मनाचे श्लोक (संत श्री रामदास स्वामी)
पाठ श्लोक 156 ते 160 : ध्वनिफीत :
सारांश : श्लोक १५६ - १६०.
परमात्मा पहातांना पहाणारा त्यात मिसळून गेला पाहिजे. ती स्थिती येण्यासाठी “मी” चे अस्तित्व पूर्णपणे
संपून ते अनंतात विलीन झाले पाहिजे.
शब्द - ज्ञानाचे अध्यात्म शास्त्राचे मार्ग अनेक असू शकतील. पण स्वतःला विवेकाने जो मार्ग
समजला त्यावर निष्ठा ठेवून जो सतत पुढे जात राहील, कर्मशुध्दी करत मार्गक्रमण सुरु राहील, समर्पण
भावाने , अलिप्तता राखत , अहंतेचे विसर्जन करीत, ध्येय प्राप्तीसाठी तळमळीने प्रयत्न करीत राहील,
तो साधक.
‘अहंता’ अडथळे निर्माण करते. अहंकारी वागणे मानवास आत्मिक उन्नतीपासून, परमार्थापासून दूर ठेवते.
मी आत्मा आहे, हि जाणीव मनी, वर्तनी मुरणे म्हणजे आत्मज्ञान होय. फक्त बुद्धीने कळणे उपयुक्त नाही.
सहज वर्तन तसे घडायला हवे. जाणीव हि एकवेळ शून्यरूप तरी व्हायला हवी किंवा विश्वरूप एवढी विशाल
व्हायला हवी, तर आंतरिची साधना सफल होईल. म्हणून सतत अनुसंधान राखावे लागते आणि या
अनुसंधानाची अंतर्मनातील लागवड साधकास फार सावधपणे करावी लागते.
आंतरिक उन्नती साधण्यास काय करावे , काय टाळावे याचे मार्गदर्शन श्री समर्थ करीत आहेत.
साधना म्हणजे काय आणि त्यामार्गातील विविध टप्पे समजावून सांगणारे हे विवेचन आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी
खूप माहितीपूर्ण असून आपल्यास ते नक्की उपयुक्त वाटेल असा विश्वास आहे.
जरूर ऐका आणि योग्य वाटल्यास like आणि share करा ही विनंती.
विजय रा. जोशी.
No comments:
Post a Comment