गीता अध्याय ३, भाग २ (पाठ दिनांक - १२ जुलै २०२०)
निष्काम कर्माने व्यक्तीचे व समाजाचे परम कल्याण होते.
स्वधर्माचरण करणाऱ्या कर्मयोग्याची शरीर यात्रा तर नीट चालतेच परंतु
नेहमी उद्योगात असल्या कारणाने शरीर निरोगी व स्वच्छ रहाते. आणि
त्याच्या कर्मामुळे ज्या समाजात तो रहातो त्या समाजाचाही योगक्षेम
नीट चालतो.
या दोन फळांशिवाय चित्त शुद्धीचे फळ त्यास मिळते.
कर्मयोग्याची देह आणि बुद्धी सतेज रहाते आणि समाजाचेही कल्याण होते.
महाभारतातील तुलाधार वैश्य - तराजूच्या दांडीतून त्याला समवृत्ती मिळाली.
सेना न्हावी - मी दुसऱ्याच्या डोक्यातील मळ काढतो, पण माझ्या डोक्यातील
बुद्धीचा मळ काढला आहे का? अशी अध्यात्मिक भाषा त्याला त्या कर्मातून
स्फुरू लागली.
गोरा कुंभार - माती तुडवून समाजाला पक्के मडके देणारा गोरा कुंभार आपल्या
जीवनाचेही मडके पक्के केले पाहिजे अशी खूणगाठ मनात बांधतो.
कर्माच्या शिडीवर चढून शिखर गाठले तरी कर्मयोगी ही शिडी सोडत नाही. त्याला
सोडवतच नाही. त्याच्या इंद्रियांना या कर्माचे सहज वळणच पडून जाते. अशा तर्हेने
स्वधर्मकर्मरूप सेवेच्या शिडीचे महत्व तो समाजाला पटवीत असतो.
(उदा. गाडगे महाराज स्वच्छता अभियान)
विजय रा. जोशी.
No comments:
Post a Comment