गीता अध्याय ६, भाग २: ध्वनी फीत
ध्यानयोग, आत्मसंयम योग, चित्तवृत्ती निरोध. (संयमाने मन वळवा).
अध्याय ६, मुख्य विषय
कर्मयोगी होण्यासाठी काय प्रयत्न करावे, योगी हा समतेची मूर्ती असतो. (श्लोक १ - ९)
ध्यान साधना , योग साधना कशी करावी (१० - १९)
योगी वृत्तीची, वर्तनाची आवश्यकता व लाभ (२० - ३२)
अर्जुनाचे प्रश्न (३३, ३४, ३७, ३८, ३९).
भगवंताचा खुलासा आणि आश्वासन. (३५,३६, ४०,४१,४२).
यातील काही भाग आपण अगोदरच्या ध्वनिफिती मध्ये ऐकला. या पुढील भागांपैकी काही गोष्टी देत आहे.
बाकी सर्व तपशील ऑडिओ मध्ये ऐकावा.
ध्यान – समाधीची शांती.
सामान्यतः असे दिसते की जसजसा वेग वाढतो तसतशी शक्ती वाढते. परंतु चित्ताची स्थिती उलटी आहे. चित्त जेवढे वेग-रहित होत जाते तेवढे जास्त शक्तिशाली बनते. ध्यान – समाधी साधने मुळे अशी स्थिती प्राप्त होऊ शकते. पातंजली योग सूत्राच्या अष्टांग योग साधने नुसार साधना करून हि स्थिती प्राप्त करता येते.
ध्यान-योग साधेल का ?
विचार-शून्य स्थितीत स्थिर होणे साधेल का ? !
ही साधना अत्यंत कठीण आहे. परंतु असंभव नाही.
मनाचा संयम करणे हि अत्यंत कठीण गोष्ट आहे. - स्वामी विवेकानंद
आधीच माकड
यथेच्च दारू पाजली
त्याला विंचू चावला
त्याला भूतबाधा झाली
मानवी मनाची स्थिती अशा त्या माकडासारखी आहे.
भगवान: अवश्य मन दुःसाध्य, म्हणतोस तसेची ते,
परि अभ्यास-वैराग्ये त्याचा निग्रह होतसे. (६/३५)
संयमाविण हा योग, न साधे मानितो चि मी,
परि संयमवंतांस उपाये साध्य होतसे. (६/३६)
भगवान म्हणतात : चंचल मनाला संयमित करणे निःसंशय अत्यंत कठीण आहे. पण योग्य
अभ्यासाने आणि अनासक्तीद्वारा मनाला वश करणे शक्य आहे. ज्याचे मन उच्छ्रुंकल आहे त्याला
हा योग साधणे जरी कठीण असले तरी जो संयमित आहे आणि जो योग्य साधनांद्वारे प्रयत्न
करेल त्याला निश्चितच यशाची शाश्वती आहे असे मला वाटते.
जमत नाही म्हणून सोडू नका.
कैवल्य हा मानव योनीचा जन्मसिध्द हक्क आहे. (पतंजली सूत्र).
विजय रा. जोशी
No comments:
Post a Comment