मनाचे श्लोक (संत श्री रामदास स्वामी)
पाठ श्लोक 106 ते 110 : ध्वनिफीत.
सारांश श्लोक १०६ ते ११०.
समर्थ समाधानाच्या प्राप्तीचा राजमार्ग समजावून सांगत आहेत. त्यासाठी ३ मार्ग .
१. देह शुद्धी - स्नान/संध्या आदी रोजची आन्हिके.
2. मनशुद्धी - त्यासाठी प्रवास स्वार्था कडून निस्वार्थ कडे.
3. अंतःकरण शुद्धी / चित्त शुद्धी - तो प्रवास दीर्घ आहे, संयमाववर, निश्चयावर आधारित आहे,
दीर्घ कष्ट लागतात. प्रगती हळूहळू होते.
व्यवहारिक शिक्षणाबरोबर नैतिकतेचे शिक्षण देखील कसोशीने, अगदी योग्यवेळी बालकाच्या आयष्यात
योग्य काळी सुरु झाले पाहिजे.
क्रोध अनावश्यक नाही पण तो ताब्यात पाहिजे आणि तो चांगल्या हेतूसाठी असावा. संगत हि
सज्जनांच्या बरोबर असावी. स्वतःला समाधानाने जगायचे असेल तर, जीवन उन्नत करायचे असेल
तर जाणीवपूर्वक कुसंगती टाळून सत्संगती पत्करली पाहिजे.
आपण जीवनात अनेक लोकांशी विविध विषयांवर बोलतो, चर्चा करतो ते अटळ आहे ,पण त्यात
फक्त आवश्यक तेवढाच वेळ घालवावा. संत / सज्जनांशी जो संवाद होतो, तो सुख संवाद होतो.
त्यांचा हेतू हा आपल्याला खऱ्या सत्याच्या मार्गाला नेण्याचा असतो. समर्थ आपण काय करावे,
काय टाळावे हे नीट समजावून सांगत आहेत. हे सर्व ज्ञान परमार्थासाठी तर महत्वाचे आहे,
पण व्यवहारी जीवनात देखील खूप उपयुक्त आहे.
या ऑडीओच्या माध्यमातून याचे सविस्तर विवरण आपल्याला नक्कीच उपयुक्त वाटेल.
जरूर ऐका आणि योग्य वाटल्यास इतरांना ऐकण्याची शिफारस करा.
विजय रा. जोशी.
No comments:
Post a Comment