मनाचे श्लोक (संत श्री रामदास स्वामी)
पाठ श्लोक 121 ते 125 : ध्वनिफीत.
समर्थ भगवंत-लीला आणि त्याचे भगवंत भक्तांना आलेले अनेक अनुभव हे पौराणिक कथांच्या माध्यमातून
सांगत आहेत. आणि त्यातून खऱ्या भक्तांचा देवाला कसा अभिमान, प्रेम वाटते.
हे समर्थ आपल्या मनावत ठसवत आहेत….. डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत यातील जीव-विकास
आणि दशावतारातील श्री विष्णूचे अवतारक्रम यात बरेच साम्य आढळते.
सारांशात पाहता मत्स्य, कूर्म व वराह हे पहिले तीन अवतार माणूस व पशू यांच्यामधील समान अशा प्रवृत्ती
दाखवतात. नरसिंह, वामन व परशुराम अवतारात मानव समूहाच्या प्रवृत्ती आढळतात.
राम, कृष्ण व बुद्ध अवतारात माणसाच्या व्यक्तीगत उत्थानाचे नमूने दिसतात. कल्की अवतार कधी झालाच
तर तो त्याच पठडीतला होणार अशी अपेक्षा आहे. हे सर्व अवतार कालातीत आहेत.
देव भक्ताकडे कधीहि दुर्लक्ष करत नाही, त्याची निराशा होऊ देत नाही कारण सच्च्या भक्ताचा त्याला
नेहमी अभिमान असतो. हे समर्थ वारंवार सांगतात आणि त्यासाठी ते दाखले देखील देतात.
नरसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, कृष्ण, गौतम बुद्ध,आणि पुढे येणारा कल्की या अवतारांच्या कथांच्या
आधारे रामदास स्वामी सन्मार्गी स्थिर होण्यासाठी काय करावे त्याचे सर्व तपशीलवार वर्णन
श्लोकांच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवत आहेत.
मनाच्या उत्क्रांतीचे हे वर्णन आणि समर्थांचा उपदेश जरूर ऐका आणि आवडल्यास इतरांना ऐकायला सांगा.
विजय रा. जोशी.
No comments:
Post a Comment