन दिवस

निवास आणि भोजन देण्यात येते. निःशुल्क. 

परत हॉटेल वर आलो (संपदा गार्डन, खाटेगाव). 

जेवून लवकर झोपलो. उद्या सकाळी ५ ला निघायचे,

जबलपूर हे पुढील स्थान आहे.



N. P. 4/11 पुढे


N. P. 5 / 11             ३ मार्च


सकाळी पाचला रूममधून खाली आलो.

नेहमीपेक्षा लवकर निघालो.

वाटेत नाश्ता, जेवण झाले.  प्रवास खूप लांबचा होता. 

३ वाजायच्या सुमारास  बेडा घाट जवळील नर्मदा माई जवळ आलो.

धुवा धार धबधबा, ६४ योगिणी मंदिर, आणि भेडा घाट नाव सैर

आदी पहाणे येथे झाले. 





धुवाधार छोटा धबधबा :  तेथे नर्मदा पूजन,

दीपदान ओटी भरणे वगैर केले.

बस पासून दूर चालत जावे लागते.


Link धुवाधार 


https://photos.google.com/photo/AF1QipNb3xr92hY1y-1cQK23G5WIO49idv7HqOU7zCVW


दुपारची वेळ, बऱ्यापैकी गरम होते.

नंतर तेथून चालत चौसष्ठ योगिनी

मंदिराला गेलो. येथे डोंगरावर सुमारे ३०० पायऱ्या

चढून जावे लागते.

मधोमध मंदिर असून मंदिराच्या चार बाजूला

६४ कलांच्या चौसष्ठ देवी मूर्ती आहेत.

पण या सर्व मोड तोड झालेल्या आहेत.

भंग झालेल्या आहेत.

नीट असते तर ते एक उत्कृष्ठ शिल्प कलेचे

वैशिष्ठ्य-पूर्ण ठिकाण झालं असते.

येथून खालच्या बाजूला नर्मदा पात्राचा

छान व्ह्यू मिळतो. 


येथून पुढे भेडा घाट येथे नौका विहारा साठी गेलो.

हल्ली वरून घाटावर उतरण्यासाठी एक लिफ्ट केलीआहे.

प्रत्येकाने आपापले तिकीट घेतले.

भेडा घाट नौका विहार विशेष आहे.

येथे नर्मदेचे पात्र दोन्ही बाजूस असलेल्या

उंच काठांनी बंदिस्त संगमरवरी

दगडांच्या मध्ये वहाते.

या बोटीच्या फेरीत आपल्याला फिरविणारे

नावाडी माहिती देतात पण ती विशिष्ठ पद्धतीत.


त्यांची ही  script वर्षानुवर्षे बदलत नाही,

७-८ वर्षांपूर्वी केलेल्या बोट राईडचे सर्व जोक्स

आणि शेर शायरी हा आमचा नावाडी आजही

त्या राईडचे वैशिष्ठय सांगतांना करीत होता.

त्यामुळे यात्रेकरूंची करमणूक होते, लोक खुश होतात

आणि नावाडी चांगली टीप मिळवतात. 

सर्व संपेपर्येत सायंकाळ झाली. निवासासाठी जबलपूर, सत्य रक्षा हॉटेल वर आलो. 




N. P. 5 /11.                                                                        पुढे …
























 N. P. 6  / 11.     ४ मार्च सकाळ 



जबलपूर गौरी घाट. 



नदी पात्र रुंद आहे. घाट बांधीव आहेत. विशेष कोणी घाटावर नव्हते. सकाळचा रम्य प्रहर होता. नुकताच सूर्योदय झाला होता. 


नर्मदाष्टक आणि आरती लिंक. 

https://photos.google.com/photo/AF1QipPdq7dQJOH6-nGeJ7ENhByKn888ai0P204lzV34


तिथे विधिवत नर्मदा पूजन, आरती, दीपदान वगैरे कार्यक्रम झाले. आरती,नर्मदा अष्टक म्हंटले.  नंतर पूर्ण दिवस प्रवास करून सायंकाळी अमर कंटक येथे आलो. 


साध्वी भेट.


