मनाचे श्लोक (संत श्री रामदास स्वामी)
पाठ श्लोक 171 ते 175 : ध्वनिफीत :
सारांश श्लोक १७१ -१७५
आत्मवस्तूला पहाणाऱ्या ज्ञान चक्षुंचा उदय कसा होतो, चर्म चक्षु, आणि ज्ञान चक्षु फरक. आणि
त्या स्थित्यन्तरासाठी उपाय, अहंकारमुक्ती. हे सर्व मूलभूत ज्ञान सांगणारे श्लोक आहेत.
निरपेक्ष त्याग दुसऱ्यांसाठी करणे अशी आपली सहज अवस्था होणे हे ज्ञानाचे लक्षण आहे. आपले जगणे
इतरांसाठी व्हायला हवे. सुरवातीला ते जरी संकल्पाने असले तरी अंतिमतः ती आपली सहज अवस्था
व्हायला पाहिजे.
कल्पनेच्या दोन दिशा – 1. विषयाकडे धावणारी (अविद्या). 2. परमात्म्याचा शोध घेणारी.(सुविद्या).
विषय सुखाने आनंद होतोच पण तो चिरकाल नसतो. तात्पुरता असतो. उलट परमात्म दर्शनाने अवीट, संपूर्ण
आणि कायम टिकणारा आनंद निर्माण होतो. म्हणून विवेकाच्या आधाराने सुविद्या मिळवून तसे जगण्याचा
प्रयत्न असावा.
साधना सुरु झाली तर मग किती दिवसात सुविद्या येईल ? या प्रश्नाला नेमके उत्तर नाही.
ते प्रत्येक व्यक्तीवर अवलंबुन आहे. अहंकार रुपी राहू आपल्यातील आत्मशक्ती आच्छादून टाकतो. विवेकाने
जर अहंकार मुक्ती साधली तर हे आच्छादन दूर होते. म्हणून जीवनात विवेकाला महत्वाचे स्थान हवे.
भगवान प्रचिती / दर्शन घेण्यासाठी काय करावे याचे तपशीलवार मार्गदर्शन समर्थ करीत आहेत.
ब्रह्मांड नायकाची ओळख झाल्यावर जीवनाचे रूपच कसे आमूलाग्र बदलून जाईल हे समर्थांना सूचवायचे आहे
आणि त्यासाठी त्या जगन्नियंत्याला ओळखावे असा त्यांचा आग्रह आहे. श्रीराम !!
विजय रा. जोशी.
No comments:
Post a Comment