योग ग्रंथ पाठ १५, तत्वज्ञानाचे सार – प्रार्थना, २९ मे २०२४.
सारांश :
माणसाला काही उच्च ध्येय साध्य करायचे असेल तर मनाला शांत, निःश्चल. एकाग्र करावे लागते.
अशा प्रयत्नांना ‘साधना’ असे म्हणतात. पूजा, मंत्र, जप, प्रार्थना, ध्यान अशा मार्गाने साधना होऊ शकते.
या पैकी ‘प्रार्थना’ या साधनाचा संक्षिप्त विचार आपण करणार आहोत. प्रार्थना फक्त करायची
नसते तर ती जगायचीही असते.चांगल्या विचारांच, त्यातील अर्थाचं चिंतन करणे व तसे वर्तन स्वतःच्या आयुष्यात
प्रत्यक्षात जोडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे प्रार्थना जगणे. ही वैयक्तिक प्रार्थना प्रक्रिया. शांत स्थितीत, शुध्द
अंतःकरणाने, एकत्रितपणे सर्वांच्या कल्याणासाठी केलेले उच्चारण म्हणजे सामुदायिक प्रार्थना.
अशी प्रार्थना ही अधिक शक्तिदायी असते.प्रार्थना शब्दांनी होते. मेंदूतून शब्द निर्माण होतात. त्यामध्ये व्यक्तीचा
हेतू मिसळतो व त्याचा परिणाम मेंदू व शरीरावर होतो. चांगले विचार मनात ठसले, वर्तनात उतरले की शरीर
बदलते.
१. आत्मचिंतन प्रार्थना : साध्य - स्व - कल्याण.
साधन - प्रार्थना विचार.
कृती - परिस्थिती आहे तशी स्वीकारणे, ईश्वरी व्यवस्थेला शरणागत असणे.
सुख / दुःख एकाच भावनेने स्वीकारणे.
२. यज्ञ हवन प्रार्थना : साध्य - आत्मज्ञान,
साधन - प्रार्थना विचार.
कृती - हव्यास कमी करणे, स्वतःचे गुण, दोष आठवून अग्नीस शरण जाणे,
त्याने शक्ती, शांती जीवनात स्थिर होईल.
३. समाज सेवेची प्रार्थना साध्य - समाज कल्याण . सर्व कल्याण , निष्काम कर्माने चित्त शुद्धी होते.
साधन - प्रार्थना विचार .
कृती - आपण अनेक ज्ञात/अज्ञात शक्तींचे देणे लागतो,
ते फेडण्यासाठी संकल्पानुसार निष्काम कर्म करणे.
प्रार्थनेचे महत्व, साधन आणि साध्य साधण्यासाठी करावयाचे प्रयत्न याचे सविस्तर विवेचन या पाठात ऐकायला
मिळेल.
विजय रा. जोशी.
No comments:
Post a Comment