Friday, December 18, 2020

 

     गीता अध्याय  5, भाग 2, : ध्वनी फीत



अंतरी धुतला योगी , जिंकून मन इंद्रिये

झाला जीवची भूतांचा , करुनि हि अलिप्त तो.      ७/५.


योगयुक्त , विशुद्धात्मा , विजितात्मा , जितेन्द्रिय व सर्वभूतात्मभूतात्मा या पांच गोष्टी जर जीवनात आल्या तर माणूस कर्म करूनही लिप्त होत नाही.




आयुष्यातील वस्तुस्थितीचे यथार्थ ज्ञान (स्वामीजींची शिकवण)

आपली धडपड ही नेहमी सुखासाठी असते. सुखाची अपेक्षा हेच बहुदा मानवी प्रयत्नांचे कारण असते. आणि म्हणूनच सर्व-सामान्यांना  “निष्काम कर्मयोग” बुद्धीने समजणे  जरी शक्य असले तरी त्याप्रमाणे 

प्रत्यक्ष वर्तन घडणे, वागणे हे अत्यंत कठीण आहे, जवळ जवळ अशक्यच आहे.  कुठल्याही प्रदीर्घ प्रवासाची सुरवात जशी पहिल्या पावलानेच होते , तशी कर्मयोग आपल्यास साध्य होण्याला कठीण वाटला तरी त्यादृष्टीने प्रयत्नांची काही पावले टाकणे आवश्यक आहे, शक्य आहे. यादृष्टीने या अध्यायात ‘सुखाच्या’ प्रयत्नांच्या परिणामांबद्दल मार्गदर्शन केले आहे व ते करत असताना आपल्याला आयुष्यातील वस्तुस्थितीचे यथार्थ ज्ञान दिले आहे. 


जन्म - गतीला सुरवात, मरण - गती थांबते, 

जीवन हा गतीचा प्रवास.

सुख / दुःखात (भावनेत) गतीबदल.

जागृतावस्थेत मनुष्य -  भावना / विचार याने जीवन भर ग्रस्त. 

म्हणून जीवनात गती-प्रतीगतीचे नियम लागू.

सुख गती सहज, त्याने दुःख निर्मिती , 

म्हणून (सहज नसलेल्या) दुःख स्वीकाराने सुख.  

माणसाचा अहंकार हा फुललेला असतो, तो सहजच असतो.

नम्रता हि आयुष्यात अभ्यासाने आणायची असते.

हा अभ्यास म्हणजेच साधना / साधक कार्य होय.


शक्ती वळवून कशी घेता येईल ?

अनेक इछ्या , आकांक्षा साठी आपण अस्वस्थ होतो. अनेक हव्यास असतात. अशा वेळी “पश्यंती” पातळीवर आपल्या इच्छ्येचा खरा शोध घेऊन श्रेयस/प्रेयस विश्लेषण करून योग्य तो बदल करून चुकीची गोष्ट टाळून निर्णय घेऊ शकतो. ही सत्सतविवेकबुद्धी (apperception) हे निसर्गाने मानवाला दिलेले वरदान आहे. ति 

प्रत्येकात असते. पण ती वापरण्यासाठी ज्ञानपूर्वक संयम हवा. (हे शिक्षण मनाला कठोर पणे द्यायला हवे.  


या संबंधी परमार्थात तसेच व्यवहारात काय करता येईल याचे गीतेतील मार्गदर्शन जाणून घेण्यासाठी उपयुक्त. 

 

 

गीता अध्याय  5, भाग 2, : ध्वनी फीत





विजय रा जोशी 



No comments:

Post a Comment