मनाचे श्लोक (संत श्री रामदास स्वामी)
पाठ श्लोक 106 ते 110 : ध्वनिफीत.
My youtube channel https://www.youtube.com/channel/UCkzjrlbzliRxwyqq5KXYjWw Dnyan Gunakar www.youtube.com
मनाचे श्लोक (संत श्री रामदास स्वामी)
पाठ श्लोक 101 ते 105 : ध्वनिफीत.
सारांश श्लोक 101 ते 105
नामस्मरण जेथे चालले आहे तेथील वातावरण तरंग चांगल्यास पोषक असतात. अति आदरे, दृढ
विश्वासाने नामस्मरण करावे, त्याने अंतर्बाहय चांगल्या विचार लहरी निर्माण होतील, सत्कर्म करण्याची
प्रेरणा होत राहील , स्वभाव दोष कमी होतील. अंतर्बाहय शुद्धी प्रक्रिया मार्गी लागेल.
सदाचरणाचा अभ्यास.
परमार्थ मार्गी लागण्यासाठी , स्थिर होण्यासाठी जे सद्गुण आपल्या अंगी असावे लागतात, प्रयत्नाने
धारण करावे लागतात त्याचे वर्णन समर्थ करत आहेत. “अती लीनता” हवी आणि ती स्वाभाविक
झाली पाहिजे, रामचरित्राच्या अभ्यासातून , थोर व्यक्तींच्या चरित्र प्रसंगांवरून , संत चरित्रातून अशी
तितिक्षेची, सहनशीलतेची , अति लीनतेची अनेक उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात.
साधने मधील येणारे अडथळे विवेकाच्या साहाय्याने कसे दूर करावे याचे मार्गदर्शन आहे. कृतीच शास्त्र
परमार्थात सार आहे. त्या कृती-सातत्याच महत्व सांगत आहेत. विवेक आणि विचार यातील
फरक….. अध्यात्म कर्म, क्रिया सोडायला, टाकायला सांगत नाहीत, तर विवेकाने कर्म, क्रिया पालटायला,
सुधारायला सांगते. या बद्दलची माहिती सोप्या शब्दात या श्लोकांच्या माध्यमातून समजून घायचा
प्रयत्न आपण या विवेचनातून करू या.
विजय रा. जोशी.