गीता अध्याय 8 भाग 2: ध्वनी फीत
या भागात जे विषय पहायचे आहेत ते असे आहेत :
शेवटचा दिवस गोड कसा होईल.
बहुत सुकृताची जोडी, म्हणुनी विठ्ठलीं आवडी.
संस्कार कसे ठसतात.
शुभ संस्काराचा संचय.
ज्यावर आपली दृष्टी एकाग्र होते त्याचे गुण आपल्या पिंड पेशीत भरतात.
आपली नियती आपणच बनवत असतो
मरणाचे स्मरण असावे.
सत्कृत्य संकल्प कसोशीने पालन.
चांगली कामे करताना संघर्ष/संकटे (रात्रंदिन आम्हा युध्हाचा प्रसंग).
अखंड साधनेने परिवर्तन
ज्याचे जया ध्यान I तेचि होय त्याचे मन II १ II
म्हणउनी अवघें सारा I पांडुरंग दृढ धरा II २ II संत श्रेष्ठ तुकाराम.
माणसाला ज्या वस्तूचे ध्यान लागते त्या वस्तूचे रूप त्याच्या मनाला येते. म्हणून सर्व काही बाजूला सारावे
आणि मनाने घट्टपणे ईश्वराचे ध्यान करावे.
गतीचे गीत = जीवन.
ज = जग. ग = गमन.
जन्म आणि गमन यांच्या मध्ये आहे ते जीवन. जन्मक्षणी गती सुरु होते. गमन-क्षणी गती थांबते.
या दोन क्षणा मधील गतीचे गीत म्हणजे जीवन.
जीवनात जी गती अपरिहार्य आहे ती सद-हेतू साठी व्हावी जीवन सफल होईल. गमन-क्षण गोड होईल.
सतत हेतू शुद्ध ठेऊन आपण वागलो तर आपल्याला भक्तीचा नेमका अर्थ कळेल.
उत्तम मरण काळ.
अग्नी पेटलेला आहे – अंतकाळ पर्येंत कर्म सुरु आहे.
सूर्य प्रकाशात आहे. – बुद्धीची प्रभा शेवट पर्येंत झगझगीत आहे.
चंद्रकला वाढत आहे (शुक्ल पक्ष) – मरणकाळी पवित्र भावना विकास होत आहे.
आकाश (निरभ्र, सुंदर, उत्तरायणात असते.) – हृदय आकाशात आसक्तीचे ढग जरादेखील नाहीत.
शेवटच्या श्वासा पर्येंत सेवाकर्म होत आहे, सद्भावनेची पौर्णिमा प्रकाशात आहे,
हृद्य-आकाशात यत्किंचितही आसक्ती नाही, बुद्धी सतेज आहे.
अशा प्रकारे जर देहांतर होईल तो परमात्म्यात विलीन होतो.
सविस्तर वर्णन ध्वनिफितीत ऎका .
विजय रा. जोशी
गीता अध्याय 8 भाग 2: ध्वनी फीत
हरी ओम काका,खुप छान विवेचन.
ReplyDelete