योग ग्रंथ पाठ २. २८/०२/२०२४. ध्वनी फीत
(ऑडिओ साठी क्लिक करा)
योग ग्रंथ सार / साध्य स्वामीजी. (शक्ती योग, २४०/४१) स्वावलंबी साधना.
जे वाचले, ऐकले त्याचे चिंतन करावे, स्वतःच्या मनाची खात्री पटवावी आणि त्या प्रक्रियेने
सर्व शरीर बदलते याचा अनुभव घ्यावा.
मात्र अट आहे ती नितियुक्त समता वर्तन हवे. असे वर्तन खरया स्वार्थाचा मार्ग आहे.
तो तात्पुरता नकोसा वाटला तरी त्यानेच अनेक विघ्ने दूर होतील.
कोणत्याही माणसाला स्वतः आपली साधना सहज करता येईल.
चार योग ग्रंथ हेच मर्म सांगतात आणि त्याचे पुरावे देतात. त्यातील विचार पत्करल्यामुळे
तुमच्या मनाला शांती, समाधान मिळेल, इतकेच नव्हे तर एकदा तुमच्या मनाने अहंकार
सोडला की तुमच्यातील चेतन शक्ती देखील साधना प्रयत्नाने तुमच्या ज्ञान शक्तीशी
resonate होईल. हा एक स्वावलंबी असा अपूर्व आनंद असेल.
सर्व शरीर तेज शांतीने प्रस्फुटित झाल्याचा
अनुभव येईल. ही अंतःस्थिती तुम्हाला बाहेरही शांती प्रतिष्ठा मिळवून देईल.
स्वामीजी निर्मित - न्यू वे फिलॉसॉफी , रूप रेषा तत्वज्ञानाचे सार - प्रार्थना .
(साध्य - साधन – स्पष्टता. प्रयत्न दिशा दर्शन)
1. कर्म शुद्धी प्रार्थना. स्वतः साठी
2. आत्म कल्याण प्रार्थना. स्वतः साठी
3. यज्ञ / प्रकाश प्रार्थना स्वतः साठी / सर्वांसाठी.
4. विश्व कल्याण प्रार्थना. स्वतः साठी / सर्वांसाठी
5. राष्ट्र कल्याण प्रार्थना स्वतः साठी / सर्वांसाठी
6. समाज कल्याण प्रार्थना .. स्वतः साठी / सर्वांसाठी....
मनशक्ती तत्वज्ञानाचे सार.
स्वार्थासाठी निस्वार्थ.
सुखासाठी दुख स्वीकार.
मिळविण्यासाठी संकल्प आधारित त्याग.
सत्कर्म पालन, निरपेक्ष, निरहंकार, कर्तव्य भावनेने.
निष्काम कर्माने चित्त शुद्धी.
निष्काम उपासनेने चित्त शांती .
चित्त वृत्ती निरोधाने - ध्यान शांती.
हरी ओम.
विजय रा. जोशी.
No comments:
Post a Comment