अध्याय 4, भाग 1 : ध्वनीफीत
गीता अध्ययन - हेतू आणि लाभ (अध्याय ४, भाग १)
भगवत गीतेतील शिकवण आपल्याला स्वतःच्या जीवनात सर्व दृष्टीने प्रगत. उत्क्रान्त होण्यासाठी सहाय्यकारक आहे, स्वतःची गुणात्मक प्रगती, आणि आत्मिक प्रगती तर साध्य होईल पण त्याच बरोबर आपले जीवनातील सर्व कार्य योग्य मार्गी लागून , कार्याच्या कौशल्य मध्ये वाढ होऊन संकल्प कसा करावा आणि त्याच्या पूर्तीसाठी काय प्रकारे प्रयत्न करायचे हेही आपल्यास गीतेच्या अभ्यासाने आणि त्याप्रमाणे केलेल्या कृतीने अनुभवास येईल. आपल्यासह आपल्या कुटुंबियांचे, सहकार्ऱ्यांचे आणि संबंधित समाज घटकांचे आपण कसे सहाय्य करावे , कशासाठी करावे आणि त्यातून परस्पर लाभ कसा होऊ शकेल हे आपल्याला गीता अभ्यासाने कळू शकेल.
कर्म तर करावेच लागणार मग त्या कर्माची प्रत , क्वालिटी, कशी वाढवत न्यायची आणि त्या प्रयत्नांतून आपली सर्वांगीण प्रगती कशी साधायची याचे मार्गदर्शन ४ था अध्याय करतो.
कर्म : संकल्प करून संकल्प सिद्धीच्या इच्छेने जे कर्तव्य कर्म / योग्य कर्म केले जाते ते. कर्म म्हणजे बाहेरून दिसणारी “स्वधर्माची” स्थूल क्रिया, ज्या मध्ये फलाची अपेक्षा असू शकते.
विकर्म : विशेष कर्म. एकाग्रता पूर्वक , मन ओतून केलेले कर्म. येथे सुद्धा फल-अपेक्षा असू शकते. (उपासना / साधना या सह कर्म)
अकर्म : फलाची कामना नाही , फल मिळावे असा संकल्प नाही. पूर्ण एकाग्रतेने पूर्ण अलिप्त राहून केलेले कर्म. (आत्मज्ञान)
विजय रा. जोशी.
Very Nice ,🙏
ReplyDelete