योग ग्रंथ पाठ १६, अनुबंधचतुष्टय व षडलिंगे, ५ जून २०२४.
सारांश
कोणत्याही ग्रंथाचा अभ्यास करतांना तो मुख्यत्वें कोणासाठी आहे, त्यात पुस्तकाच्या वाचण्याने
काय लाभ होणार या प्रश्नांची उत्तरे प्रथमच समजणे माणसाला आवडते. म्हणून परमार्थशास्त्राच्या ग्रंथात या
विषयांचा संपूर्ण विचार पद्धत आहे. यालाच अनुबंध म्हणतात.(अनुबंध म्हणजे मन वेधून घेणारी बाब.).
अनुबंध - जे बांधून ठेवते ते, चतुष्टय - चार / चौकट
१. ग्रन्थ अभ्यासाचे अधिकारी कोण ?
२. विषय काय?
३. प्रयोजन काय ?
४. संबंध काय ? विषयाचे प्रमाण मांडतांना त्याचा विषयाशी संबंध असावा.
षड्लिंगे.
साधकांनी शास्त्रग्रंथ खाली दिलेल्या सहा गोष्टींकडे लक्ष ठेवून अभ्यासणे म्हणजे शास्त्रानुसार श्रवण होय.
शास्त्रग्रंथ सहा बाबींकडे चांगले लक्ष ठेवून ऐकावयाचा असतो,ज्यांना ग्रंथाची षड्लिंगे म्हणतात.
म्हणजे चांगल्या ग्रंथाच्या सहा खुणा,सहा विशेष. जे अभ्यास करतांना लक्षात घ्यायचे असतात.
ही षड्लिंगे अशी -
१ ) उपक्रम आणि *उपसंहारामधील मेळ (एकवाक्यता) -- वर्तुळ काढायला सुरुवात केल्यावर ते जेथून
सुरू होते तेथेच येऊन पेन्सील थांबते (असे झाले पाहिजे.). याचप्रमाणे ग्रंथाच्या सुरुवातीला
ग्रंथ ज्या उद्देशाने सांगितलेला असतो तो उद्देश अखेर संपूर्ण झाला का ते पाहणे म्हणजे
उपक्रम-उपसंहारांची एकवाक्यता. *(अखेरीस असलेला समारोपाचा मजकूर. तात्पर्यवजा सार).
2). अभ्यास - श्रवण वगैरे साधने; विवेक, वैराग्य वगैरे अंगी बाणवणे; अनुसंधान आणि नित्य
सदाचरण इ. सांभाळणे याला अभ्यास म्हणतात. फलप्राप्तीसाठी सांगितलेले कायिक, वाचिक
व मानसिक कर्म म्हणजे अभ्यास. ग्रंथाचे वाचन, त्यावर विचार व त्यानुसार आचरण साधना.
(उदा. नामसाधना, ध्यानसाधना इ.) हे परत परत करणे म्हणजे अभ्यास.
३) अपूर्वता - इतरत्र कोठेच न मिळणारे असे जे विशेष त्या ग्रंथातून मिळते त्याला अपूर्वता म्हणतात.
4) फल - ग्रंथाच्या अभ्यासाने जे प्राप्त होणार त्याला फल म्हणतात.
५) अर्थवाद - वाचकांना खेचून घेण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी जरूर त्याहून फुगवून सांगणं
अतिशयोक्ती करणे म्हणजे अर्थवाद होय.
६) उपपत्ती - सिद्धान्त सिद्ध करण्यासाठी ज्या उदाहरणांचा उपयोग केला जातो, त्याला उपपत्ती म्हणतात. .
साधकांनी शास्त्रग्रंथ वरील सहा गोष्टींकडे लक्ष ठेवून अभ्यासणे म्हणजे शास्त्रानुसार श्रवण होय.
पुण्यप्राप्तीच्या हेतूने, कुतुहल भाव कळण्यासाठी ऐकणे याला शास्त्रात श्रवण समजत नाहीत.
या संदर्भात योग ग्रंथांचा अभ्यास करण्याची शक्यता आणि त्याची उपयुक्तता यावर काही विचार उदाहरणांसह या विवेचनात आपल्याला ऐकायला मिळेल.
विजय रा. जोशी
This comment has been removed by the author.
ReplyDelete