योग ग्रंथ पाठ १४, ध्यान पाठ ३, शरीराशी संवाद २२ मे २०२४.
सारांश
योग म्हणजे क्षणा-क्षणाला शरीराची बातमी घेत, म्हणजेच भावना/विचार स्थितीचे आत्म-परीक्षण करीत,
मनाचा वेग (गती , विचार / भावनांची तीव्रता) कमी करायचा प्रयत्न. (साधना).
अनंत जन्माच्या पूर्व संस्काराचे रंग (त्रिगुण) अंतःकरणावर चढले असतात. म्हणून हे सर्व वासना, संस्कार पुसून
टाकणे हे साधनेचे कार्य आहे. अंतःकरण स्वच्छ, सात्विक झाले की जाणीव शुद्घ होते. पारमार्थिक प्रगतीसाठी हे
आवश्यक आहे.
मानवाचे अंतःकरण, जाणीव सर्व प्राणी सृष्टीत विकसित आहे.
मी म्हणजे देह आहे असे वाटणे हि देहबुद्धी, मी म्हणजे आत्मा आहे असे वाटणे म्हणजे आत्मबुद्धी
देहबुद्धी विवेकाने , प्रयत्नाने आत्मबुद्धीत बदलणे ही साधना आहे.
देहेबुद्धिचा निश्चयो दृढ जाला।
देहातीत ते हीत सांडीत गेला॥
देहेबुद्धि ते आत्मबुद्धि करावी।
सदा संगती सज्जनाची धरावी II मनाचे श्लोक ॥१६३॥
आपल्याला सुख जेव्हा बाह्य गोष्टींमुळे मिळते असे वाटते ते ज्ञान खरे नाही. इष्ट गोष्ट प्राप्त झाल्याने ,
बुद्धी क्षण काळ निवृत्त होते. ते सुख
धी + न = ध्यान . म्ह्णून बुद्धी ध्यान प्रक्रियेत शून्य करायची,
म्हणजेच विचारशून्य व्हायचा प्रयत्न संकल्पाने करायचा.
एक इच्छा पूर्ण झाली की अनेक इच्छा पुढे येतात, अंतःकरण परत क्रियाशील होते. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध
हे भोग विषय आणि यश, सत्ता, संपत्ती, कीर्ती, अधिकार, प्रतिष्ठा अशा अनेक न संपणाऱ्या इच्छा सर्व जागृत
अवस्था काळात असतात. प्रयत्नपूर्वक वासना कमी करत नेणे हे साधनेचे कऱ्य आहे. त्यासाठी साधकाने
श्री गुरूंच्या मार्गदर्शनात पूर्व तयारी करणे आवश्यक आहे.
स्वामीजी चौवार्षिक वर्गात सांगतात. शक्ती मिळविण्यासाठी ५ गोष्टी केल्या’
1) त्याग पथ्य.
2) तप पथ्य
3) अभ्यास (ज्ञान)
4) योग्य शांती प्रतिक प्रकाग्रता
5) योग्य शक्ती प्रतिक एकाग्रता.
तुम्ही वरिल ५ गोष्टी करा. तुम्हाला ही तसा अनुभव येईल. ते करता येत नसेल तर विश्वास ठेवा
व सांगितल्या गोष्टी करा.
शरीराशी संवाद या ध्यान पद्धतीची सविस्तर माहिती या पाठात आपण ऐकू शकाल.
विजय रा. जोशी.
No comments:
Post a Comment