योग ग्रंथ अभ्यास : विषयोग - 10 . Path 27 , 25 September 2024.
सारांश :
मेंदूतील निओकॉर्टेक्सला व्हेटोची सत्ता आहे असे मानले तर सर्टिफिकेशनचा अधिकार त्यालाच असलापाहिजे. जर ती सत्ता लिम्बिक बळकावू पहात असेल तर ते सर्व दृष्टीने अयोग्य आहे. म्ह्णून त्यास ताळ्यावरआणून योग्यमार्गी लावण्याचे, सतस्पर्श काम निओकॉर्टेक्सचे आहे, वस्तुतः त्या पलीकडे असलेल्या मनशक्तीचे आहे.
निओकॉर्टेक्सचा सल्ला मानून ध्यानाला बसण्याची सवय करा म्हणायचे तर ती कशी करायची हा प्रश्न आहे.ध्यानाला बसले तर मन शांत न होता, सैरा वैरा फिरण्याचा जोर करते. मग काय करावे? कसे करावे. ??म्हणून येथे अनुभवाचा प्रांत सुरु होतो. यावर कोणाचे मार्गदर्शन घ्यायचे म्हंटले तर या प्रांतात कोणी उठून काहीही बोलावे, असा प्रकार आसल्याने त्यातून धोके निर्माण होऊ शकतात.
म्हणून समोरच्या माणसाचे म्हणणे पत्करतांना विज्ञानाच्या (तर्कशुध्दतेच्या) ज्ञात अशा मर्यादेपर्येत तरी विषयव्यवस्थित तर्कशुद्ध मांडला आहे की नाही, हे पाहिले पाहिजे. तसा तो मांडला गेला असेल तर , जास्तीत जास्त त्यावर विश्वास ठेवून त्या पद्धतीने प्रयोग केले पाहिजेत. त्यात कोठे काही फरक पडत आले तर त्यात योग्यदुरुस्त्या केल्या पाहिजेत. काही फरक “व्यक्ती तेवढ्या प्रकृती” या नुसारही पडू शकतात हेही लक्षात घेतले पाहिजे .
स्वामीजी स्पष्टपणे लिहितात की - या सर्व मर्यादा लक्षात घेऊन मी माझे विवेचन केले पाहिजे आणि त्या मर्यादेतच तुम्ही ते वाचले/ऐकले पाहिजे. आणि सर्वसाधारणपणे ते विवेचन तर्कशुद्ध वाट असेल तर त्याचा तुम्ही अनुभव घेतला पाहिजे.
अधिक माहिती साठी पाठ ऐकावा.
विजय. रा. जोशी.
.