प्रेरणा दिन पाठ , २१ फेब्रुवारी, २०२४.
वरील निळ्या रंगाच्या ओळीवर क्लीक केले कि पाठ ऑडिओ ऐकता येईल.
हरी ओम.
मनशक्ती केंद्राचे संस्थापक आणि प्रथम चिंतक स्वामी विज्ञानानंद यांनी २१ फेब्रुवारी १९६३ या दिवशी , सन्यास मार्ग स्वीकारला. स्वामीजींनी अनेक साधकांना अर्थपूर्ण जीवनासाठी मार्गदर्शन केले, पण त्यांनी स्वतःला रूढार्थाने "गुरु" म्हणून मानले नाही. कोणाचा खाली वाकून नमस्कार स्वीकारला नाही. १९९३ मध्ये त्यांनी प्रकाश समाधी घेतली. पण दर्शनार्थ त्यांनी स्वतःचे कॊणतेही प्रतीक ठेवले नाही.
स्वामीजींच्या शिकवणुकीने , त्यांनी मांडलेल्या तत्त्वज्ञानाच्या आधारे आज पर्येंत हजारो साधकांचे जीवन सन्मार्गी लागले आहे. मनशक्ती केंद्र २१ फेब्रुवारी हा दिवस (सत्कार्याची) प्रेरणा दिवस म्ह्णून मानतात. व स्वामीजींच्या शिकवणुकीतून नवीन कार्य प्रेरणा घेतात.
या विशेष प्रसंगी घेतलेले हे विवेचन सर्वांस प्रेरणा दायी ठरेल अशी खात्री आहे.
विजय रा. जोशी.
No comments:
Post a Comment