सकाळी गौरीघाट जबलपूर येथे आरती, पूजा वगैरे सर्व झाल्यावर दिवसभर प्रवास होता. सायंकाळी अमरकंटक येथे आलो. तेथे कपिल धारा या ठिकाणी नर्मदा नदी अत्यंत छोट्या प्रवाह धारा मध्ये वाहत आहे. येथे  कपिलमुनी यांची समाधी व अन्य समाधी आहेत. तेथे दर्शन झाले. काही मंडळी खाली उतरून जाऊन दुग्ध धारा प्रवाह पाहून आले. मी पाय दुखत असल्याने तिथे जाणे टाळले. 



शेजारीच श्री श्री नर्मदा स्वरूप मिरामाई यांचा आश्रम आहे. या एकांत अशा ठिकाणी गेली अनेक वर्षे त्या रहातात. पायी नर्मदा परिक्रमा करणाऱ्या यात्रेकरूंना येथे अन्न दिले जाते. प्रभू ट्रॅव्हल्स नेहमी आपल्या यांत्रकरुंना माईंचे दर्शन आणि भेट घडवून आणतात. मीरा माई, ज्या सिद्धमाई म्हणून सुद्धा ओळखल्या जातात, त्या सुमारे ११० वर्षे वयाच्या आहेत असे समजले. 

माईंना प्राप्त असलेल्या सिद्धीचे अनुभव जे पूर्वी श्री देसाई किंवा त्यांचे बरोबर असलेल्या काही मंडळींना आले, त्याची माहिती त्यांनी बसमध्ये दिली. होती. 


अलीकडे साध्वी वयोमानाने कुठे जात नाहीत. पडूनच असतात. त्या थकलेल्या दिसत असल्या , तरी त्यांचे बोलणे स्पष्ट आणि धारदार होते. 

आम्ही गेलो तेव्हा बहुधा त्या परिसरातले काही स्त्री पुरुष त्यांना भेटायला आले होते. 

आम्ही सर्व  त्यांच्या साठी तिथे बसून होतो. असलेल्या मंडळींशी त्यांचे जे बोलणे झाले, त्यावरून असे लक्षात आले कि, परिसरातील  लोकसेवा उपक्रमात आणि तेथील कामात माईंचे  पूर्ण  लक्ष होते. त्या बद्दल बारीक सारीक माहिती लोकांकडून त्या जाणून घेत होत्या. आणि पुढे काय करावे, कसे करावे, या बद्दल अत्यंत तपशीलवार सूचना देत होत्या. माईंना स्वतःचा संसार नव्हता पण समाज संसार व्यवस्थित चालावा यासाठ त्या त्यांच्या वृद्ध, जर्जर अवस्थेत सुद्धा काळजी घेत होत्या. तळमळत होत्या, 

त्यांची ती खोली म्हणजे प्रचंड पसारा होता. मधेच एक कुत्रा येऊन सर्वत्र फिरून आणि थोडा वेळ माईंच्या जवळ बसून गेला. सर्व सामान अस्ताव्यस्त होते त्यातच प्रवेश दरवाज्या समोर आपल्या हांतरूणावर माई पडल्या होत्या. 


प्रभंजनने त्यांनाआमच्या येण्याचा  प्राथमिक उदिष्ट सांगण्यासाठी तोंड उघडले, आणि त्या कडाडल्या , “क्या आकेले आये  हो?  देवी की पूजा नही करोगे ? कौन साथ आया है”?


प्रभंजनने आपली बीबी बरोबर असल्याचे सांगितले. त्यांनी जवळ बोलावून फटकन त्याच्या तोंडावर एक चापटी / थप्पड मारली. नंतर त्या खोलीत  बाजूला असलेल्या देवीची पूजा (बहुधा नर्मदा देवीची तसवीर) करण्यास सांगितले.  माझा रूम  पार्टनर शेखर पुढे आला. त्याने देवीची शास्त्रोक्त पण थोडक्यात पूजा केली. 


