मनाचे श्लोक (संत श्री रामदास स्वामी)
पाठ श्लोक 151 ते 155 : ध्वनिफीत :
सारांश - श्लोक १५१ - १५५.
सत-तत्वाचा शोध घायचा आहे. आणि ते सत-तत्व आपल्यातच आहे. विनासायास फायदा देणारे इन्व्हेस्टमेंट
ऑप्शन्स, आपण व्यवहारात शोधत रहातो. पण हि सवय परमार्थात खूप घातक ठरते. परमार्थात तितिक्षा
लागते, दीर्घ प्रयत्न लागतात . फक्त भोग किंवा त्यागाने अहंकार होईल पण समाधान होणार नाही.
सु ख ---- समाधान ---- शांती. ... ही प्रगत जीवनातील चढत्या क्रमांची उद्दिष्टे. व्यवहारात आपण पहातो
की सुख संपल्यानंतर दुःख येते, समाधान अधिक काळ टिकते. शांती जीवनात स्थिर झाली तर मग काही
मिळवायचेच रहात नाही. सुख हे समाधानकारक वाटले पाहिजे आणि शाश्वत समाधानातून माणूस शांतीत
स्थिर झाला पाहिजे.
संपन्नता (विविध सुख साधने) आणि प्रसन्नता या दोन चाकावर समाधानाचा रथ चालतो. माणूस संपन्नता
प्राप्तीसाठी जरूर प्रयत्न करेल. पण त्या संपन्नता प्राप्तीत काही अपेक्षा असेल तर प्रसन्नता काही काळ
मिळेल पण ती चिरकाल टिकणार नाही. म्हणून निरपेक्ष कर्म करावे असे रामदास स्वामी सांगत आहेत.
ज्ञान चक्षु विकसित होण्यासाठी संत सद्गुरूंनी आचारलेला मार्ग हाच एकमेव उपाय आहे.
पण त्या मार्गावर जर कायम स्थिर होता आलं नाही तर मात्र हे परम सत्य मनुष्य ओळखू शकत नाही .
मन आणि ब्रह्म यांचा संबंध काय, तो जाणण्याचे महत्व काय आणि मनाला ब्रह्मज्ञान होण्यासाठी काय
प्रयत्न करायला हवेत याचे मार्गदर्शन समर्थ या श्लोकांच्या माध्यमातून करीत आहेत.
अध्यात्म आणि व्यवहार याचे सविस्तर विश्लेषण आपल्यास नक्कीच उपयुक्त वाटेल. जरूर ऎका
आणि आवडल्यास share करा. धन्यवाद.
विजय रा. जोशी .
No comments:
Post a Comment