मनाचे श्लोक (संत श्री रामदास स्वामी)
पाठ श्लोक 181 ते 185 : ध्वनिफीत :
सारांश श्लोक १८१ - १८५.
सद्गुरू कसे आसावे, कसे नसावे, त्यांना कसे ओळखावे याचे वर्णन करणारे हे श्लोक आहेत. .
साधना म्हणजे काय? गुरु कोणाला म्हणावं ? साधक कोणाला म्हणावं? शिष्य कोण? कृपा म्हणजे काय,
अध्यात्मात साधकत्व म्हणजे काय ? ........ या बद्दल प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष चर्चा आहे.
ज्याच्या चेतनेतून मी-पण, अहंभाव हा अगदी पार निरसून गेला आहे , निराकरण झालं आहे, केवळ वैश्विक
चेतनाच तिथे स्पंदित आहे , अशा व्यक्तीला आपण गुरुपद प्राप्त झालय असं म्हणू शकतो.
जिथे मी-पण उरलं नाही, आणि तू-पण उरलं नाही त्या ठिकाणी व्यापार शक्य नाही, दुकानदारी शक्य नाही,
जाहिरातबाजी शक्य नाही. ती व्यक्ती जगत राहील स्वतःच जीवन , शांतपणे, संथपणे.. तो/ती गुरुत्व प्राप्त व्यक्ती.
ज्याच्या हृदयामध्ये साधकाची भूमिका परिपकव होते, त्या व्यक्तीला, त्या साधकाला, अशा आत्मानुभावी व्यक्तीशी
मिळवून देण्याची जबाबदारी जीवन उचलते.
सद्गुरुंचे मूल्यमापन करणे हि तशी अवघड गोष्ट . तरीही सद्गुरूंवर श्रद्धा ठेवण्यापूर्वी आपण आपल्या
पद्धतीने ते करणे आवश्यक आहे.
शिष्यामधे शरणागती अत्यंत आदराने हवी. तळमळीने हवी. मनापासून हवी. लीनतेने रामरुपात लपले,
विलीन झाले, एकरूप झाले असे भक्त हवे. जो भक्त आत्मरूप झाला तो भयातीत झाला. सद्गुरू यास
सहाय्यभूत होतात. .. सोप्या उदाहरणांनी, कथेच्या सहाय्याने आपण हे सर्व या ध्वनिफितीच्या माध्यमातून
समजून घेऊ या. . श्रीराम !
विजय रा. जोशी
No comments:
Post a Comment