Friday, December 11, 2020

 गीता अध्याय  5, भाग 1, : ध्वनी फीत


गीता अध्ययन - हेतू आणि लाभ : भगवत गीतेतील शिकवण आपल्याला स्वतःच्या जीवनात सर्व दृष्टीने प्रगत. उत्क्रान्त होण्यासाठी सहाय्यकारक आहे, स्वतःची  गुणात्मक प्रगती, आणि आत्मिक प्रगती तर  साध्य होईल पण त्याच बरोबर आपले जीवनातील सर्व कार्य योग्य मार्गी लागून , कार्याच्या कौशल्य मध्ये वाढ होऊन संकल्प कसा करावा आणि त्याच्या पूर्तीसाठी काय प्रकारे प्रयत्न करायचे हेही आपल्यास गीतेच्या अभ्यासाने आणि त्याप्रमाणे केलेल्या कृतीने अनुभवास येईल. आपल्यासह आपल्या कुटुंबियांचे, सहकार्ऱ्यांचे आणि संबंधित समाज घटकांचे आपण कसे सहाय्य करावे , कशासाठी करावे आणि त्यातून परस्पर लाभ कसा होऊ शकेल हे आपल्याला गीता अभ्यासाने  कळू शकेल. 

‘माझा खरा अर्थ’ उलगडण्यास हे ज्ञान जसे उपयुक्त आहे तसेच ‘माझ्या जवळ मला जाण्यासाठी’  काय पद्धतीने  मी जीवनाकडे, नित्यकर्माकडे बघावे हे रहस्य गीताज्ञानातून मला मिळू शकेल. 

 प्रत्येक मनुष्यमात्रास गीतेचा अभ्यास आणि शक्य होईल तेवढे त्या ज्ञानाचे अनुकरण हे उपयुक्त आहे. आणि हे सर्व आपण पायरी पायरीने एकेक अध्यायात समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. 

कर्मयोग व कर्मसन्यास यात कोणता मार्ग श्रेष्ठ आहे ?  या प्रश्नातून ५ वा अध्याय निर्माण होतो.


 कृष्णा संन्यास कर्माचा तसा योगही सांगसी, 

 दोहोत जे बरे एक ,  सांग ते मज निश्चित.                             १/५.

 योग संन्यास हे दोन्ही, मोक्ष साधक सारखे

 विशेष चि परी योग , संन्यासाहूनी मानिला.                          २/५.


चवथ्या अध्यायात, कर्म अधिकाधिक  उच्च पातळीवर नेण्यासाठी काय करावे. आणि ज्ञानमार्गी  आणि कर्ममार्गी  ते कसे करतात. (कर्म , विकर्म आणि अकर्म) हे पाहिले.  पाचव्या अध्यायात कर्म संन्यासी आणि कर्मयोगी हे दोन्ही आत्मज्ञानी असतात. त्यांची बाह्यरूपे  वेगळी भासली तरी त्यांचे मूळ कार्य आणि कार्य सिद्धी ही  सारखीच असते हे भगवंत समजवून सांगत आहेत. सर्व-सामान्यांनी ते कसे समजून घ्यावे आणि शक्य होईल तसे त्याचे अनुकरण कसे करावे हे सांगणारा हा अध्याय आहे. यातील संकल्पना अधिक समजून घेण्याचा प्रयत्न आपण  करणार आहोत. 



विजय रा. जोशी.




गीता अध्याय  5, भाग 1, : ध्वनी फीत



No comments:

Post a Comment