Friday, November 27, 2020

 अध्याय 4, भाग 1 : ध्वनीफीत




गीता अध्ययन - हेतू आणि लाभ (अध्याय ४, भाग १)



भगवत गीतेतील शिकवण आपल्याला स्वतःच्या जीवनात सर्व दृष्टीने प्रगत. उत्क्रान्त होण्यासाठी सहाय्यकारक आहे, स्वतःची  गुणात्मक प्रगती, आणि आत्मिक प्रगती तर  साध्य होईल पण त्याच बरोबर आपले जीवनातील सर्व कार्य योग्य मार्गी लागून , कार्याच्या कौशल्य मध्ये वाढ होऊन संकल्प कसा करावा आणि त्याच्या पूर्तीसाठी काय प्रकारे प्रयत्न करायचे हेही आपल्यास गीतेच्या अभ्यासाने आणि त्याप्रमाणे केलेल्या कृतीने अनुभवास येईल. आपल्यासह आपल्या कुटुंबियांचे, सहकार्ऱ्यांचे आणि संबंधित समाज घटकांचे आपण कसे सहाय्य करावे , कशासाठी करावे आणि त्यातून परस्पर लाभ कसा होऊ शकेल हे आपल्याला गीता अभ्यासाने  कळू शकेल.

 कर्म तर करावेच लागणार मग त्या कर्माची प्रत , क्वालिटी, कशी वाढवत न्यायची आणि त्या प्रयत्नांतून आपली सर्वांगीण प्रगती कशी साधायची याचे मार्गदर्शन ४ था अध्याय करतो. 

कर्म : संकल्प करून संकल्प सिद्धीच्या इच्छेने जे कर्तव्य कर्म / योग्य कर्म केले जाते ते. कर्म म्हणजे बाहेरून दिसणारी “स्वधर्माची” स्थूल क्रिया, ज्या मध्ये फलाची अपेक्षा असू शकते. 

विकर्म : विशेष कर्म. एकाग्रता पूर्वक , मन ओतून केलेले कर्म. येथे सुद्धा फल-अपेक्षा असू शकते.  (उपासना / साधना या सह कर्म) 

अकर्म : फलाची कामना नाही , फल मिळावे असा संकल्प नाही. पूर्ण एकाग्रतेने  पूर्ण अलिप्त राहून केलेले कर्म. (आत्मज्ञान) 



विजय रा. जोशी. 


अध्याय 4, भाग 1 : ध्वनीफीत


Thursday, November 19, 2020

 

अध्याय ३, भाग २ ध्वनीफीत 



गीता अध्याय ३, भाग २  (पाठ दिनांक - १२ जुलै २०२०)

निष्काम कर्माने व्यक्तीचे व समाजाचे परम कल्याण होते. 

  स्वधर्माचरण करणाऱ्या कर्मयोग्याची शरीर यात्रा तर नीट चालतेच परंतु 

नेहमी उद्योगात असल्या कारणाने शरीर निरोगी व स्वच्छ रहाते. आणि 

त्याच्या कर्मामुळे ज्या समाजात तो रहातो त्या समाजाचाही योगक्षेम 

नीट चालतो. 

या दोन फळांशिवाय चित्त शुद्धीचे फळ त्यास मिळते.  

कर्मयोग्याची देह आणि बुद्धी सतेज रहाते आणि समाजाचेही कल्याण होते. 

महाभारतातील तुलाधार वैश्य  -  तराजूच्या दांडीतून त्याला समवृत्ती मिळाली. 

सेना न्हावी - मी दुसऱ्याच्या डोक्यातील मळ काढतो, पण माझ्या डोक्यातील 

बुद्धीचा मळ काढला आहे का? अशी अध्यात्मिक भाषा त्याला त्या कर्मातून 

स्फुरू लागली. 

गोरा कुंभार - माती तुडवून समाजाला पक्के मडके देणारा गोरा कुंभार आपल्या 

जीवनाचेही मडके पक्के केले पाहिजे अशी खूणगाठ मनात बांधतो. 

   

कर्माच्या शिडीवर चढून शिखर गाठले तरी कर्मयोगी ही शिडी सोडत नाही. त्याला 

सोडवतच नाही. त्याच्या इंद्रियांना या कर्माचे सहज वळणच पडून जाते. अशा तर्हेने 

स्वधर्मकर्मरूप सेवेच्या शिडीचे महत्व तो समाजाला पटवीत असतो. 

(उदा. गाडगे महाराज स्वच्छता अभियान)


विजय रा. जोशी. 



अध्याय ३, भाग २ ध्वनीफीत 



Thursday, November 12, 2020

 

   गीता अध्याय  तीन 


गीता अध्याय  ३  ध्वनी फीत 


अध्याय ३ रा.  भाग १,    पाठ  दिनांक ०५ जुलै  २०२०. 


गीतेतील  संकल्पना : 


त्यातील काही तिसऱ्या  अध्यायातील; महत्वाच्या :


कर्मयोग.   मुमुक्षु.  साधक. 

फलत्याग.  चारपुरुषार्थ. चारआश्रम.  त्रिगुण .

ज्ञानमार्ग. स्वकर्तव्य. स्वधर्म. स्वभाव. यज्ञ हेतू, प्रकार.

कर्ममार्ग . देह /  देही.

ज्ञाननिष्ठा . भाववशता / निश्चयात्मकता.

कर्मनिष्ठा. देहबुद्धी / आत्मबुद्धी.

नैष्कर्म्य अवस्था. आत्मसंयम . 

अध्यात्म वृत्ती

प्रवृत्ती/ निवृत्ती.    (अध्यात्म - विज्ञान – व्यवहार - समन्वय )

हा आणि नंतरचे अध्याय थोडे सविस्तर रीतीने , म्हणून दोन भागात घेतले आहेत. 


विजय रा. जोशी. 


गीता अध्याय  ३  ध्वनी फीत 


Sunday, November 1, 2020

गीता अध्याय २


 गीता अध्याय २.  ध्वनी  फीत 


अध्याय २ रा.     पाठ  दिनांक २८ जून २०२०. 


गीता अध्याय २ रा : सांख्य योग - गीतेचे सार.


वेद , उपनिषद , ब्रह्मसूत्रे (प्रस्थान त्रयी चे सार) म्हणजे

भगवत गीतेची शिकवणूक. 

जगातील सर्व माणसाना त्यांच्या समस्यांवर योग्य असे मार्गदर्शन गीता करते. या मार्ग दर्शनाचा प्रारंभ अद्ध्याय २ पासून होतो.


 १. सांख्य बुद्धी – जीवात्मा व परमात्मा यांना जोडणारी बुद्धी,

 २. निष्काम कर्मयोग,

 ३. स्थितप्रद्न्य,

 ४. स्वधर्म. इ.


संकल्पना या अध्यायात आपल्याला समजून घ्यायच्या आहेत.


सांख्य योग / ज्ञान योग  (शरीर , मन . आत्मा , जीवन , मृत्यू  या 

बद्दलचे ज्ञान म्हणजेच जीवनाचे मूलभूत ज्ञान)

तसेच कर्मयोग स्थितप्रज्ञ , कर्मयोगी वर्णन आपण पहाणार आहोत. 


आणि या मार्गावर जायचे असेल, गीतेच्या माध्यमातून  आपले जीवन समृद्ध करायचे असेल तर नेमके सर्वसामान्य माणसास काय करणे शक्य आहे, किंवा होऊ शकेल याचेही दिशा दर्शन आपल्याला या विवेचनातून होईल. 


विजय रा.जोशी.


गीता अध्याय २  ध्वनी फीत