मनाचे श्लोक (संत श्री रामदास स्वामी)
पाठ श्लोक 96 ते 100 : ध्वनिफीत.
सारांश श्लोक ९६ ते १००
तत्व सांगणाऱ्या पुराण कथा आयुष्याचे धडे देतात. भक्त प्रह्लादाची भक्ती-कथा हि युगानुयुगे
एखाद्या दीपस्तंभासारखी मार्गदर्शन करीत आहे. अहंकारामुळे भगवंत स्मरण रहात नाही, त्याचे महत्व
वाटत नाही. आणि मग वाढत जाणारा अहंकार आपल्याला नामस्मरण भक्ती पासून दूर घेऊन जातो.
जीवन दैन्यवाणे होते. रामदास स्वामी आपल्याला या वास्तवाची जाणीव करून देत आहेत
आणि वेळीच नामस्मरणाच्या सन्मार्गने जायचे प्रेमाने सुचवत आहेत. राम-नामाने पाषाण तरले
अशी कथा सांगतात. तसे मानवी जड बुद्धीचे जीवन (मानवी पाषण), देखील सत्कर्माने, भगवंत भक्तीने
तरुन जातात. पण मनात विकल्प, संशय असला तर हे घडत नाही, म्हणून मनापासून, कर्तव्य बुद्धीने,
श्रद्धेने, नम्रतेने, आणि सातत्याने साधना सुरु ठेवावी.
जेव्हा आपण काशी सारख्या कोणत्याही मन पावन करणाऱ्या ठिकाणी संवेदनशील भक्ती- भावनेने
वास्तव्य करू त्यावेळी आपल्याला त्याची महती कळेल, आपली श्रद्धा आपल्यला आगळे समाधान देईल.
कधी ध्यान, कधी कर्म, कधी ज्ञानमार्ग, कधी भक्तिमार्ग… आपण सर्व करण्याचा प्रयत्न करतो, पण
काहीही “यथासांग” होत नाही. काम कुठले ही आपण पत्करू शकतो , पण ते एकाग्रतेने, समर्पण वृत्तीने
आणि अलिप्ततेने करायला हवे अशी संतांची, ज्ञानी माणसाची भूमिका असते. ती आपणसुद्धा कशी
साधावी आणि त्यासाठी अखंड नामस्मरण कसे उपयुक्त आहे
सर्वांचे आयुष्य सन्मार्गी लावणारे हे श्लोक मौल्यवान माहिती देत आहेत. विवेचन जरूर एका,
आणि योग्य वाटल्यास इतरांना ऐकायला सांगा.
विजय रा. जोशी
No comments:
Post a Comment