मनाचे श्लोक (संत श्री रामदास स्वामी)
पाठ श्लोक 191 ते 195 : ध्वनिफीत :
सारांश श्लोक : १९१-१९५ .
स्वत:च्या ऐहिक सुखातच गुंतून पडलेल्या जीवाला आध्यात्माचा, परमात्म्याचा विचार करायला फुरसत मिळत
नाही. म्हणून ब्रह्मज्ञान अगदी कल्पान्त झाला तरी आकलन होणे शक्य नाही.
शरीर, मन आणि बुद्धी यापलीकडे न गेल्यास परमात्म्याचे स्वरूप कळणार नाही.
देहबुद्धी निरास म्हणजे अध्यात्म/समाधी तयारी.
जाणीव आणि नेणीव या मानवी स्थितीतल्या कल्पना आहे, त्या सर्वसाक्षी परमात्म्याला लागू नाहीत.
जन्म हा आपल्या जीवनाची सुरवात नाही आणि मृत्यू आपल्या जीवनाचा अंत नाही , एका अनंत प्रवाहाचा
एक छोटा भाग म्हणजे आपले जीवन.
देव हा आकाशासारखा असतो. आकाश म्हणजे काय? आकाशाची सुरुवात कुठून होते आणि शेवट कुठे होतो हे
जसे समजत नाही तसेच हा देवराणा कुठून येतो? कुठे जातो? हे ही कळत नाही.
देव म्हणजे काय ? देह सोडल्यावर जीव कोठे जातो ? मानवी मनाचे हे चिरंतन प्रश्न आहेत.
‘देहबुद्धी, मीपणा न ठेवता मनुजाने परमेश्वराच्या भक्तीत आपले आयुष्य व्यतीत करावे अन्यथा ब्रह्मज्ञान होणे नाही’
अशी जाग देण्याचे काम समर्थ या श्लोकात करत आहेत.
या सर्व विषयांची सोप्या तर्हेने मांडणी असलेले विवेचन जरूर एक, आपला अभिप्रायही जरूर नोंदवा.
धन्यवाद.
विजय रा. जोशी.
No comments:
Post a Comment