कर्मकांडापेक्षा मनाचे भाव, मनाची शुद्धी हे सर्व महत्वाचे असे आहे. असे सर्व त्या सांगत असताना, आमच्या पैकी एकेक जणांनी त्यांच्या पाय पडून शेजारील तबकात काही दान टाकले, त्या सांगत होत्या मला तुमच्या पैशाचे नाही तर तुमच्या मनातील भावाचे, भक्तीचे महत्व आहे. शेखरची आई सुमारे १० - १२ वर्षांपूर्वी प्रभू ट्रॅव्हल्स मधून नर्मदा परिक्रमा करण्यास आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या कुटुंबाचा संकट काळ सुरु होता. शेखरच्या कल्याणाविषयी बहुधा त्यांनी येथे प्रार्थना केली होती. हे सर्व शेखरनेच मला सांगितले. पण विशेष गोष्ट अशी की नेमकी  त्याच्या हातून साध्वीनी देवीची विधिवत पूजा करून घेतली. आणि ‘ठीक रास्तेपर चाल रहे हो’ - असा त्यास संदेशही दिला.


निस्वार्थ, साधनेने होणाऱ्या अंतर्ज्ञानाचा हा अविष्कार असावा असे मला वाटले. 

हे सुरु असतांना आमच्यातील एक यात्री आणि सुरेल गायिका परांजपे ताई यांनी एक छान हिंदी भजन म्हंटले. ते एकाग्रतेने ऐकत असताना साध्वीच्या डोळ्यात थोडे पाणी आले. त्या क्षणभर भाव विभोर झाल्या. त्यांना बरं  वाटले. 


“तबकात किती पैसे टाकले” ? त्यांनी परांजपे ताईंना विचारले. 

“पाहीले नाहीत. माझ्या हातात आले ते टाकले” परांजपे ताईंच्या उत्तराने माताजींना  समाधान वाटल्याचे दिसले. नंतर कळले की त्यांनी समर्पित केलेली जी रक्कम होती ती त्यांच्या पर्स मध्ये सायंकाळी परत आली होती.  


अधिक काही गोष्टी झाल्यावर बाहेर  असलेल्या इतरांना आत येण्यासाठी आम्ही सर्व एकेक बाहेर आलो. एक वेगळाच अनुभव मिळाला. वाटला . 

नंतर बसने hotel, maikal , अमरकंटक येथे रात्रीच्या विश्रांतीसाठी आलो.   



N. P. 6  / 11

                                                                          पुढे ...


 N. P. 7 /11                   ५ मार्च 



अमरकंटक येथील लॉज छान होता. आज माझा उजवा पाय आणि गुडघा खूप दुखत होता. चालायला त्रास होत होता. पण लवकर उठायचे नव्हते. सकाळी ६ ला उठलो.रात्री १० ते सकाळी ६ विश्रांती झाली. केशरी मलम, १९ नंबर mixture, molish तेल आणि विश्रांती याने बरे वाटले. अर्थात यास अखंड प्रार्थनेचा आधार आणि भगवंताचे नामस्मरण याची साथ होती.   




सकाळी ७ ३० ला नाश्ता, नंतर आरामात अंघोळ,असे उरकून थोडे बाहेर पडलो. लॉज शेजारी कल्याण आश्रम आहे. आश्रम उत्कृष्ठ वाटला.


आत एक छान मंदिर आणि परिक्रमावासी, साधक यांचेसाठी निवास, भोजन निःशुल्क सोय आहे. अनेक सांस्कृतिक सामाजिक कामे येथे चालतात असे कळले. येथील मंदिराच्या बाहेर एक साधक हटयोग करत एका विशिष्ठ पद्धतीने निश्चल उभा होता.


हा आश्रम फारच स्वच्छ, व्यवस्थित आणि उत्कृष्ठ रीतीने ठेवलेला दिसला. असे काही अन्य आश्रम, संस्था येथे आहेत. 


अमरकंटक हे एक हिलस्टेशन देखील आहे. दुपारी जेवण झाल्यावर जीप मधून माईचा  बगीचा येथे आलो. हे नर्मदेचे उगमस्थान.


भडोचला दक्षिण तटावरून नर्मदेच्या उत्तर तटावर आलो होतो. येथे परत उगमस्थला पल्याड जाऊन उत्तरेकडून दक्षिण तटाकडे  आलो. नर्मदेचे मंदिर 




लिंक -  नर्मदा तट उत्तरेकडून परत दक्षिण तीरावर. 


 https://photos.google.com/photo/AF1QipNduSFnEv1CyL5ymDTT_bn_vvtquiAwid4C1gbW


आणि पुढे एक नदी उद्गमाचे कुंड आहे.

