'पसायदान' हे जीवन घडवणारे मागणे आहे.
हा दीप आपल्या हृदयमंदिरामध्ये सतत तेवत राहिला पाहिजे.
या दृष्टीने काही महत्वाच्या संकल्पनावर आज या ओवीच्या निमित्ताने चिंतन करू.
स्वतःची सर्व संकटे विसरून सर्व भूतमात्रांच्या कल्याणाचे हे मागणे माउलींच्या अति-विशाल अशा अंतःकरणातून
उमलले आहे.
आतां विश्वात्मकें देवें। येणें वाग्यज्ञें तोषावें। तोषोनि मज द्यावें। पसायदान हें ॥ १
एक महान ज्ञानयज्ञातून गीतेचे तत्वज्ञान सर्व सामान्यांच्या भाषेत आणण्याचे कार्य संपन्न झाले, गुरूंची आज्ञा पालन
झाली. म्हणून आता विश्वेशवराकडे, निवृत्तिनाथांकडे आणि श्रोत्यांकडे ज्ञानदेव मागणी करीत आहेत.
प्रसन्न होऊन माझी प्रार्थना ऐका आणि मला प्रसाद द्या. त्यांच्या प्रसादाचे स्वरूप काय आहे,
९००० + ज्ञानेश्वरीतील ओव्यांच्या अर्थाचे सार सांगणारे हे ९ ओव्यांचे पसायदान आहे. म्हणून हा साररुपी संदेश,
प्रत्येकाने आपल्या हृदयात धारण करण्या सारखा आहे.
जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो । भूतां परस्परें जडो। मैत्र जीवांचें ॥ २ ॥
- खळ / दुष्ट लोकांबद्दल अधिक काळजी, चिंता म्हणून त्यांच्यातील वाईटपणा, जावो अशी प्रार्थना.
- माणूस सत्कर्माने सुधारू शकतो, असा पूर्ण विश्वास.
पण तेथेच न थांबता सुधारणा झाल्यावर लोकांत सत्कर्माची आवड वाढो. सर्व जीव एकत्र येऊन त्यांचे एकमेकात
स्नेहसंबंध , मैत्र होवो. आणि सर्वांचे कल्याण होवो,
- खळ ,समाजात विविध रूपाने, मुखवटा धारण करून वावरतात, त्यामुळे चांगले काम करणाऱ्या माणसांना
त्रास होतो, या दुष्ट लोकांचा जन्म देखील वाया जातो.
- काही माणसे दुष्ट तर नसतात, पण ती फक्त स्व-केंद्रित वृत्तीने जगतात अशा लोकांना सुद्धा
सत्कर्म प्रेरणा मिळणे आवश्यक असते.
No comments:
Post a Comment