उगम झाल्यावर नर्मदा गुप्त होते आणि थोडे अंतरावर परत उगम पावते आणि मग सलग प्रवाहित होते. 

 

तिथेच थोड्या अंतरावर शोन आणि भद्र अशा दोन नद्या उगम पावतात. भद्राचा संगम शोंन नदिशी काही फुटांवर तेथेच होतो. आणि पुढे शोंण  नदी बिहारला गंगेस मिळते. 




वाटेत श्रीयंत्र मंदिर, जे अजून पूर्ण झाले नाही, ते बघितले. या मंदिराचे काम पूर्ण झाले नाही कारण वर्षातून फक्त १५ दिवसच येथे काम करायचे अशी प्रथा आहे. 


(अमरकंटक में बन रहे अष्टधातु के श्रीयंत्र मंदिर में सिर्फ गुरु पुष्य नक्षत्र में ही निर्माण कार्य होता है। 1991 में मंदिर बनना शुरू हुआ था। इसके सात-आठ साल के भीतर बन जाने की उम्मीद है। ज्योतिष के मुताबिक गुरु पुष्य नक्षत्र निर्माण के लिए सबसे शुभ होता है। इसलिए इसे इसी नक्षत्र में बनाया जा रहा है।



शिल्पकार दक्षिण भारत और पश्चिम बंगाल के हैं। इसे फिर से शुरू करने के लिए गुरु पुष्य नक्षत्र का इंतजार किया जाता है। मंदिर का निर्माण महामंडलेश्वर अटल पीठाधीश्वर स्वामी सुखदेवानंद करा रहे हैं। इसकी सबसे बड़ी खासियत है कि इसके केंद्र में मां त्रिपुर सुंदरी की प्रतिमा स्थापित की जा रही है।)


पुढे येथे  एक नर्मदा मंदिर आहे जेथून नर्मदा जल प्रवाह मार्गस्थ होतो. दक्षिण आणि उत्तर तट यात्रेकरूंना आपापल्या भागात रहायची दक्षता इथे घ्यावी लागते. दक्षिण तट आणि उत्तर तट यात्रेकरूंसाठी स्वतंत्र प्रवेश द्वारे आहेत . मूळ उगमस्थानी गुप्त झालेली नर्मदामय्या येथे या ठिकाणी असलेल्या जलकुंडात प्रकट होते.   या ठिकाणी जेथून जमिनीखालून हा प्रवाह मार्गस्थ होतो त्याचे मार्किंग नीट पाहून परिक्रमा करणाऱ्या यात्रेकरुंना आपापला तट सांभाळायची काळजी घ्यावी लागते. प्रभू दाम्पत्य यासाठी खूप काळजी घेत होते. 


तेथे सर्वांनी प्रार्थना केली, नर्मदाष्टक म्हंटले.

कपाळावर गंध रेखून घेतले, अनिकेतने त्याचे फोटो काढले, वगैरे. 


इथून पुढे अतिशय छोट्या प्रवाहात नर्मदा मार्गस्थ होते. पण काही ठिकाणी बंधारे बांधून काही जलाशय निर्माण केले आहेत. एका अशा जलाशयात  भव्य शंकराची पुतळा रुपी मूर्ती उभी केली आहे


येथून पुढील प्रवास काही वेळ घनदाट जंगलातून सुरू होतो. हा नक्षलवादी भाग आहे . येथे क्वचित जंगली प्राण्यांचे दर्शन घडू शकते. दंतेवाडा येथील ७० पोलिसांची हत्या याच जंगल भागात झाली. हा छतीसगड मधील प्रदेश आहे. 

 

नंतर हॉटेल अनुराग, दिंडोरी येथे आलो.  सामान वगैरे मिळायला थोडा वेळ लागला. आम्ही दुसऱ्या मजल्यावर होतो.खूप थकायला झालं होत. जेवलो नाही.


 N. P. 7 /12                                                                     पुढे…